Mahajyoti Free Tablet Yojana | विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट I महाज्योती फ्री टॅबलेट योजना I Best Government schemes information 2024

Mahajyoti Free Tablet Yojana | विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट I महाज्योती फ्री टॅबलेट योजना –

      आजचे युग डिजिटल युग आहे म्हणजेच हल्लीच्या जगामध्ये डिजिटल गोष्टी किंवा काही डिवाइसेस खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. शिक्षण घेत असताना हल्ली इंटरनेटचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मोबाईल ,कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट यांसारखे डिवाइस चा उपयोग करून विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रम अधिक जास्त चांगल्या प्रमाणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु सर्वच विद्यार्थी हे डिवाइस घेऊ शकतात असे नाही. परंतु आता सरकारतर्फे दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजना ( Mahajyoti Free Tablet Yojana ) सुरू करण्यात आली आहे, या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येणार आहे. जाणून घेऊ यात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

Mahajyoti Free Tablet Yojana | महाज्योती फ्री टॅबलेट योजना –

Mahajyoti Free Tablet Yo

– विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढील उच्च शिक्षणासाठी विविध परीक्षांसाठी ऑनलाईन क्लासेस करता यावेत यासाठी टॅबलेट खूप उपयुक्त ठरते परंतु सर्वच विद्यार्थ्यांना ती घेता येते असे नाही, परंतु महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येणार आहेत. 

– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यामधील 30 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. 

– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करताना कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. 

– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा फायदा ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

– या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबलेट तर मिळणार आहेत त्यासोबत प्रति दिवस सहा जीबी डेटा असणारी इंटरनेट सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी | Maharashtra Free Tablet Yojana –

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमधील 

 – ईमाव (OBC)

 – वीजभज (VJNT)

 – विमाप्र (SBC) 

या वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दहावी उत्तीर्ण असलेल्या व अकरावी मध्ये सायन्स शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक गुण | Eligible Points to avail Mahajyoti Free Tablet Yojana

– शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता 10 वी 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.

– ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता 10 वी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे फायदे | Mahajyoti Free Tablet Yojana Benefits –

– महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेचा फायदा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमधील पात्र विद्यार्थ्यांना होणार आहे.

– मोफत टॅबलेट सोबतच या योजनेअंतर्गत प्रति दिवस सहा जीबी अशा प्रकारे इंटरनेट सुविधा सुद्धा दिली जाते. 

– विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण घेता यावे यासाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत टॅबलेट देण्यात येणार आहेत. 

– शिक्षणासंदर्भामधील पुस्तके टॅबलेट मध्ये अपलोड करून दिलेली असतात.

– JEE, NEET तसेच CET यांसारख्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी ऑनलाइन कोचिंग ची सुविधा महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत मोफत देण्यात येणार आहे.

– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकास होण्यामध्ये मदत होऊ शकते.

– ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी टॅबलेटची मदत विद्यार्थ्यांना होऊ शकते.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक पात्रता | Mahajyoti Free Tablet Yojana Eligibility –

– महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची इच्छा असणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

– तसेच अर्जदार विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण करून इयत्ता अकरावीसाठी सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजने अंतर्गातील काही अटी | Terms –

– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर कुठल्याही शासकीय योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांनी टॅबलेटचा लाभ मिळवलेला नसावा, तसे असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

– या योजनेअंतर्गत टॅबलेट मिळाल्यावर विद्यार्थ्याने शिक्षण मध्येच सोडल्यास टॅबलेट परत करावा लागेल.

– या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या टॅबलेटची वॉरंटी एक वर्षाची असेल परंतु एक वर्षानंतर टॅबलेट मध्ये बिघाड आढळल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांचीच असेल, या योजनेअंतर्गत दुरुस्तीसाठी खर्च दिला जाणार नाही. 

– अर्जदार विद्यार्थ्याचे आई किंवा वडील शासकीय नोकरीमध्ये असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Mahajyoti Free Tablet Yojana Documents –

– आधार कार्ड

– रेशन कार्ड

– रहिवासी पुरावा (वीजबिल,घरपट्टी,भाडे पावती)

–  दहावी उत्तीर्ण मार्कशीट

– अकरावी सायन्स मध्ये प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र

–  शाळा सोडल्याचा दाखला

–  जातीचा दाखला

– नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट

– पासपोर्ट साईज फोटो

–  ई-मेल आयडी

– मोबाईल नंबर

– बँक पासबुक डिटेल्स

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज | Mahajyoti  free tablet Yojana application –

– महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य आहे, यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे.

– अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे त्यानंतर अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती व्यवस्थित वाचून नंतर अर्ज सबमिट करायचा आहे. 

– महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यास ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर संपर्क करण्यात येऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment