ऑनलाईन RC नं . कसा काढायचा ? किती धान्य मिळतं ? रेशन दुकानदाराची तक्रार ?-Maharashtra Ration card Details 2021

Maharashtra Ration card Details 2021- महाराष्ट्र्र रेशन कार्ड ऑनलाईन SRC नंबर कसा शोधायचा-किती धान्य मिळतं तसेच दुकानदार किती देतो-किती रुपयाने देतो-नवीन रेशनिंग नियम तसेच दुकानदाराची ऑनलाईन कंप्लेंट करायची सगळी माहिती फक्त २ मिंटात.

aepds maharashtra
ration card maharashtra online check

मित्रांनो तुम्हाला रेशन वेळेवर मिळत नसेल किंवा तुम्हला वाटतंय तुमची फसवणूक होतेय, तुम्हाला तुमचा RC नंबर माहिती नाही, तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराची कंप्लेंट करायची आहे तर Maharashtra Ration card Details ही माहिती नक्की वाचा अतिशय महत्वाची माहिती आहे. शेअर करा. आपल्या अनेक बांधवाना फायदा होईल. रेशनिंग संदर्भात काही नियम आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे.

Advertisement

1} राशन कार्डचा १२ अंकी SRC नंबर कसा काढायचा? How to get SRC Number online in Maharashtra

Maharashtra Ration card Details आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी  खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas in Marathi-Part Time job In Marathi

रेशन कार्डचा १२ अंकी SRC नंबर कसा काढायचा? How to get SRC Number online in Maharashtra यासाठी खालील व्हिडिओ पहा

2}नवीन रेशनिंग नियम जे माहित पाहिजे | Ration Card Maharashtra in Marathi

● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.
● एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.
● रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.
● रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.
● बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.
● रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
● बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.
● रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. यावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भाव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
● रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते.

खास तरुण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी-Business ideas Marathi

3} रेशन दुकानदाराची तक्रार कुठे आणि कशी करावी | how to complaint ration shop in maharashtra

रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.Maharashtra Ration card Details- रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते
जर ऑनलाईन कंप्लेंट करायची असेल तर खालील व्हिडिओ पाहून नक्की कॉमेंट करा तुमचं नाव गुप्तं असतं.

 

Maharashtra Ration card Details
अतिशय महत्वाची माहिती आहे नक्की शेअर करा.

Advertisement

Leave a Comment