Kisan Vikas Patra Yojana| किसान विकास पत्र योजना | KVP Scheme | Best Government Schemes 2025
पोस्ट ऑफिस अंतर्गत वेगवेगळ्या उद्देशाने विविध योजना जनतेसाठी राबवल्या जात असतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना. आजच्या ब्लॉगमध्ये आपण किसान विकास पत्र योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत…
Kisan Vikas Patra Yojana | किसान विकास पत्र योजना | KVP Scheme | Best Government Schemes 2025
Table of Contents
Kisan Vikas Patra Yojana| किसान विकास पत्र योजना
किसान विकास पत्र योजना हे 1988 मध्ये सुरू झालेली आहे.
किसान विकास पत्र योजनेचा कालावधी 9.5 वर्ष म्हणजेच 115 महिने आहे.
किसान विकास पत्र या योजनेसाठी किमान गुंतवणूक रक्कम 1 हजार रुपये आहे तर कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकरकमी जी रक्कम गुंतवली जाते त्या रकमेच्या दुप्पट रक्कम 115 महिन्याच्या शेवटी मिळू शकते. उदाहरणार्थ, सुरुवातीला 10 हजार रुपये गुंतवणूक केलेली असल्यास मुदत संपल्यानंतर 20 हजार रुपये मिळतात.
काही चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी सरकारमार्फत 2014 मध्ये जर गुंतवणुकीची रक्कम ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्डचा पुरावा देणे अनिवार्य केले आहे आणि गुंतवणुकी दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर इतर महत्त्वाचे पुरावे म्हणजेच उत्पन्नाचे पुरावे जसे की सॅलरी स्लीप, बँक स्टेटमेंट आयटीआय हे सुद्धा द्यावे लागतात.
व्याजदर : दरवर्षी ७.५% चक्रवाढ
कार्यकाळ : 9.5 वर्ष म्हणजेच 115 महिने
Kisan Vikas Patra Scheme Eligibility | किसान विकास पत्र योजना पात्रता :
किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
अल्पवयीन किंवा अस्वस्थ व्यक्तीच्या वतीने प्रौढ व्यक्ती अर्ज करू शकतात.
HUF आणि अनिवासी भारतीय ( NRI ) किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्र नाहीत.
Kisan Vikas Patra Scheme Benefits | किसान विकास पत्र योजना फायदे :
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत हमी परतावा मिळतो म्हणजेच मार्केटमध्ये काहीही चढउतार असले तरी सुद्धा हमी परतावा मिळेल, ही योजना शेतकरी समुदायासाठी मूळतः आहे.
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत ७.५ टक्के व्याजदर मिळते आणि तेही चक्रवाढ पद्धतीने.
किसान विकास पत्र योजना ही गुंतवणूक करण्याची सुरक्षित पद्धत आहे.
के व्हि पी प्रमाणपत्रावर कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे यासाठी हे प्रमाणपत्र तारण किंवा सुरक्षा म्हणून वापर करता येऊ शकते आणि व्याजदर सुद्धा तुलनेने यामध्ये कमी असतो.
नामांकन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी नियम :
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत कालावधी हा 115 महिन्यांचा असून लॉक इन पिरेड हा तीस महिन्यांचा आहे.
खातेधारकाच्या निधनानंतर किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय किसान विकास पत्र योजनेचे पैसे लवकर काढण्याची परवानगी नाही.
Kisan Vikas Patra Yojana documents| किसान विकास पत्र योजना कागदपत्रे :
Kisan Vikas Patra Yojana application| किसान विकास पत्र योजना अर्ज :
किसान विकास पत्र योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म मिळू शकतात किंवा ऑफलाइन पद्धतीने सुद्धा भरू शकता.
फॉर्ममध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जमा करावा आणि ज्यावेळी गुंतवणुकीची रक्कम भरायची असेल त्यावेळी गुंतवणुकीची रक्कम सुद्धा भरावी.