PM Vidyalakshmi Yojana I पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना I Best Government Schemes 2025
काही आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागते.सरकारमार्फत विविध योजना राबवल्या जातात.आजच्या ब्लॉग मध्ये “पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना” ( PM Vidyalakshmi Yojana ) या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत ..
PM Vidyalakshmi Yojana I पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना I Best Government Schemes 2025
Table of Contents
PM Vidyalakshmi Yojana I पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना
पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना ही योजना ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते.
भारतामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छित असणार्या विद्यार्थ्यांकरिता हमी मुक्त आणि तारण मुक्त कर्ज देणे हा पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेचा उद्देश आहे.
PM Vidyalakshmi Scheme eligibility I पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना पात्रता
अर्जदार विद्यार्थी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहेत.
१०+२ बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेली गुणवत्ता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
विद्यार्थी भारतात किंवा इतर देशात शिक्षण घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज करू शकतात.
दर्जेदार उच्च शिक्षण संस्था (QHEIs) आणि उच्च शिक्षण संस्था (HEIs) मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी
*वरील काही मूलभूत पात्रता आहेत,काही इतर पात्रता पूर्ण कराव्या लागू शकतात.
समाविष्ट संस्था :
NIRF क्रमवारीमध्ये QHEI, उच्च शिक्षण संस्था पहिल्या १०० मध्ये आहेत
आणि
NIRF क्रमवारीमध्ये राज्य सरकारी उच्च शिक्षण संस्था १०१-२०० व्या क्रमांकावर आहेत.
PM Vidyalakshmi Scheme Benefits I पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेचे फायदे
पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षण फी आणि इतर संबंधित खर्च यासाठी हमीमुक्त आणि तारण मुक्त कर्ज
विद्यार्थी एकाच वेळी 3 वेगवेगळ्या बँकांमध्ये अर्ज करू शकतात.
पंतप्रधान विद्यालक्ष्मी कर्ज पोर्टलवर ३८ बँका नोंदणीकृत असून त्या ८९ शैक्षणिक कर्ज योजना देतात.
व्याज अनुदान :
८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी स्थगिती कालावधीत १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ३% व्याज सवलत दिली जाते.
७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी थकबाकी असलेल्या डिफॉल्ट रकमेच्या ७५% ची क्रेडिट गॅरंटी ही दिली जाते.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत