Maharashtra Ration card Details 2021- महाराष्ट्र्र रेशन कार्ड ऑनलाईन SRC नंबर कसा शोधायचा-किती धान्य मिळतं तसेच दुकानदार किती देतो-किती रुपयाने देतो-नवीन रेशनिंग नियम तसेच दुकानदाराची ऑनलाईन कंप्लेंट करायची सगळी माहिती फक्त २ मिंटात.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp
रेशन कार्डचा १२ अंकी SRC नंबर कसा काढायचा? How to get SRC Number online in Maharashtra यासाठी खालील व्हिडिओ पहा
● बीपीएल् व अंत्योदयचे धान्य महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते.
● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.
● रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार दुकानदाराला नाही.
● रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्ता बुडत नाही.
● बीपीएल् व अंत्योदयचे धान्य गेल्या महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.
● रेशनवर घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
● बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.
● रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. यावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भाव व देय प्रमाण उपलब्ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.
रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.Maharashtra Ration card Details- रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते
जर ऑनलाईन कंप्लेंट करायची असेल तर खालील व्हिडिओ पाहून नक्की कॉमेंट करा तुमचं नाव गुप्तं असतं.