तुमचे gmail account डिसेंबर पासून होऊ शकते delete … त्यासाठी घ्या काळजी…
Google हे न वापरलेली accounts हटवत आहे. Google किमान दोन वर्षांपासून न वापरलेले अकाउंट म्हणजेच इन ऍक्टिव्ह अकाउंट एक डिसेंबर पासून हटवण्यास सुरुवात करत आहे. तुमचे सुद्धा असे जीमेल अकाउंट असेल की जे दोन वर्षापासून वापरलेले नाही परंतु त्यावर महत्त्वाचा डेटा सेव आहे तर नक्की काळजी घ्या कारण असे अकाउंट डिलीट होण्याची शक्यता आहे…
Google account हे Gmail, Meet, Calendar, Drive, Docs, Photos आणि YouTube यांसह इतर ठिकाणी प्रवेश देतात.आणि जर समजा तुमचे एखादे इन ॲक्टिव्ह अकाउंट मध्ये महत्त्वाचे इमेल्स, फोटोज, व्हिडिओज , कॉन्टॅक्टस्,महत्वाचे डॉक्युमेंट्स किंवा इतर काही कन्टेन्ट असेल तर ते सुद्धा धोक्यात येऊ शकते त्यासाठी नक्की काळजी घ्या. तर यासाठी तुम्ही पुढील काळजी घेऊ शकता…
– तुमचे account हटवण्यापासून रोखण्यासाठी, एक डिसेंबर पूर्वी तुमच्या Google account मध्ये साइन इन करा.
– जर समजा तुम्ही तुमच्या Google account मध्ये किंवा त्यांच्या इतर कोणत्याही सर्विसेस मध्ये अलीकडेच साइन इन केलेले असल्यास, तुमचे अकाऊंट सक्रिय मानले जाईल आणि ते हटवले जाणार नाही.
– तसेच ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी युझर्सना ईमेल address वर आणि रीकव्हरी ईमेल दोन्हीवर नोटिफिकेशन्स येतील.
– शाळा ,ऑर्गनायझेशन किंवा इतर कामांसाठी तयार केलेले अकाउंट हटवले जाणार नाहीत तर फक्त न वापरलेले पर्सनल अकाउंट हटवले जाऊ शकतात.
– तुमचा समजा एखाद्या अकाउंट वर गुगल ड्राईव्ह वर खूप डेटा सेव आहे परंतु त्या अकाउंट वर सुद्धा तुम्ही दोन वर्षांपासून लॉगिन केलेले नसेल तर असा डेटा सुद्धा धोक्यात आहे, कारण असे अकाउंट डिलीट होण्याची शक्यता आहे.
– धोरणानुसार, रिटायर्ड YouTube चॅनेलवरील व्हिडिओ सध्या सुरक्षित आहेत.
सेक्युरिटीच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे कारण spams, account hijacking यांसारखे प्रकार घडत असतात हे टाळण्यासाठी हे पाऊल उचलले गेलेले आहे.
असुरक्षिततेची काही कारणे असल्यामुळे असे करण्यात येत आहे. परंतु ज्यांचे अकाउंट ऍक्टिव्ह आहे त्यांना घाबरण्याची गरज नाही, परंतु तुमचे असे काही अकाउंट असतील ज्यामध्ये तुमचा महत्त्वाचा डेटा सेव्ह आहे तर नक्कीच त्या अकाउंट मध्ये साइन इन करा जेणेकरून तुमचे अकाउंट डिलीट होण्यापासून वाचेल.