माझी कन्या भाग्यश्री योजना | Mazi Kanya Bhagyashree Yojana –

माझी कन्या भाग्यश्री योजना | Mazi Kanya Bhagyashree Yojana –

      केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना वेगवेगळ्या उद्देशाने राबवत असतात. त्यामध्ये काही योजना मुलींच्या कल्याणासाठी सुद्धा असतात, अशा योजनांपैकी एक योजना म्हणजे ” माझी कन्या भाग्यश्री योजना ” या योजनेबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत…

माझी कन्या भाग्यश्री योजना | Mazi Kanya Bhagyashree Yojana –

– माझी कन्या भाग्यश्री योजना १ जानेवारी २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे.

– माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे.

– माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे , मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींचे आरोग्य चांगले राहणे तसेच बालविवाह रोखणे हे आहे.

– माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभार्थी गरीब कुटुंबांमधील मुली असणार आहेत.

– माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर लाभार्थीच्या अकाउंट मध्ये काही लाभाची रक्कम जमा होईल.

– एकंदरीतच माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे मुलींना उज्वल भविष्यामध्ये मदत होऊ शकते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक पात्रता |

Mazi Kanya Bhagyashree Yojana Eligibility –

– माझी कन्या भाग्यश्री योजना १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेली असली तरी सुद्धा या योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ या दिवशी आणि या दिवसानंतर जन्मलेल्या मुलींनाच घेता येईल.

– लाभार्थी मुलीचे कुटुंबीय हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे.

– माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कुटुंबांमधील फक्त दोन मुलींनाच घेता येईल.

– जर समजा एखाद्या कुटुंबामध्ये पहिली मुलगी असेल आणि नंतर मुलगा झाला किंवा पहिला मुलगा असेल आणि नंतर मुलगी झाली तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

– तसेच एखाद्या कुटुंबामध्ये पहिल्या दोन मुली असतील आणि नंतर तिसरी मुलगी झाली तर पहिल्या दोन मुलींना मिळत असलेला लाभ सुद्धा रद्द करण्यात येतो.

– माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करत असताना माता किंवा पित्याचे कुटुंब नियोजन केल्याचा दाखला त्यासोबत जोडणे गरजेचे आहे.

– या योजनेअंतर्गत मुदत ठेव केलेली रक्कम तसेच व्याज मुलगी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच काढता येईल तसेच मुलीची दहावी झालेली असणे आणि मुलगी त्या वेळी अविवाहित असणे गरजेचे आहे.

– लाभार्थी मुलीच्या नावे बँकेमध्ये खाते उघडणे आवश्यक असेल तसेच मुदत ठेव रक्कम जमा केल्यानंतर बँकेकडून गुंतवणूक प्रमाणपत्र दिले जाते.

– या योजने अंतर्गत पहिल्या मुलीच्या जन्माच्या आत आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एक वर्षाच्या आत करणे गरजेचे राहील जर ही शस्त्रक्रिया एक वर्षानंतर केली गेली तरीसुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

– तसेच दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आई-वडिलांसाठी बंधनकारक राहील नाही तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

– मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर जे एक लाख रुपये मिळणार आहे, त्यापैकी दहा हजार रुपये हे मुलीच्या कौशल्य विकासासाठी खर्च करणे बंधनकारक असेल जेणेकरून भविष्यामध्ये मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल.

माझी भाग्यश्री कन्या योजना आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for Mazi Kanya Bhagyashree Yojana –

– मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र 

– अर्जदाराचे आधार कार्ड

– उत्पन्न दाखला

– रहिवासी पुरावा

– मोबाइल नंबर

– पासपोर्ट आकाराचा फोटो

– आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

–  जर पहिल्या मुलीसाठी लाभार्थी कुटुंबाने अर्ज केला असेल तर मुलीच्या जन्माच्या १ वर्षाच्या आत आई / वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला सादर करणे आवश्यक असेल.

– जर लाभार्थी कुटुंबाने दुसऱ्या मुलीसाठी अर्ज केला असेल तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ६ महिन्यांच्या आत आई-वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज |Mazi Kanya Bhagyashree Yojana Application –

– मुलीचा जन्म झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी करावी व जवळील अंगणवाडी सेविकेकडे अर्ज  करावा.

– माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणारे अर्ज राज्यांमधील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास)  यांच्या कार्यालयामधून उपलब्ध होतात.

– अर्जामधील माहिती व्यवस्थित रित्या भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी व हा अर्ज जवळील अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा.

– अंगणवाडी सेविका अर्जाची छाननी करतात आणि अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविकेकडे अर्ज सादर करतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका  अर्जाची व प्रमाणपत्रांची तपासणी करुन प्रत्येक नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी अर्ज सादर करण्यात येतात..

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म ऑनलाइन सुद्धा उपलब्ध आहे.

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

पालकांचे हमी पत्र – येथे क्लिक करा.

बालगृहे, शिशुगृहे किंवा महिला व बालविकास विभागाअंतर्गत इतर निवासी संस्था येथील अधिकारी व जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याकडे करावयाचा अर्ज- येथे क्लिक करा.

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये मिळणारे सर्व फायदे व इतर माहिती पुढील पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे –

येथे डाऊनलोड करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment