स्टेशनरी व्यवसाय कसा सुरू करायचा? Stationery Business

स्टेशनरी व्यवसाय कसा सुरू करायचा? stationery Business –

     शाळा, कॉलेजेस, कार्यालय तसेच कंपन्यांमध्ये आणि अगदी घरात सुद्धा वेगवेगळ्या स्टेशनरी सामानाची आवश्यकता असते. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तर वेगवेगळी स्टेशनरी लागत असते त्यामुळे जर स्टेशनरी व्यवसाय सुरू केला तर तो फायद्यामध्ये राहू शकतो. चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

Advertisement

1.स्टेशनरी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहे ते पुढील प्रमाणे, त्यापैकी तुम्हाला जो पर्याय आवडेल तो तुम्ही निवडू शकता.

१ . पार्ट टाइम/घरूनच स्टेशनरीचा व्यवसाय सुरू करू शकता – हा मार्ग निवडल्यामुळे तुमचे जे काही कॉन्टॅक्ट असतील त्यांना विक्री करू शकता, हळूहळू इतर लोकांना सुद्धा तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती होईल आणि ते सुद्धा तुमच्याकडून खरेदी करू लागतील.

२ . रिटेल स्टोअर – रिटेल स्टोअर सुरू केल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना विक्री करणे शक्य होईल.

३ . होलसेल सप्लाय – रिटेल स्टोअर, ऑफिसेस तसेच शाळांना होलसेल स्टेशनरी पुरवू शकता.

४ . ऑनलाइन स्टोअर – ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू त्यांना पुरवू शकता.

2. योग्य पुरवठादार शोधा –

– स्टेशनरी वस्तूंचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य तो विश्वसनीय असा पुरवठादार शोधणे आवश्यक आहे.

– पुरवठादार शोधत असताना स्टेशनरी वस्तूंची गुणवत्ता तसेच इतर व्यवसाय अटी उदाहरणार्थ ,क्रेडिट यांसारखे काही घटक लक्षात घेणे गरजेचे आहे.

– पुरवठादाराची निवड करत असताना स्टेशनरीची कॉलिटी, व्यवसाय अटी तसेच ट्रान्सपोर्टेशन खर्च यांसारख्या विविध बाबी लक्षात घेऊन इतर पुरवठादारासोबत या गोष्टींची तुलना करून पुरवठादार निवडणे सोपे जाईल.

3.स्टेशनरी मध्ये विविध वस्तूंचा समावेश होतो त्यापैकी काही वस्तू पुढील प्रमाणे –

नोट पॅड, एक्सरसाईझ पुस्तके, रायटिंग शीटस,वह्या, चित्रकला वह्या, डायरी, ग्रीटिंग कार्ड्स, कार्डशिट्स, प्रोजेक्ट पेपर्स, पेन, पेन्सिल, कला साहित्य (रंग, क्रेयॉन, मार्कर आणि इतर बरेच काही), ऑफिस स्टेशनरी (फोल्डर्स, स्टेपलर, स्क्रॅच पॅड), सजावटीच्या वस्तू, कम्प्युटर कंजूमेबल्स, टेक्निकल स्टेशनरी, ऍडहेजीव्ह

तुमच्या आवडीप्रमाणे स्टेशनरीच्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या स्टोअर मध्ये ठेवू शकता. जितकी जास्त व्हरायटी तितके व्यवसायासाठी चांगलीच आहे.

4. स्टेशनरी व्यवसायासाठी योग्य ठिकाण निवडा –

– कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना तो व्यवसाय कोणत्या जागी सुरू करत आहोत हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे.

– जर समजा स्टेशनरी रीटेल स्टोअर सुरू करणार असाल तर शाळा किंवा महाविद्यालयाच्या जवळ तसेच जास्त गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच मार्केटच्या ठिकाणी सुरू करू शकता.

– तसेच स्टेशनरी होलसेल दुकान सुरू करणार असाल तर मोठे मार्केट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरू करू शकता किंवा दुसऱ्या ठिकाणी सुरू केले तरीसुद्धा चालेल परंतु सुरुवातीला मार्केटिंग चांगल्या रीतीने होणे गरजेचे आहे जेणेकरून लोकांना हे माहिती होईल की तुमच्याकडे स्टेशनरी सामान होलसेल दरात मिळते.

5 . स्टेशनरी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने –

– ट्रेड लायसन्स

– शॉप ॲक्ट लायसन्स

– GST रजिस्ट्रेशन

तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथील नियमानुसार इतर काही आवश्यक परवाने असतील तर त्याची चौकशी करू शकता.

6 . मार्केटिंग –

कुठल्याही व्यवसायासाठी मार्केटिंग ही फार महत्त्वाची गोष्ट असते –

– रिटेल स्टोअर मध्ये डिस्प्ले तसेच स्टेशनरी व्हरायटी स्टॉक, ग्राहक हाताळणी यांसारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टींचा परिणाम नक्कीच व्यवसायावर होत असतो.

– सोशल मीडिया मार्केटिंग हा मार्केटिंग साठी उत्तम पर्याय आहे.

– आपण आपली स्वतःची वेबसाईट सुरू करून त्यावर सुद्धा स्टेशनरी लिस्टिंग करू शकतो तसेच फेसबुक लाईव्ह इन्स्टा लाईव्ह या मार्फत सुद्धा स्टेशनरी वस्तूंची विक्री करू शकतो.

 अशा रीतीने स्टेशनरी हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment