Post office time deposit scheme | फक्त व्याजातून होणार 4.5 लाख रुपयांची कमाई…| Best saving schemes –

Post office time deposit scheme | फक्त व्याजातून होणार 4.5 लाख रुपयांची कमाई…| Best saving schemes –

आजच्या ब्लॉगमध्ये आपण पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेबद्दल ( Post office time deposit scheme ) माहिती बघणार आहोत. या योजनेसाठी काय अटी आहेत, पात्रता काय लागते तसेच कागदपत्रे काय लागतात अशी सर्व माहिती बघणार आहोत. चला तर सुरुवात करूयात…

Post office time deposit scheme | पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम –
Advertisement

Post office time deposit scheme
Post office time deposit scheme

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये कमी गुंतवणुकीपासून आपण सुरुवात करू शकतो. 

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये 6.9% ते 7.5% पर्यंत व्याजदर मिळू शकते. 

– या स्कीम मध्ये पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक आपण करू शकतो. 

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम अंतर्गत इन्कम टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळू शकतात.

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही स्मॉल सेविंग स्कीम असून शॉर्ट टर्म किंवा लॉन्ग टर्म साठी आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये १ वर्ष, २ वर्ष ,३ वर्ष आणि ५ वर्ष या प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो.

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

– तीन अडल्ट व्यक्ती जॉईंट अकाउंट सुद्धा ओपन करू शकतात. 

– दहा वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी सुद्धा या स्कीम अंतर्गत अकाउंट ओपन केले जाऊ शकते त्यांचे आई वडील किंवा पालक हे अकाउंट हाताळू शकतात. 

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम साठी कमीत कमी १०००  रुपये गुंतवणूक आवश्यक आहे तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूक केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत ते बंद केले जाऊ शकत नाही. 

व्याजदर

वर्षे व्याजदर
६.९%
७%
७.१%
७.५%

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम बद्दलचे काही मुद्दे | important points regarding post office time deposit scheme –

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम साठी अकाउंट उघडते वेळी असणारे व्याजदर हेच पुढील कालावधीसाठी लागू असेल. 

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम साठी व्याजदराचे कॅल्क्युलेशन तिमाही होते परंतु हे व्याज वर्षाच्या शेवटी अकाउंट वर जमा होते. 

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम साठी ज्या तारखेला अकाउंट उघडले जाते त्या तारखेपासून एक वर्षानंतर व्याज मिळते.

– 18 वर्षावरील कोणतीही भारतीय व्यक्ती पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम साठी अकाउंट उघडू शकते. 

– जर पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम साठी पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात परंतु ही गुंतवणूक जर पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असेल तर टॅक्स बेनिफिट मिळणार नाहीत.

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत होण्याच्या आधी जर पैसे काढले तर पेनल्टी बसू शकते. 

– मुद्दलाचे व्याज चेकने किंवा रोखीने दिले जाणार आहे. 20,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कोणतेही पेमेंट चेकने केले जाईल.

– जो कोणी टाइम डिपॉझिट अकाउंटच्या मुदतपूर्तीनंतरही रक्कम काढत नाही त्याला कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये कोअर बँकिंग सोल्यूशन असल्यास, टाईम डिपॉझिटचे त्याच मुदतीसाठी रिन्यूअल  केले जाऊ शकते जे ओरिजनली निवडले गेले होते. POTD व्याज दर रिन्यूअल केल्यानंतर मॅच्युरिटीवर लागू होणार आहे.

कॅल्क्युलेशन्स

प्रति दिवस – 2740 रुपये 

गुंतवणूक – 10,00,000 रुपये 

एका वर्षामध्ये 2740 रुपये प्रति दिवस बचत करून जर दहा लाख रुपये पाच वर्षांसाठी पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवले तर…

व्याजदर – 7.5% 

गुंतवणुकीचे वर्ष – 5

गुंतवणूक केलेली रक्कम – 10,00,000 रुपये 

मिळणारे व्याज – 4,49,948 रुपये 

मिळणारी एकूण रक्कम – 14,49,948 रुपये 

Documents Required post office time deposit scheme | पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

आवश्यक कागदपत्रे खाते उघडण्यासाठी पुढील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. 

– पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेचा भरलेला अर्ज 

– पासपोर्ट साईज फोटो 

– ओळखीचा पुरावा: पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र 

– पत्ता पुरावा: पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स 

– उत्पन्नाचा पुरावा: मागील तीन महिन्यांच्या पगाराच्या स्लिप किंवा अलीकडील सहा महिन्यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट

Premature Withdrawal | प्री मॅच्युअर विड्रॉल –

– पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटिवेशन अंतर्गत पैसे गुंतवल्यास सहा महिन्यांपूर्वी हे अकाउंट बंद केले जाऊ शकत नाही. 

– सहा महिने ते एक वर्ष यादरम्यान अकाउंट बंद केले तर गुंतवणुकीवर सेविंग अकाउंट वर असलेल्या व्याजदराच्या हिशोबाने रिफंड मिळेल. 

– सध्याचा व्याजदर गृहीत धरल्यास 2,3 आणि पाच वर्षाचे अकाउंट जर एक वर्षात बंद केले तर 2 टक्के व्याजदर कापून पैसे रिटर्न मिळतील. समजा 7% या हिशोबाने व्याजदर मिळत असेल तर प्री मॅच्युअर क्लोजर च्या वेळी 5 टक्के या दराने व्याजदर मिळेल. याच प्रकारे जर 7.5 टक्के दराने व्याज मिळत असेल तर प्री मॅच्युअर क्लोजर च्या वेळी 5.5% दराने व्याज मिळेल.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment