बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६५२ जागा | MCGM Recruitment 2023

MCGM Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या ६५२ जागा
परिचारिका पदाच्या ६५२ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

शैक्षणिक अर्हता

1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (10+2) उत्तीर्ण I

झालेला असावा.

2) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा. (3 किंवा 3½ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला | असावा.)

3) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत केलेले असावे. 4) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

5) उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी. किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तरावरील प्रमाणपत्रे किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम.एस.सी. आय. टी. किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणे किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराकडे सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने/तिने शासनाने विहित केलेली एम.एस.सी.आय.टी.ची परीक्षा नेमणूकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.

वयोमर्यादा

  1. अर्ज सादर करावयाच्या दिनांकास म्हणजेच दि. 21.03.2023 रोजी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे पर्यत व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 ते 43 वर्षे पर्यत.
  2. अगोदरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायम सेवेत असल्यास उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा नाही.
  3. माजी सैनिक व शारिरीकदृष्टया दिव्यांग असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 45 वर्षे

पर्यंत शिथिल करण्यात येईल.

  1. शासन निर्णयानुसार खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेता उपरोक्त पदांसाठी असलेली विहित वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.
  2. पदवीधर / पदवीकाधारक अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंत वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ६५२ जागा
परिचारिका पदाच्या ६५२ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२३ पासून दिनांक २१ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment