Nursery business plan | नर्सरी बिझनेस प्लॅन –
जर तुम्हाला स्वतःला बागकाम आवडत असेल, फुलझाडे वनस्पती आपल्या आजूबाजूला असावे असे वाटत असेल तर नर्सरी बिझनेस हा तुमच्यासाठी नक्कीच योग्य असा बिजनेस ठरेल. ज्या गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो , ते काम आपण अधिक मन लावून आणि आनंदाने करतो आणि त्या कामांमध्ये थकवा देखील जाणवत नाही.तुमच्याप्रमाणेच असे कित्येक लोक आहेत ज्यांना घराभोवती फुल झाडे किंवा वनस्पती लावायला आवडतात.
ज्या लोकांच्या घरामध्ये झाडे लावण्यासाठी पुरेशी जागा नसते ते लोक गॅलरीमध्ये फुल झाडे किंवा वनस्पती लावतात. आज-काल फुलांच्या रोपांची मागणी तसेच इतर रोपांची मागणी झपाट्याने वाढत आहे, तसेच बोन्साय झाडांची मागणी देखील झपाट्याने वाढत आहे. अशातच नर्सरी बिझनेस ( Nursery business ) सुरू केला तर नक्कीच फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो आणि तुमच्या आवडीचे काम देखील तुम्हाला करायला मिळेल.
Table of Contents
Nursery business plan | नर्सरी बिझनेस प्लॅन –
१.कोणत्या प्रकारची नर्सरी सुरू करावी | Which type of nursery should be started ?
वनस्पतींचे देखील विविध प्रकार उपलब्ध आहेत आणि तुम्ही कोणत्या प्रकारची नर्सरी सुरू करावी हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी नर्सरीचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते.
- भाजीपाला नर्सरी
- फ्लॉवर नर्सरी
- फळ नर्सरी
- औषधी नर्सरी
- फॉरेस्ट नर्सरी
१.भाजीपाला नर्सरी –
आज-काल बाजारात जो भाजीपाला उपलब्ध असतो त्यामध्ये किंवा त्यावर खूप सारे कीटकनाशके मारलेली असतात. त्यामुळेच लोक ऑरगॅनिक भाजीपाल्याकडे वळत आहेत किंवा स्वतः घरी घरासाठी भाजीपाला करत आहेत. पालक, टोमॅटो, मुळा, रताळे, वाटाणे, वांगी, भोपळा, कांदे इत्यादीसारख्या रोपवाटिकेत वाढवता येणाऱ्या भाजीपाल्याच्या अनेक वनस्पती आहेत.
२. फ्लावर नर्सरी –
विविध पद्धतीची आणि रंगीबिरंगी फुलांची रोपे सुद्धा उपलब्ध आहेत. फुलांच्या रोपट्यांना सर्वात जास्त मागणी असते. गुलाब,मोगरा, जाई जुई, चमेली, शेवंती, झेंडू,जरबेरा,अबोली यांसारख्या फुलांच्या रोपांना प्रचंड मागणी आहे.
३.फळ नर्सरी-
बरेच लोक फळांची देखील जास्तीत जास्त झाडे लावणे पसंद करतात लोकप्रिय फळांच्या प्रजाती आहेत- डाळिंब, संत्री, आंबा, अंजीर, लिंबू, केळी, पपई, सफरचंद, ड्रॅगन फळ, नारळ आणि इतर बरेच फळे.
४.औषधी नर्सरी –
बऱ्याच आजारांवर उपचार करण्यासाठी औषधी वनस्पती खूप गुणकारी असतात.कोरफड सारख्या वनस्पती सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील वापरल्या जातात किंवा तुम्ही कोरफड डायरेक्ट चेहऱ्याला देखील ॲप्लाय करू शकतात. औषधी रोपवाटिकांमध्ये तुलसी, कोरफड, लेमनग्रास, कढीपत्ता यांसारख्या अनेक वनस्पतींचा समावेश होतो.
५.फॉरेस्ट नर्सरी –
या प्रकारच्या रोपवाटिकांमध्ये अशी रोपे उगवली जातात, जी भविष्यात मोठ्या झाडांमध्ये रूपांतरित होतील. नीलगिरी, पाइन, ओक, सागवान यांसारखी झाडे वन नर्सरीमध्ये वाढतात.
