फ्रीलांसिंग म्हणजे काय, फ्रीलांसिंग द्वारे पैसे कसे कमवायचे | What is freelancing in Marathi and how to earn money

मित्रांनो फ्रीलांसिंग काय असते? आणि त्यातून पैसे कसे कमवता येतात याबद्दल जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर detailed माहिती या blog मध्ये दिली आहे. जसा एखादा बिसनेस असतो त्यामध्ये २ प्रकारच्या वस्तू विकल्या जातात, पहिली म्हणजे कोणतेही प्रोडक्ट. दुसरी म्हणजे कोणतीही सर्व्हिस. पण काही बिसनेस कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरु होतात तर काहींना जास्त इन्व्हेस्टमेंट ची गरज लागते. तसाच काही भाग हा फ्रीलांसिंग मध्ये असतो.

Advertisement

फ्रीलांसिंग करणारा व्यक्ती हा त्याची सर्विस कोणत्याही बिसनेसला, कंपनीला, क्रिएटरला देतो ज्यांना तो सर्विस देतो ते त्याचे क्लायंट असतात. आणि फ्रीलांसरला जी स्कील येत असेल त्या स्कीलविषयी सर्विस तो देत असतो. तुम्ही सोप्या भाषेत समजण्यासाठी यालाच contract बेसिसवर असणारे काम देखील म्हणू शकतात. यात काही क्लायंटला तुमच्याकडून एकाच वेळेस काम असेल तर काहींना रीकरिंग म्हणजे एका वेळेस जर ते तुमचे क्लायंट झाले आणि त्यांना तुमची सर्विस किंवा वर्क आवडल तर तेच काम त्यांना दर वेळेस करायचं असेल तर ते तुमच्याकडून करून घेतील. काही असे पण क्लायंट असतात, समजा एखादा बिसनेस आहे ज्याला त्याच्या दुकानाच्या ओपनिंगसाठी काही बॅनर डिझाईन करायचे असेल तर तो फ्रीलांसर कडून करून घेईल पण नंतर त्याला कधीच बॅनर डिझाईनची गरज पडली नाही तर तो फ्रीलांसरकडे नाही जाणार. तर असे २ प्रकारचे क्लायंट आपल्याला पाहायला मिळतात.

फ्रीलांसिंग मध्ये कोणत्या सर्विस देता येतात | Which services provided by Freelancers

तुम्ही ज्या क्षेत्रात एक्सपर्ट असाल किंवा जिथे तुमचा इंटरेस्ट असेल त्या क्षेत्रातील फ्रीलांसिंगवर काम केले तर तुमची growth मोठ्या प्रमाणावर होण्याचे चान्सेस आहेत. किंवा ज्या स्किल्सची मार्केट मध्ये डिमांड आहे ते शिकून तुम्ही फ्रीलांसिंग करू शकतात. खालील काही फ्रीलांसिंग स्किल्स आहेत.

  • Video Editing
  • Photo Editing/Graphic Designing
  • Voice Over artist
  • Social media manager
  • SEO(Search Engine Optimization) Expert
  • Google Ads expert
  • Facebook Ads expert
  • Web Development
  • Frontend/Backend Development
  • Data Entry
  • UI/UX Design
  • Animation Design
  • Audio Editing
  • App Development
  • Financial Consulting
  • Legal Consulting
  • Content Writing
  • Proofreading
  • Illustration Art Design
  • Subtitle Edit
  • Translation
  • Blockchain
  • Artificial Intelligence
  • Data Analytics
  • eCommerce
  • Excel

फ्रीलांसिंगची सुरुवात कशी करावी | How to start freelancing in Marathi

तुमच्याकडे असणाऱ्या स्किल्सशी संबंधित अनेक फ्रीलांसिंग Platform तुमची प्रोफाईल तयार करा व लोकांना मॅसेज करून सुरुवात करू शकतात. सुरुवातीला तुमची प्रोफाईल नवीन असल्यामुळे फ्रीलांसिंग Platform वर तुमची रेटिंग आणि रिव्ह्यू नसतात त्यामुळे पहिला क्लायंट मिळायला थोडा वेळ लागतो. पण एक जरी क्लायंट तुम्हाला मिळाला तर तुमची सुरुवात होते. पहिल्या क्लायंट कडूनच तुमच्या कामाबद्दलचे चांगले रिव्ह्यू घेऊन घ्या. ज्यामुळे तुमची प्रोफाईल ग्रो होण्यास मदत होते. त्याच क्लायंटला तुम्ही रीकरिंग कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून रेग्युलर त्यांच्याकडून काम मिळेल तर एखाद्या वेळेस कोणाच कडून काम मिळाल नाही तर एकेकडून आपली इन्कम सुरु असते.

LinkedIn वर प्रोफेशनल लोकांशी कनेक्ट व्हा. तिथे लोकांना Freelancers ची गरज असते त्यावेळेस ते LinkedIn वर पोस्ट करतात. काही अश्या लोकांशी कनेक्ट राहून तिथून तुम्हाला क्लायंट मिळण्यास मदत होते.

YouTube, Instagram वर जे क्रिएटर आहेत. त्यांच्या संबधित तुमच फ्रीलांसिंग काम असेल जसे व्हिडीओ ईडीटिंग, Thumbnail ईडीटिंग किंवा इतर काही तर त्या क्रिएटरला तुम्ही त्याच्या पर्सनल सोशल मिडियावर Message करून कमेंट मध्ये Message करून किंवा जिथे Active असतील त्याठिकाणी तुम्ही Message करून त्यांच्यापर्यंत पोहचून तुमचे काम दाखवू शकतात. आणि त्यांच्यासाठी फ्रीलांसिंग करू शकतात.

फ्रीलांसिंग साठी प्लॅटफॉर्म | Best platform for freelancing in Marathi

Advertisement

Leave a Comment