Lek Ladaki Yojana 2023 | documents required for Lake Ladki Yojana

लेक लाडकी योजना २०२३ | Lek Ladaki Yojana 2023 |लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती 

    जग इतके पुढे गेले असले तरीसुद्धा अजूनही काही लोक मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये भेदभाव करतात. काही लोक असे समजतात की मुलगा हाच वंशाचा दिवा असतो परंतु असे असले तरीसुद्धा मुलगी ही सुद्धा वंशाची पणती असते असे म्हणायला हरकत नाही. मुलगा मुलगी यांना समान वागणूक मिळावी, तसेच स्त्री भृण हत्या देखील काही ठिकाणी केली जाते. असे सगळे मुद्दे लक्षात घेता केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तर्फे महिलांसाठी किंवा मुलींसाठी काही योजना राबवल्या जात असतात.अशीच एक योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी सुरू केली आहे ती योजना

Advertisement
लेक लाडकी योजना “. लेक लाडकी योजनेबद्दल आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नक्कीच या माहितीचा फायदा तुम्हाला होईल …

लेक लाडकी योजना २०२३ | Lek Ladaki Yojana 2023 –

 • लेक लाडकी योजना या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये  केली आहे.
 • महाराष्ट्र राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या मुलींना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणे हे लेक लाडकी योजना सुरू करण्याचे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट असून ज्या मुली गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या आहेत अशा मुलींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
 • लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या वेगवेगळ्या वयोगटांनुसार वेगवेगळी आर्थिक मदत मुलींना त्यांचा जन्म झाल्यापासून ते त्या अठरा वर्षांच्या होईपर्यंत दिली जाणार आहे.
 • महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने तसेच महिलांचा विकास होण्यासाठी सुद्धा ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लेक लाडकी योजनेची पात्रता | Eligibility criteria of Lek Ladaki Yojana –

 • लेक लाडकी योजना योजना ही योजना मुलींसाठीच असून मुलीचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला असणे गरजेचे आहे तर मुलगी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे सुद्धा गरजेचे आहे.
 • लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत पात्र मुलीस ती अठरा वर्षाची होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांमधील मुलींनाच फक्त लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • महाराष्ट्र मधील फक्त गरीब कुटुंबातील मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • तसेच लाभार्थी मुलीचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
 • मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर तिच्या पुढील शिक्षणासाठी शासनातर्फे ७५ हजार रुपये मिळवायचे असल्यास आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्रे असणे सुद्धा अनिवार्य आहे.

लेक लाडकी योजनेचे फायदे | Benefits of Lek Ladaki Yojana –

 • लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला तिचा जन्म झाल्यापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत वेगवेगळ्या  टप्प्यावर आर्थिक मदत मिळणार आहे,ते पुढील प्रमाणे: –
 • मुलीचा जन्म झाल्यानंतर ५००० रुपये
 • मुलगी पहिली मध्ये असताना ४००० रुपये
 • सहावी मध्ये ६००० रुपये
 • अकरावी मध्ये ८००० रुपये
 • मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर ७५००० रुपये मिळणार आहेत.

अशाप्रकारे लाभार्थी मुलीला ती अठरा वर्षांची होईपर्यंत २३ हजार रुपये मिळणार आहे तर ती मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५ हजार  रुपये  मिळणार आहे , असे एकूण ९८ हजार रुपये इतका आर्थिक लाभ लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी मुलीस मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Necessary documents required for Lake Ladki Yojana –

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरत असताना पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

🔸मुलीचे जन्म प्रमाणपत्र

🔸रहिवासी प्रमाणपत्र

🔸पासपोर्ट साईज फोटो

🔸पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड

🔸मुलीचे आधार कार्ड

🔸पालकांचे आधार कार्ड

🔸उत्पन्नाचा दाखला

🔸जात प्रमाणपत्र

🔸बँक अकाउंट डिटेल्स

महत्वाची टीप | Important Note –

लेक लाडकी योजना या योजनेची घोषणा झालेली असली तरीसुद्धा अद्यापही या योजनेसाठी कुठलेही अधिकृत पोर्टल किंवा ऑनलाईन अर्ज कुठे भरता येईल ही माहिती मिळालेली नसून ज्यावेळी हा लेक लाडकी योजनेचा अर्ज कशा रीतीने भरता येईल याबद्दलची माहिती मिळेल त्यावेळी  नक्कीच माहिती कळवली जाईल.

Advertisement

Leave a Comment