शिवणकाम व्यवसाय कसा सुरू करावा | How to start sewing business | Sewing Business information in Marathi 

नमस्कार,

     तुम्हाला सुद्धा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे शिवणकला हे कौशल्य असेल तर शिवणकाम व्यवसाय नक्कीच चांगला व्यवसाय ठरू शकतो. शिवणकाम व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

     शिवणकाम हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला शिवणकला येणे खूप गरजेचे आहे. आपल्याला उत्तमरीत्या शिवणकाम येत असेल तर नक्की हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो त्यासाठी गरज आहे सध्या ट्रेंडिंग काय सुरू आहे हे जाणून घेण्याची आणि त्यानुसार आपल्या कलेमध्ये नवनवीन कौशल्यांची भर घालण्याची.

1 . व्यवसायासाठी ठिकाणाची निवड / Location for sewing business –

– शिवणकाम हा असा व्यवसाय आहे की जो अगदी आपल्या घरामधून सुद्धा सुरू केला जाऊ शकतो.

– परंतु जर तुमची जास्त गुंतवणूक करण्याची तयारी असेल आणि जास्तीत जास्त कस्टमर मिळवायचे असतील तर गर्दीच्या ठिकाणी किंवा मार्केट जवळ जागा भाड्याने घेऊन किंवा तुमची स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकता.

2 . शिवणकाम व्यवसायासाठी लागणारे आवश्यक साहित्य / Necessary materials for sewing business –

– शिवणकामासाठी शिलाई मशीन खरेदी करणे गरजेचे आहे परंतु शिलाई मशीन खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या शिलाई मशीन बद्दल मार्केट मधून माहिती मिळवा आणि त्यापैकी कोणते शिलाई मशीन आपल्याला परवडण्याजोगे आहे आणि व्यवस्थितरित्या काम सुद्धा करू शकते असे मशीन निवडा.

– शिलाई मशीन सोबतच पुढील साहित्य सुद्धा शिवणकामासाठी गरजेचे आहे :

मेजरींग टेप, पट्टी, मार्कर्स, टेलर खडू किंवा पेन, रोटरी कटर, फॅब्रिक ग्लू, दोरा, पिन, सुया, इस्त्री, कात्री, टेबल व इतर आवश्यक साहित्य..

3 . Branding/ ब्रॅण्डिंग –

– कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या व्यवसायाला साजेसे असे नाव देणे खूप गरजेचे असते.

– शिवणकाम व्यवसायाला सुद्धा तुम्ही शिवणकाम संबंधी किंवा तुमच्या आवडीचे परंतु ग्राहकांना लक्षात राहील असे नाव द्या.

4 . कोणत्या प्रकारचे शिवणकाम करू शकता / What kind of sewing can you do –

– लेडीज जेंट्स असे दोघांचेही ड्रेसेस शिवून देऊ शकता.

– त्याचबरोबर छोट्या मुला मुलींचे ड्रेसेस सुद्धा शिवून देऊ शकता.

– साड्या पिको फॉल करणे हे सुद्धा करू शकता.

– ब्लाउज आणि चोळ्या शिवणे.

– नऊवारी शिवणे.

शिवणकामासाठी काही हटके आयडिया –

– छोट्या बाळांसाठी रियूजेबल डायपर्स शिवू शकता.

– पाळीव प्राणी उदाहरणार्थ मांजर कुत्रा यांच्यासाठी सुद्धा कपडे शिवू शकता.

– फॅशनेबल मेटर्निटी वीअर

– कापडी पर्सेस शिवू शकता

– इतर कस्टमाईज कपडे शिवून देऊ शकता. 

– नामकरण सोहळ्यासाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी आकर्षक असे नावाचे बोर्ड सुद्धा बनवून देऊ शकता.

अशाप्रकारे विविध लेटेस्ट आयडिया शिवणकाम व्यावसाय करत असताना तुम्ही वापरू शकता आणि आपला व्यवसाय वाढवू शकता.

5 . शिवणकाम व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी /how to do marketing of sewing business – 

– जर समजा शिवणकामाचा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरामधूनच सुरू केला तर तुमच्या आसपासच्या लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल ची माहिती द्या, असे केल्यामुळे तुमच्या घराशेजारी तुम्हाला ग्राहक मिळतील आणि तुमच्या कामाची क्वालिटी आणि दर जर योग्य असेल तर हेच ग्राहक इतर ग्राहकांना सुद्धा सांगतील.

– शिवणकाम व्यवसायाच्या ठिकाणी आपण कोणकोणत्या प्रकारचे कपडे शिवून देऊ शकतो ही माहिती असणारा बोर्ड लावणे गरजेचे आहे, जेणेकरून लोकांना आपल्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळेल.

– विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकता तसेच व्यवसायाच्या नावाने पेज किंवा अकाउंट सुद्धा ओपन करू शकता आणि त्यावर आपण जे जे काम करतो ते सर्व त्यावर अपलोड करावे जेणेकरून ग्राहकांना तुमच्या कामाबद्दल आयडिया मिळेल.

– यूट्यूबच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही जे काही शिवता उदाहरणार्थ, ब्लाउज शिवत असाल तर त्याचा व्हिडिओ बनवू शकता आणि तो व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून युट्युब वरून सुद्धा चांगली अर्निंग करू शकता.

शिवणकाम व्यवसायासाठी महत्त्वाच्या काही टिप्स /Tips for sewing business –

– जे कपडे आपण शिवणार आहोत त्यांचे मेजरमेंट व्यवस्थित रित्या घ्यावेत.

– प्रत्येक ग्राहकाचे कपडे व्यवस्थित रित्या ठेवावेत.

– ग्राहकांना दिलेल्या वेळेमध्ये शिवणकाम पूर्ण करून द्यावे.

– कपड्यांची किंवा इतर कापडी उत्पादनाची पॅकेजिंग व्यवस्थित रित्या करावी.

– आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्या सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करावा.

– नवनवीन येणाऱ्या गोष्टी किंवा इतर लेटेस्ट आयडिया याबद्दल माहिती मिळवत राहणे सुद्धा गरजेचे आहे.

    अशाप्रकारे कमी गुंतवणुकीमध्ये शिवणकाम करण्याचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो परंतु हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे शिवणकाम करण्याचे कौशल्य म्हणजेच शिवणकला येणे गरजेचे आहे.

मोफत शिलाई मशीन योजना

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment