The Inland Waterways Authority of India Internship Scheme | IWAI Internship | विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी…| Best internships 2024 –

The Inland Waterways Authority of India Internship Scheme | IWAI Internship | विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी…| Best internships 2024 –

     इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया [ Inland Waterways Authority of India (IWAI) ] – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वैधानिक संस्थेने “द इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया इंटर्नशिप स्कीम ( The Inland Waterways Authority of India Internship Scheme) ” नावाची योजना सुरू केली आहे. हा इंटर्नशिप प्रोग्रॅम इंटर्न्सना मॅक्रो लेवलवर इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विकासाशी परिचित होण्यासाठी एक उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देतो.

द इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया इंटर्नशिप स्कीम ( The Inland Waterways Authority of India Internship Scheme)

Objectives of The Inland Waterways Authority of India Internship Scheme | ऑब्जेक्टिव्ह –

– या इंटर्नशिप मुळे विद्यार्थ्यांना IWAI कार्याशी जोडले जाण्याची परवानगी मिळते आणि याचा दोघांनाही फायदा होतो. 

– इंटर्नला IWAI च्या कामकाजाविषयी जाणून घेण्याची, मॅक्रो लेव्हलवर भारताच्या अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक (IWT) च्या विकासाची एकूण प्रक्रिया समजून घेण्याची, समस्यांना तोंड देण्याची आणि इनपुट, एनालिसिस, रिपोर्ट रायटिंग, प्रपोजल प्रिपरेशन वर्क तयार करण्याच्या कामात योगदान देण्याची संधी मिळेल.

Eligibility | पात्रता –

 – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून (राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय) डिग्री/PG डिग्री पूर्ण केलेली असणे किंवा करत असणे आवश्यक आहे.

– पदवीधरांना बारावीत किमान ७५% गुण असणे आवश्यक आहे. 

– पीजी विद्यार्थ्यांनी पदवीमध्ये ६०% गुण मिळवलेले असावेत. 

– रिसर्च स्कॉलर्सने पीजी पदवीमध्ये किमान ६०% गुण मिळवलेले असावेत.

Remuneration | मानधन –

 – पदवीधरांसाठी ₹ 10,000/- आणि पोस्ट ग्रॅज्युएट/ रिसर्च स्कॉलर्ससाठी दरमहा ₹ 20,000/- त्यांच्या इंटर्नशिपच्या समाधानकारक कॉम्प्लिशन पूर्ण केल्यावर देय असेल.

Note –

शेवटच्या महिन्याचे मानधन इंटर्नने रिपोर्ट/पेपर सादर केल्यावर दिले जाईल. इंटर्न्स त्या महिन्यातील एकूण कामकाजाच्या दिवसांच्या तुलनेत कार्यालयात हजेरीच्या दिवसांच्या संख्येइतकेच मानधनासाठी पात्र असतील.

Experience Certificate | अनुभव प्रमाणपत्र – 

इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्टिफिकेट IWAI द्वारे योजनेच्या गाईडलाईनच्या परिशिष्ट-B मध्ये एनक्लोजड स्वरूपात जारी केले जाईल.

Note: त्यांच्या संबंधित विभागातील डायरेक्टर/डायरेक्टर इन्चार्ज लेव्हल वरील अधिकाऱ्यांकडून त्यांचा रिपोर्ट/पेपर आणि त्याचे इव्हॅल्युएशन सादर केल्यावर प्रमाणपत्र जारी केले जाईल.

Documents required for The Inland Waterways Authority of India Internship Scheme | आवश्यक कागदपत्रे –

इंटर्नशिपमध्ये सामील होताना :

– संस्थेतील इंटर्नचे स्टेटस दर्शविणारे HOD/प्राचार्य यांचे पत्र. 

– HOD / प्राचार्य यांच्याकडून “नो ऑब्जेक्शन”. 

– डिक्लेरेशन ऑफ सिक्रसी (इंटर्नशिपसाठी रिपोर्टिंग पूर्वी सादर करणे)

इंटर्नशिप पूर्ण होण्याच्या वेळी :

– इंटर्नशिपच्या शेवटी दिलेल्या विषयावरील रिपोर्ट/पेपर. 

– संबंधित HoD ला मेंडेटरी फीडबॅक.

Duration of The Inland Waterways Authority of India Internship Scheme|  कालावधी:

 इंटर्नशिपचा कालावधी किमान कालावधी एक महिना आणि जास्तीत जास्त तीन महिने असू शकतो. ऑथॉरिटीने ठरवल्यानुसार हा कालावधी असेल परंतु सहा महिन्यापेक्षा जास्त नसेल. इंटर्नने इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतरच सर्टिफिकेट मिळेल.

Offline application for The Inland Waterways Authority of India Internship Scheme | ऑफलाईन अर्ज –

इनलँड वॉटरवे अथॉरिटी ऑफ इंडिया इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी पुढील प्रमाणे प्रक्रिया करावी :

– अधिकृत बुलेटिनच्या Annexure-A मध्ये नमूद केल्यानुसार अर्ज भरा.

– अर्जदारांनी अर्जासोबत त्यांचे सीव्ही देखील जोडणे आवश्यक आहे. 

– अर्ज भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या सचिव, A-13, सेक्टर-1, नोएडा-201301 यांना पाठवले पाहिजेत. – अर्जदारांनी इंटरेस्ट असलेले क्षेत्र देखील स्पष्टपणे सूचित केले पाहिजे.

Exclusions – 

– IWAI मध्ये इंटर्नशिप ही नोकरी किंवा नोकरीसाठी कोणतेही आश्वासन नाही. 

– इंटर्न्सना कोणतीही राहण्याची सोय दिली जाणार नाही. 

– उमेदवाराची कामगिरी गुणवत्तेनुसार नसल्यास IWAI द्वारे एक महिन्याची नोटीस देऊन इंटर्नशिप समाप्त केली जाऊ शकते. 

– इंटर्नने त्यांच्या ऑफरमध्ये नमूद केलेला आवश्यक कालावधी पूर्ण केला नाही तर कोणतेही प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही.

Other key points of The Inland Waterways Authority of India Internship Scheme :

– इंटर्न्सना त्यांची इंटर्नशिप समाधानकारक पूर्ण केल्यावर आणि त्यांच्या संबंधित विभागातील डायरेक्टर/डायरेक्टर इन्चार्ज लेव्हल वरील अधिकाऱ्यांकडून त्यांचा रिपोर्ट/पेपर आणि त्याचे इव्हॅल्युएशन सादर केल्यावर त्यांना प्रमाणपत्रे दिली जातील.

– इंटर्नला स्वतःचे लॅपटॉप असणे आवश्यक आहे. 

– IWAI इंटर्न्सना वर्किंग स्पेस उपलब्ध करून देईल.

– इंटर्नशिपसाठी रिपोर्टिंग पूर्वी इंटर्न्सनी ऑथेरिटीला डिक्लेरेशन ऑफ सिक्रीसी देणे आवश्यक आहे. 

– इंटर्न्सनी इंटर्नशिपच्या शेवटी दिलेल्या विषयावरील रिपोर्ट/पेपर संबंधित विभाग प्रमुखांना सादर करणे आवश्यक आहे. 

* 2024-25 या वर्षात IWAI मध्ये प्रशिक्षित होणारे इंटर्न पुढीलप्रमाणे आहेत:

– अंडरग्रेजुएट (UG) : 10.

– पोस्ट ग्रॅज्युएट/रिसर्च स्कॉलर (PG) : 15 .

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा. 

अधिकृत वेबसाईट ( Official website ) – येथे क्लिक करा.

नोटिफिकेशन आणि Annexure – A : येथे क्लिक करा. 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version