मोफत शिलाई मशीन योजना | Free Silai Machine Yojana –
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही तरी कौशल्य नक्कीच असते. बऱ्याच महिला ह्या काही कारणास्तव जास्त शिक्षण घेऊ शकल्या नसल्या तरी सुद्धा त्यांच्या कडे इतर कौशल्य असतात आणि त्यामध्ये शिवणकाम या कौशल्याचा सुद्धा समावेश आहे. शिवणकाम
मोफत शिलाई मशीन योजना | Free Silai Machine Yojana –
– मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना रोजगार मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
– या योजनेअंतर्गत देशातील ५०,००० पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
– महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा सुद्धा या योजनेचा उद्देश असून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांची प्रगती व्हावी यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते.
– ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या महिला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मोफत शिलाई मशीन योजनेचे फायदे Benefits | Free Silai Machine Yojana –
– मोफत शिलाई मशीन योजनेचा फायदा नक्कीच आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना होणार आहे.
– महिला शिलाई काम करून आपल्या घरची परिस्थिती सुधारू शकतात.
– तसेच महिलांना आत्मनिर्भर बनण्यामध्ये सुद्धा या योजनेचा फायदा होईल.
– जर एखाद्या महिलेकडे खरंच शिवणकाम करण्याचे कौशल्य असेल परंतु त्या महिलेकडे जर शिलाई मशीन घेण्यासाठी पैसे नसतील ,तर इतर कोणत्याही ठिकाणावरून कर्ज घेण्याची गरज त्या महिलेला पडणार नाही.कारण या योजनेअंतर्गत ती महिला जर गरीब असेल तर नक्कीच तिला मोफत शिलाई मशीन मिळू शकेल.
– तसेच महिलांकडे असलेल्या कला कौशल्याला अधिक वाव मिळेल.
मोफत शिलाई मशीन योजना पात्रता | Free Silai Machine Yojana Eligibility –
– मोफत शिलाई मशीन योजनेसाठी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे.
– २० ते ४० वर्षीय महिलांनाच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येईल. ४० वर्षाच्या वर वय असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
– तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२ लाखाच्या वरती आहे अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– अपंग महिला व विधवा महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल ,फक्त अर्ज करत असताना अर्जा सोबत विधवा महिलांनी आपल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि अपंग महिलांनी अपंग प्रमाणपत्र जोडणे गरजेचे असेल.
– जर समजा एखाद्या महिलेने केंद्र सरकार अंतर्गत किंवा राज्य सरकार अंतर्गत एखाद्या योजनेद्वारे जर यापूर्वी शिलाई मशीनचा लाभ घेतलेला असेल तर अशा महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ ज्या महिलेला घ्यायचा आहे ,त्या महिलेकडे शिवणकाम येत असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
– आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येईल.
– एखाद्या कुटुंबामधील व्यक्ती जर सरकारी नोकरीमध्ये असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
Necessary documents for free silai machine Yojana –
– महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र
– अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो
– अर्जदाराचे आधार कार्ड
– लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे गरजेचे आहे)
– जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला
– मोबाईल नंबर
– अर्जदार महिला अपंग असल्यास, अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
– अर्जदार महिला विधवा असल्यास ,पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
– रेशन कार्ड
– जातीचे प्रमाणपत्र
– शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज | Application for free silai machine Yojana –
– मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज भरण्यासाठी नजीकच्या नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागातून अर्ज घ्यावा लागेल.
– किंवा पुढील लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आऊट काढून अर्जामधील माहिती व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा आणि नंतर जोडलेल्या प्रतींसह हा अर्ज जमा करून त्याची पोचपावती घ्या.
– या नंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते व पडताळणी नंतर अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरल्यास अर्जदाराला कळवले जाते आणि मोफत शिलाई मशीन वाटप केले जाते.
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी – येथे क्लिक करा.
हे ही वाचू शकता… महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर पंप योजना
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |