ICICI Fixed Deposit with Monthly Income Option | दर महिन्याला मिळवा फिक्स इन्कम | ICICI monthly FD scheme I Best Finance schemes 2024

दर महिन्याला मिळवा फिक्स इन्कम | ICICI Fixed Deposit with Monthly Income Option | ICICI monthly FD scheme

       ICICI विविध फीक्सड डिपॉझिट स्कीम्स ऑफर करते, त्यापैकी एक आहे ( monthly income option )मासिक उत्पन्न पर्याय ( ICICI Fixed Deposit with Monthly Income Option). मासिक उत्पन्न पर्याय ही योजना वन टाइम लम्सम डिपॉझिट रकमेच्या गुंतवणुकीसह नियमित आणि फिक्स्ड मासिक उत्पन्नासह आकर्षक असे व्याजदर देते. मंथली इन्कम पर्याय या योजनेमध्ये आपण कमीत कमी 1 लाख रुपये जमा करू शकतो आणि त्यानंतर ही रक्कम पंचवीस हजाराच्या पटीमध्ये वाढवू शकतो उदाहरणार्थ, 1,00,000 रुपये,1,25,000 रुपये, 1,50,000 रुपये, 2,00,000 रुपये या प्रकारे. तर या योजनेसाठी कमीत कमी गुंतवणूक कालावधी 24 महिने म्हणजेच दोन वर्ष असून एक महिन्याच्या पटीमध्ये वाढवला जाऊ शकतो. तसेच मासिक उत्पन्न पर्याय या योजनेसाठी पे आऊट टप्पा 1 वर्षाचा असून 12 महिन्यांच्या पटीत वाढवता येऊ शकतो.

Advertisement
ICICI Fixed Deposit with Monthly Income Option

मासिक उत्पन्न पर्यायासह ICICI मुदत ठेवीची वैशिष्ट्ये | Features of ICICI Fixed Deposit with Monthly Income Option –

मंथली इन्कम ऑप्शन स्कीमची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

–  सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट ओपन केले जाऊ शकते.

– आंशिक ( Partial withdrawal ) पैसे काढण्याची परवानगी नाही.

– सध्याची आरडी किंवा एफ डी मासिक उत्पन्न योजनेमध्ये कन्वर्ट केली जाऊ शकत नाही.

Interest Rates of ICICI Fixed Deposit with Monthly Income Option | व्याजदर –

मासिक उत्पन्न पर्यायासह ICICI मुदत ठेवीचे व्याजदर हे मुदत ठेवीच्या एकूण कालावधीनुसार ( total tenure ) असेल, ज्यामध्ये प्रथम इन्व्हेस्टमेंट फेस आणि नंतर लाभ किंवा पेआउट फेज समाविष्ट असते. व्याजाचा दर दोन्ही फेजमध्ये समान असेल आणि स्टॅंडर्ड FD योजनांसाठी समान असेल.

ICICI Bank FD interest rates| आयसीआयसीआय बँकेचे एफ डी व्याजदर –

जनरल पब्लिक इंटरेस्ट रेट्स p.a. – 3.00% to 7.10% 

सीनियर सिटीजन इंटरेस्ट रेट्स p.a. – 3.50% to 7.65%

Eligibility Criteria to Open ICICI Fixed Deposit with Monthly Income Option | मासिक उत्पन्न पर्यायासह ICICI मुदत ठेव उघडण्यासाठी पात्रता निकष –

 – आय सी आय सी आय फिक्सड डिपॉझिट मंथली इन्कम ऑप्शन या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.

– या योजनेअंतर्गत सिंगल किंवा जॉईंट अकाउंट उघडता येते.

Documents Required to Open ICICI Fixed Deposit with Monthly Income Option Scheme | मंथली इन्कम ऑप्शन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

*ओळखीच्या पुराव्यासाठी पुढीलपैकी कागदपत्रे लागेल :

– पॅन कार्ड

– फोटो रेशन कार्ड

– मतदान कार्ड

-ड्रायव्हिंग लायसन्स

– पासपोर्ट

– गव्हर्मेंट आयडी कार्ड

– सीनियर सिटीजन आयडी कार्ड 

पत्त्याच्या पुराव्यासाठी पुढीलपैकी कागदपत्र लागेल :

– युटिलिटी बिल्स

– पासपोर्ट

– पोस्ट ऑफिस ने इशू केलेले सर्टिफिकेट किंवा आयडी कार्ड

– बँक स्टेटमेंट चेक सोबत.

How to Apply for ICICI Fixed Deposit with Monthly Income Option scheme | मासिक उत्पन्न पर्याय या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

– या योजनेसाठी आयसीआयसीआय बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे तसेच मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आणि तुमच्या नजीकच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन एफडी ओपन करू शकता.

* या योजनेबद्दल महत्त्वाच्या बाबी | Important things about ICICI Fixed Deposit with Monthly Income Option scheme –

– एकदा टेन्युअर निवडला की चेंज करता येत नाही. टेन्युअर इन्व्हेस्टमेंट फेज आणि पे आऊट फेज किंवा बेनिफिट फेज कालावधीचे कॉम्बिनेशन असते.

– सर्व मंथली इन्कम पे आउट्स कस्टमरच्या सेविंग अकाउंट मध्ये क्रेडिट होतात.

– ICICI फिक्स्ड डिपॉझिट विथ मंथली इन्कम ऑप्शन स्कीमवर मिळणारे व्याज हे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स (TDS) च्या अधीन आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment