Jio internship program | जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम | best Internship programs 2024 –

Jio internship program | जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम | best Internship programs 2024 –

    बरेच विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात परंतु नोकरी मिळवत असताना शिक्षणासोबतच आपण इतर कोणते स्किल्स शिकलेले आहोत तसेच इतर कोणते कोर्सेस आपण केलेले आहेत किंवा इतर कोणत्या गोष्टीचे आपल्याकडे ज्ञान आहे हे बघितले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच नोकरी लागावी असे वाटत असताना बऱ्याच कंपन्यांना आपण एक्स्ट्रा कोर्सेस केलेले असणे अपेक्षित असते,अशावेळी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोर्स करायला वेगळा वेळ द्यावा लागतो परंतु जर शिक्षण सुरू असतानाच आपण इतर नॉलेज मिळवले, इंटर्नशिप केल्या तर नक्कीच यामुळे आपल्या रिझ्यूमममध्ये भर पडते आणि भविष्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायासाठी सुद्धा त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आज अशाच एका इंटर्नशिप बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत त्या इंटर्नशिप चे नाव आहे , ” जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम “( Jio internship program ).

Advertisement

” जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम “( Jio internship program )

Reliance jio | रिलायन्स जिओ  –

जिओ ही कंपनी फक्त भारतभर नव्हे जगामध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध अशी कंपनी बनली आहे. जिओ ही टॉपची कंपनी असल्याकारणाने या कंपनीसोबत काम करण्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, काही विद्यार्थ्यांना ही संधी मिळते तर काहींना नाही, परंतु जिओ इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत जिओ सोबत काम करण्याची त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची संधी आपल्याला मिळू शकते.

Jio internship program | जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम –

– जिओ इंटर्नशिप ( Jio internship) प्रोग्रॅमचे असे उद्दिष्ट आहे की, विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.

– विविध क्षेत्रांमधील ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना त्यांचे थेरॉटिकल नॉलेज प्रॅक्टिकली वापरण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश जिओ इंटर्नशिप प्रोग्रामचा आहे.

जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम (Jio internship program) मध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थी पुढील गोष्टी करण्यास सक्षम बनू शकतात :

  • डिजिटल संस्थेचा अनुभव मिळवू शकतात.
  • थेरॉटिकल नॉलेजचा प्रॅक्टिकली कसा उपयोग करता येईल हे शिकता येईल .
  • उद्योगातील तज्ञांकडून शिकण्याची संधी मिळेल.

Jio internship program Eligibility | जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम पात्रता : 

  • इंटर्नशिप स्वीकारताना वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • सरकारी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत फुल टाईम पदवी/डिप्लोमा प्रोग्राममध्ये शिकत असले पाहिजे.
  • इंटर्नशिपसाठी संस्थेची लेखी परवानगी असणे सुद्धा आवश्यक आहे.

Jio internship program Required documents| जिओ इंटर्नशिप प्रोग्रॅम आवश्यक कागदपत्रे  : 

– कॉलेज आय डी 

– आधार कार्ड

इंटर्नशिप प्रोग्रामसाठी निवड निकष काय आहेत?

ऑनलाइन असेसमेंट टेस्टला दिलेल्या प्रतिसादांच्या आधारे या प्रोग्रॅम साठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. कृपया लक्षात घ्या की , त्यांच्याकडे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मर्यादित ओपनिंग आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह ” या आधारावर।

Online assessment test | ऑनलाइन असेसमेंट टेस्ट –

 ऑनलाइन असेसमेंट टेस्ट ही 15 मल्टिपल चॉइस क्वेश्चन्सची असणार आहे, यामध्ये व्हर्बल ,एरिथमॅटिक आणि जनरल अवेअरनेस क्वेश्चन असणार आहे. ही टेस्ट पाच मिनिटांची असून या टेस्ट बद्दल ईमेल द्वारे कळवले जाईल. 

* जर आपण एका टेस्टमध्ये फेल झालो आणि एका प्रोजेक्टसाठी आपली निवड झाली नाही तरीसुद्धा आपण दुसऱ्या प्रोजेक्टसाठी अप्लाय करू शकतो.

* जिओ इंटर्नशिप मार्फत आपल्याला काही गोष्टी शिकण्यास मिळतील तसेच अनुभव सुद्धा मिळेल. 

* जिओ इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्यांच्यामार्फत कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा दिले जाईल, आपण आपल्या रिझ्युम मध्ये किंवा linked in प्रोफाईलवर या गोष्टीचा उल्लेख करू शकतो.

जिओ इंटर्नशिप ( Jio internship program ) बद्दल तुमच्या मनामध्ये इतर काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा. 

पुढील लिंक वर क्लिक करून जिओ इंटर्नशिप ( Jio internship ) बद्दल अधिक माहिती मिळवू शकता तसेच या इंटर्नशिप अर्ज करू शकता.

जिओ इंटर्नशिप ( Jio internship ) बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्याकरिता (apply here) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version