Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) | शिक्षण शुल्क ,परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क या अंतर्गत मिळणार | Best Scholarships ( Freeships ) 2024
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) | शिक्षण शुल्क ,परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क या अंतर्गत मिळणार | Best Scholarships ( Freeships ) 2024
आजच्या ब्लॉगमध्ये आपण विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क तसेच इतर शुल्क शिक्षणासाठी भरावे लागते. परंतु पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी फ्रीशिप ( Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) या अंतर्गत अनुसूचित जातीच्या आणि नव बौद्ध विद्यार्थ्यांना या फ्रीशीप मार्फत लाभ मिळणार आहे.जाणून घेऊयात अधिक माहिती…
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) | पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी फ्रीशिप –
– या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे.
– शिक्षण व्यवस्थेमध्ये कमी होत असलेले विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवणे.
– उच्च शिक्षणाकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
– उच्च शिक्षणात मार्फत आर्थिक स्तर उंचावण्याकरता संधी उपलब्ध करणे.
– तसेच आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ येऊ नये.
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) | पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी फ्री शीप या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिली जाणारी रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक अकाउंट मध्ये डीबीटीच्या मार्फत जमा केली जाते.
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) | पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी फ्री शीप या योजनेचे लाभार्थी :
– अनुसूचित जाती, नव बौद्ध विद्यार्थी.
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) benefits| पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी फ्री शीप या योजनेचे फायदे :
– या योजनेमार्फत लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच इतर अनिवार्यशुल्क शासनाकडून परतफेड उपलब्ध करून दिली जाईल.
– या योजनेमुळे शिक्षण गळती कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते.
– या योजनेमुळे लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यामध्ये मदत होऊ शकते आणि त्यामुळे चांगली नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
– राज्यामधील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यामध्ये मदत होईल.
– शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल तसेच उच्च शिक्षण घेण्याकरिता आवड निर्माण होईल.
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) Eligibility Criteria | पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी फ्री शीप पात्रता :
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
– अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये.
– अर्जदार विद्यार्थी नव बौद्ध किंवा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
– सदर विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे, कुटुंबामधील इतर सदस्यांचे बँक अकाउंट या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
– अर्जदार विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत आहे ती संस्था शासकीय मान्यता प्राप्त असावी आणि महाराष्ट्रमधील स्थित संस्था असावी.
– अर्जदार विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता फक्त CAP माध्यमामधून प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
– पूर्ण अभ्यासक्रम कालावधीमध्ये फक्त एकदा अनुत्तीर्ण असणे ग्राह्य धरले जाणार आहे.
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) Documents | पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन कागदपत्रे :
– आधार कार्ड
– पासपोर्ट साईज फोटो
– रहिवासी दाखला
– जातीचा दाखला
– उत्पन्न प्रमाणपत्र
– मोबाईल नंबर
– ई-मेल आयडी
– जात पडताळणी प्रमाणपत्र
– परीक्षेची गुणपत्रिका
– दहावी किंवा बारावी परीक्षेची गुणपत्रिका
– वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
– वस्तीगृह प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )
– CAP फेरीवाटप पत्र
Post matric Tuition Fee and Examination Fee ( Freeship ) Application | पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी फ्री शीप अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.