Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana | 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा | PMJJBY scheme| best schemes 2025

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana | 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा | PMJJBY scheme| best schemes 2025

    आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणती घटना कधी घडेल हे सांगता येत नाही आणि म्हणूनच आवश्यकता असते ती विमा काढण्याची. परंतु काही विमा कंपन्यांचा प्रीमियम खूप महाग असतो त्यामुळे बरेच लोक विमा काढत नाहीत. असे न करता योग्य ते विमा काढून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा एका विमा योजनेबद्दल माहिती बघणार आहोत यासाठी 436 रुपये भरून दोन लाखांपर्यंतचा विमा मिळू शकतो आणि या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana | 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा | PMJJBY scheme| best schemes 2025

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना :

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी जीवन विमा संरक्षण दिले जाते. 
  • ही योजना एक वर्षाची विमा संरक्षण असून दरवर्षी नूतनीकरण सुद्धा करता येते. 
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बँकेमार्फत किंवा पोस्ट ऑफिस द्वारे दिली जात असून जीवन विमा कंपन्यांमार्फत प्रशासित केली जाते. 
  •   बँका किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातेधारक असलेले आणि 18 ते 50 वर्ष वयोगट असलेले व्यक्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी सहभागी होऊ शकतात. 
  • नूतनीकरण: दरवर्षी (1 जून ते 31 मे). 

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana Benefits | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे :

  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत पात्र सदस्यांना दोन लाखांपर्यंत एक वर्षाचे टर्म लाइफ कव्हर मिळते. कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूला कवर करते. 
  • दरवर्षी 436 रुपये इतका प्रीमियम भरावा लागत असून हा प्रीमियम विमाधारकाच्या बँकेमधून किंवा पोस्ट ऑफिस खात्यातून दरवर्षी आपोआप वजा केला जातो.

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana eligibility | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची पात्रता :

  • अर्जदाराचे वय हे 18 ते 50 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदाराचे पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. 

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana documents | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड 
  • व्यवस्थित भरलेला फॉर्म 
  • बँक अकाउंट डिटेल्स 
  • आणि इतर आवश्यक कागदपत्र

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Pradhanmantri jivan Jyoti Bima Yojana Application process | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अर्ज प्रक्रिया :

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. 

ऑफलाइन :

स्टेप १: पुढील लिंकवर क्लिक करून “संमती-सह-घोषणा फॉर्म” डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट घ्या:https://www.jansuraksha.gov.in/Files/PMJJBY/English/ApplicationForm.pdf#zoom=250

स्टेप २: 

अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज सबमिट करा. अधिकाऱ्यांमार्फत पोच पावती स्लिप कम विमा प्रमाणपत्र मिळेल.

ऑनलाईन :

बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा उपयोग करून विमा काढता येऊ शकतो. 

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version