२.Requirements | नर्सरी साठी काही आवश्यक गोष्टी-
१. जमीन –
नर्सरी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य अशी आणि सुपीक जमीन शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी तुमच्या घराजवळ सुपीक जमीन असेल तर त्या जमिनीवर देखील तुम्ही नर्सरी सुरू करू शकता. नर्सरी सुरू करण्यासाठी खूप मोठी जागाच लागेल असे काही नाही. तुमची स्वतःची जागा असेल तर भाड्याने जमीन घेण्याचा खर्च देखील वाचेल.
काही प्रकारच्या वनस्पतींना वेगळ्या पद्धतीची माती लागते तर तुम्ही त्या पद्धतीची माती खरेदी करून त्याच जमिनीवर वेगवेगळ्या वनस्पती लावू शकता.
२.जमीन परवानगी –
जर तुम्ही जमीन कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी वापरणार असाल म्हणजे जसे की तुम्ही रोपवाटिका सुरू करणार आहात तर त्यासाठी जमिनीचा परवाना घेणे आवश्यक आहे. तुमच्या शहराच्या स्थानिक प्राधिकरणाकडून तुम्हाला कायदेशीर परवानगी दिली जाते.
३.कृषी परवाना –
रोपवाटिका सुरू करण्यासाठी कृषी परवाना देखील लागू शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी वेबसाईटला भेट देऊ शकता.
४.बिया आणि रोपे –
रोपवाटिका सुरू करण्यासाठी तुम्हाला बिया आणि रोपे खरेदी करणे आवश्यक राहील. बियांची पेरणी करताना किंवा बिया लावताना त्यामध्ये व्यवस्थित अंतर ठेवा जेणेकरून सर्व रोपांना योग्य तो सूर्यप्रकाश मिळेल आणि त्यांचे पोषण चांगल्या पद्धतीने होईल.
५.माती –
तुम्ही ज्या जमिनीवर रोपवाटिका सुरू करणार आहात तेथील मातीची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
६.साधी साधने –
नर्सरी मध्ये झाडे कापण्यासाठी किंवा त्यांना आकार देण्यासाठी काही साधनांची आवश्यकता राहील. तसेच नांगरण्यासाठी आणि फवारणीसाठी काही साधनांची आवश्यकता राहील.
७.रसायने आणि खते –
तुम्ही नर्सरी मध्ये लावलेल्या झाडांना संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी तसेच फुले आणि फळांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही काही कीटकनाशके आणि तणनाशके तसेच बुरशीनाशके फवारू शकता. परंतु जास्त प्रमाणात देखील फवारणी करू नका,कारण ते झाडांच्या आणि तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकतात. खतांमुळे झाडांच्या वाढीचा वेग वाढण्यास मदत होते, परंतु येथे तुम्ही रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांची निवड करा.
८. इतर लोकांना कामावर घेणे-
जर तुम्ही छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करत असाल तर नर्सरी मधील कामे जसे की गवत काढणे, छाटणी, कीटकनाशके फवारणी इत्यादी कामे तुम्ही स्वतः करून खर्च वाचवू शकता. परंतु जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करणार असाल तर तुम्ही काही लोकांना कामावर घेऊ शकता.
३. मार्केटिंग | Marketing –
- तुमच्या नर्सरी व्यवसायाबद्दल तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊ शकता.
- तसेच तुम्ही जर नर्सरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केला असेल तर इतर छोट्या नर्सरी मध्ये विजिट देऊन त्यांना तुमच्या नर्सरी बद्दलची माहिती सांगून त्यांना चांगले प्रॉफिट मार्जिन देऊ शकता आणि त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळवू शकता.
- तसेच तुम्ही ऑनलाईन देखील ज्या वेबसाईट उपलब्ध आहेत त्यावर रोपांची विक्री करू शकता.
- तुम्ही स्वतःची वेबसाईट देखील तयार करू शकता आणि त्यावरून रोपांची विक्री करू शकता.
- इतर सोशल मीडिया मार्केटिंग पद्धत वापरून चांगली मार्केटिंग करता येऊ शकते.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |