ई श्रम कार्ड योजना |E- Shram card information in Marathi

    आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी डेटा बेस तयार केला जात आहे आणि त्यासाठीच ई श्रम कार्ड काढले जात आहे, या कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती….

Advertisement

ई श्रम कार्ड म्हणजे काय ? What is e-shram card ?

– असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ई श्रम कार्ड देण्यात येणार आहे.

– या कार्डमुळे सरकारकडे या कामगारांचा एक डेटाबेस सुद्धा तयार होईल आणि कामगारांना योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा उपयोग सुद्धा होईल.

– कामगारांच्या सर्व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या पडताळणी केल्यानंतरच कामगारांना ई श्रम कार्ड मिळणार आहे.

– या कार्डवर एक युनिक नंबर सुद्धा असतो.

ई श्रम कार्डचे फायदे | Benefits of e- shram card –

– ई श्रम कार्ड मुळे पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ सुद्धा कामगारांना मिळणार आहे आणि पहिला वार्षिक प्रीमियम सुद्धा सरकारतर्फे भरला जाणार आहे.

– सरकार द्वारा येणाऱ्या योजनांचा लाभ कामगारांना थेट घेता येणार आहे.

– तसेच विविध चांगल्या अशा रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात.

– ज्या कामगारांकडे ई श्रम कार्ड असणार आहे त्यांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी सुद्धा अप्लाय करता येणार आहे.

– भविष्यामध्ये येणाऱ्या आपत्तीमुळे जर असंघटित कामगारांना काही आर्थिक मदत करायची झाल्यास हा डेटा सरकार साठी आणि कामगारांसाठी खूप उपयुक्त ठरेल.

–   नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल ( एनसीएस ) आणि ई श्रम च्या एकत्रीकरणामुळे हजारो ई-श्रम नोंदणीकृत कामगारांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.

ई श्रम कार्डसाठी पात्रता | Eligibility for E Shram Card –

– अर्जदाराची वयोमर्यादा 16 ते 59 वर्षे इतकी असावी.

– अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे.

– अर्जदार व्यक्ती आयकर भरणारा नसावा.

– तसेच अर्जदार हे  EPFO आणि ESIC चा सदस्य सुध्दा नसावा.

ई श्रम कार्डचे तोटे | Disadvantages of e- shram card –

– जर ई-श्रम कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला ते रद्द करावेसे वाटले  तर तसा पर्याय दिलेला नाही,त्यामुळे ह्या कार्ड साठी आपण पात्र असू तरच अर्ज करावा.

– जर विद्यार्थी असताना तुम्ही ई श्रम कार्ड बनवले असेल आणि भविष्यामध्ये संघटित क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार असाल तर या कार्डचा काहीही उपयोग होणार नाही.

– एखाद्या व्यक्तीचे पीएफ खाते असेल आणि त्या व्यक्तीने ई श्रम कार्ड बनवलेले असेल तर ईतर ठिकाणी अर्ज करण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते.

ई श्रम कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन । E Shram Card Online Registration  – 

– सर्वप्रथम ई श्रम पोर्टलवर जा.

https://eshram.gov.in/

– आता रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबरची आवश्यकता असेल.नंतर दिलेला कॅप्चा भरावा लागेल व OTP सुद्धा एंटर करावा लागेल.

– वरील माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.

– त्यानंतर पुढे सुद्धा आधार क्रमांक आणि तुमची इतर वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी. तुमचा आधार कार्ड वर जो फोटो आहे तोच फोटो या ई श्रम कार्ड वर सुद्धा असेल.

– ई श्रम कार्ड तयार झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून लॅमिनेट करून स्वतः जवळ ठेवू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment