जगातील पहिली हात नसलेली धनुर्धारी…. ती ही आपली भारतीय…. आनंद महिंद्रा यांनी दिले कार देण्याचे आश्वासन…
जगामधील पहिली हात नसलेली धनुर्धारी ही आपल्या भारत देशामधील असून ही एक सोळा वर्षीय तरुणी आहे आणि तिचं नाव आहे शितल देवी. शितल देवी ही कश्मीरमधील एका छोट्याशा गावामधील आहे. शितल देवी हिचे वडील शेती करतात तर आई शेळ्या सांभाळते तर शितल देवीची बहिण शितलची सर्व काळजी घेते. शितल देवी ही ज्यावेळी लहान होती त्यावेळी तिला वाटत असे की, तिला शाळेत जाता येईल की नाही परंतु ती शाळेत सुद्धा गेली.ती तिच्या पायाच्या आधारे लिहीत असत आणि तिच्या मैत्रिणींनी सुद्धा तिला कधी वेगळे असे काही जाणवू दिले नाही. शाळा सुटल्यानंतर ती मैत्रिनींसोबत खेळत सुद्धा असत आणि एकदा तर ती चक्क झाडावर चढली… त्यावेळी सर्व मुली घाबरल्या परंतु ती घाबरली नाही. जेव्हा समाजामधील इतर लोक तिला हात नाहीत म्हणून तिच्याकडे बघत असतात तेव्हा तिला खूप वाईट वाटते. शितल देवी हिच्या मते ” कुणामध्येच काहीही कमतरता नसते फक्त जरूरत असते ती मेहनतीची…” खरंच खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे आणि आपल्यापुढे एक चांगला आदर्श सुद्धा आहे….
शितल देवी हिने अलीकडेच पार पडलेल्या चीनमधील हांगझोऊ येथील आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये सुद्धा उत्तम कामगिरी केली आहे.
शितल देवी हिने आपल्या देशासाठी सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके जिंकली आहेत.जगामधील पहिली हात नसलेली धनुर्धारी ” शितल देवी ” ही ठरली आहे. एक विशेष असं धनुष्य शितल देवी हिच्यासाठी तयार करण्यात आलेले आहे आणि हे धनुष्य पायाच्या सहाय्याने चालवले जाते. हात नसले तरीसुद्धा शितल देवी हिने उत्तम अशी कामगिरी करून जगापुढे एक वेगळा असा आदर्श निर्माण केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शितल देवी बद्दल पोस्ट शेअर केली आहे. शितल देवी या तरुणीचे कौतुक करत आनंद महिंद्रा यांनी तिला कार ऑफर केली आहे आणि तिच्या साठी ते कस्टमाईज सुद्धा करणार आहेत.बघा त्यांनी नेमकी काय ट्विट केलंय….
जॉईन करा Whatsapp वर | https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |