PVC pipe Anudan Yojana| पीव्हीसी पाईप अनुदान योजना | PVC pipe subsidy schemeI Best Government Schemes 2024 –

PVC pipe Subsidy Scheme | पीव्हीसी पाईप अनुदान योजना | PVC pipe Anudan Yojana –

      पीव्हीसी पाईप अनुदान योजना ( PVC pipe Anudan Yojana ) या योजनेबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये आपण माहिती बघणार आहोत. पीव्हीसी पाईप अनुदान योजनाही महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत राबविण्यात येत असून या योजनेमुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप खरेदी करण्यामध्ये अनुदान मिळणार आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

पीव्हीसी पाईप अनुदान योजना | PVC pipe Anudan Yojana –

– पीव्हीसी पाईप अनुदान योजना महाराष्ट्र कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येते. 

–  शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी पीव्हीसी पाईप ची आवश्यकता असते परंतु आर्थिक कारणांमुळे बरेच शेतकरी पीव्हीसी पाईप खरेदी करू शकत नाही, या योजनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप खरेदी करण्यामध्ये आर्थिक मदत होणार आहे. 

–  शेतकऱ्यांना पाईप खरेदीवर 50 टक्के अनुदान पीव्हीसी पाईप अनुदान योजनेअंतर्गत दिले जाईल.

– पीव्हीसी पाईप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे 50% अनुदान हे अंदाजे 15000 रुपयांपर्यंत असेल.

पीव्हीसी पाईप योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान | Subsidy –

– जर शेतकऱ्याने एचडीपी पाईप साठी अर्ज केला तर प्रति मीटर 50 रुपये आणि जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान दिले जाते. 

– जर शेतकऱ्यांनी पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला तर कमाल 500 मीटर पाईपसाठी प्रति मीटर 35 रुपये अनुदान मिळते.

पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी पात्रता | eligibility for PVC pipe subsidy scheme –

– पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याकरता अर्जदाराकडे जमीन असणे आवश्यक आहे आणि सातबारा 8 अ असणे आवश्यक आहे. जमीन अर्जदाराच्या नावावर असायला हवी.

– तसेच पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास शेतामध्ये पाण्याचे स्रोत जसे की बोअरवेल, विहीर , शेततळे किंवा इतर पाण्याचे स्रोत असणे आवश्यक आहे आणि त्याची नोंद शेतीच्या सातबारावर सुद्धा असावी. 

– पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याकरता शेतकऱ्याकडे एक हेक्टर किंवा एक एकर जमीन असणे आवश्यक आहे.

पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |  Documents required for PVC pipe anudan Yojana  –

– आधार कार्ड 

– पॅन कार्ड 

– सातबारा आठ अ 

– मोबाईल नंबर 

– ई-मेल आयडी 

– रहिवासी प्रमाणपत्र 

– बँक पासबुक

– आणि इतर आवश्यक कागदपत्रे.

पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा | application for PVC pipe anudan Yojana –

–  सर्वप्रथम महाराष्ट्र कृषी विभागाच्या पोर्टलवर ( Mahadbt.in ) पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याकरता जावे.

– यानंतर या वेबसाईटवर जाऊन पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी अर्ज करा. 

– अर्ज करत असताना सर्व माहिती अचूक भरायची आहे. 

– अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे. 

– त्यानंतर अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करावा आणि सबमिट करावा. 

– महाराष्ट्र कृषी विभाग लॉटरी द्वारे पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी पात्र उमेदवारांची निवड करतात, तसा मेसेज आपल्या मोबाईलवर किंवा महाडीबीटी पोर्टल अकाउंट वर मिळतो.

– जे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतात त्यांनी सातबारा आठ अ प्रत आणि पीव्हीसी पाईप ज्या दुकानामधून खरेदी केले आहेत त्या दुकानाचे कोटेशन बिल व बँक पासबुक महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे लागतात त्यानंतर अनुदान पात्र उमेदवाराच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

   अशा रीती PVC पाईप अनुदान योजनेमुळे ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना नक्कीच पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी हातभार लागणार आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version