कोरफडीची शेती कशी करावी | Aloevera Farming | कोरफडीची शेती

   आपल्या सर्वांनाच माहित आहे की कोरफड ही एक औषधी वनस्पती असून कोरफडीचे खूप सारे उपयोग आहेत. कोरफडीचा उपयोग विविध उत्पादन बनवण्यासाठी सुद्धा केला जातो त्यामुळेच हल्ली कोरफडीला प्रचंड मागणी आहे. जर अशातच कोरफडीची शेती केली तर फायदेशीर ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात कोरफडीची शेती नक्की कशी करावी…

Advertisement

कोरफडीची शेती कशी करावी ?

कोरफडीची शेती करत असताना काही घटक लक्षात घेणे गरजेचे आहे, ते पुढील प्रमाणे : –

कोरफडीची शेती करण्यासाठी आवश्यक जमीन व हवामान –

– कोरफडीची शेती ही सिंचित व असंचित अशा दोन्ही ठिकाणी करता येते.

– कोरफडीची शेती ही काळ्या जमिनीमध्ये तसेच चिकन मातीमध्ये सुद्धा करता येत असली तरी सुद्धा वालुकामय जमिनीमध्ये कोरफडीची शेती करणे अधिक योग्य असेल.

– कोरफडी जवळ जास्त पाणी साचू न देणे गरजेचे आहे, कमी पावसाच्या भागात सुद्धा कोरफडीची शेती करता येऊ शकते.

– तीव्र थंडीमध्ये सुद्धा कोरफडीच्या झाडांची वाढ होऊ शकते.

कोरफडीच्या शेतीसाठी शेतजमीन तयार करणे व खत टाकणे –

– साधारणतः पावसाळा लागण्यापूर्वी शेताची नांगरणी करून त्यामध्ये शेण खत टाकावे.

– नंतर शेत जमीन व्यवस्थित तयार झाल्यावरच कोरफडीची शेती करण्यास सुरुवात करावी, असे केल्याने कोरफडीचे उत्पादन जास्त निघण्यामध्ये मदत होईल.

पेरणीची योग्य वेळ –

कोरफडीची शेती करण्यासाठी जुलै ते ऑगस्ट हा योग्य महिना मानला जातो.

लागवड पद्धत –

– कोरफडीचे रोप लावण्यासाठी शेतामध्ये खड्डे घेणे गरजेचे आहे.

– एका मीटर मध्ये साधारणतः दोन ओळी करू शकतात, आपल्याला खुरपणी करण्यासाठी कसे सोपे जाईल त्याचबरोबर कोरफडीची योग्य वाढ होण्यासाठी किती जागा लागू शकते आणि उत्पादन सुद्धा चांगले कसे निघेल, आपण काही अंतर पीक घेणार आहोत का हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन कोरफडीच्या दोन रांगांमधील अंतर ठरवायचे आहे.

कोरफड शेतीसाठी सिंचन –

– कोरफड शेतीसाठी कोरड्या स्थितीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, पावसाळी किंवा दमट हंगामात सिंचनाची गरज नसते. 

– पाण्याच्या उपलब्धतेनुसार हिवाळ्याच्या हंगामात पिकांना कमी सिंचन दिले जाऊ शकते.

– झाडांना जास्त पाणी दिले जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी जर तसे झाले तर शेतात पाणी साचू शकते ज्यामुळे पिकाचा नाश होऊ शकतो.

– शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी योग्य निचरा ठेवावा.

पीकाचे पोषण करण्याकरता खते –

– कोरफड पिकांसाठी शेणखत, गांडूळ खत किंवा हिरवळीचे खत यासारख्या सेंद्रिय खतांचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाते.

–  शेणखत 10-15 टन प्रति हेक्टर दिले जाऊ शकते ,जे माती तयार करताना द्यावे.

 -उच्च जेल उत्पन्न देणारे पीक घेण्यासाठी शेणखत वापरण्याचा सल्ला दिला जातो तर जास्त पानांचे उत्पादन मिळविण्यासाठी गांडूळ खत 2.5-5 टन प्रति हेक्टर या दराने वापरता येवू शकते.

तण काढणे –

– कोरफडीची झाडे ही पिकाच्या वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये तणांपासून मुक्त असावीत.

–  लागवडीनंतर एक महिन्याच्या आत पहिली खुरपणी  झाली पाहिजे, त्यानंतर आवश्यकतेनुसार खुरपणी केली जाऊ शकते. 

– वाळलेली आणि रोगट झाडे शेतातून काढून टाकावीत.

कोरफड शेतीसह आंतरपीक –

–  पहिल्या वर्षात कोरफड शेताच्या आंतरपिकामध्ये शेंगायुक्त झाडे जसे की क्लस्टर बीन, भुईमूग, तीळ, धणे, जिरे इ. वाढू शकतात. 

–   कोरड्या आणि अर्ध-शुष्क परिस्थितीत आंतरपीक यशस्वी होऊ शकते.

– आंतरपीक घेतल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते तसेच अतिरिक्त उत्पन्न मिळते.

– परंतु,दुसऱ्या वर्षी आंतर पिके लावू नयेत अन्यथा त्याचा परिणाम होऊन उत्पादनाचा दर्जा कमी होऊ शकतो.

काढणी /कापणी –

– कोरफड 18-24 महिन्यांत पूर्णपणे परिपक्व होते. एका वर्षाच्या आत झाडांना पिवळे फुले/ फळे येतात ज्यात असंख्य बीया असतात. 

– कापणी 8 महिन्यांनंतर सुरू केली जाऊ शकते. 

– भरपूर उत्पादन मिळण्यासाठी व व्यावसायिक कारणासाठी सुमारे 2 ते 5 वर्षांचा कालावधी लागतो.

 – बऱ्याच वेळा हाताने कापणी केली जाते. यात पाने खुडली जातात, आणि तुटलेली राइझोम जमिनीत सोडली जाते जी पुन्हा नवीन रोपासाठी उगवेल. 

उत्पादन –

सरासरी, एक हेक्टर बिगर सिंचन पिकातून कोरफड  उत्पादन 15-20 टन कोरफड आणि सिंचन पीक 30-35 टन पर्यंत उत्पन्न देऊ शकते.

   अशा रीतीने कोरफडीची शेती करता येऊ शकते आणि तिथपुरतच मर्यादित न राहता कोरफडीचा प्रोसेसिंग प्लांट सुद्धा टाकू शकतो तसेच इतर उत्पादने सुद्धा तयार करून त्यांचा व्यवसाय करता येऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment