Ropvatika Yojana | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना | Punyashlok Ahilyabai Holkar Ropvatika Yojana 2020| Best Government Schemes –
आजच्या ब्लॉगमध्ये आपण पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेबद्दल ( Ropvatika Yojana ) माहिती जाणून घेणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेमुळे भाजीपाला उत्पादनामध्ये वाढ होण्यास तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यामध्ये मदत मिळते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…
Ropvatika Yojana | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना –
Table of Contents
– पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेला 9 सप्टेंबर 2020 रोजी शासन मान्यता दिली गेलेली आहे.
– या योजनेमुळे भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीमध्ये सुद्धा हातभार लागु शकतो.
– तसेच या योजनेचे उद्दिष्ट कीडमुक्त आणि उच्च दर्जाची रोप निर्मिती करणे हे सुद्धा आहे.
– पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत मिरची, वांगी ,कोबी ,टोमॅटो ,फुलकोबी, कांदा इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी करता येते.
Eligibility | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना पात्रता –
– अर्जदाराकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे गरजेचे आहे.
– अर्जदार व्यक्तीकडे स्वमालकीची कमीत कमी 0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
– यापूर्वी कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेचा फायदा मिळणार नाही त्यासोबत खाजगी रोपवाटिका धारक तसेच शासना कडून लाभ न घेता उभारणी केलेल्या खाजगी रोपवाटिका, पोखरा आणि इतर कुठल्याही योजनेअंतर्गत संरक्षित क्षेत्र शेडनेट आणि हरितगृह यांसारख्या घटकांचा लाभ घेतलेले लाभार्थी ,राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान याअंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.
Ropvatika Yojana Selection of Beneficiaries | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना लाभार्थ्यांची निवड –
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करत असताना पुढीलप्रमाणे प्राधान्य दिले जाणार आहे :
प्रथम प्राधान्य – महिला कृषी पदवीधारकांना
द्वितीय प्राधान्य – महिला बचत गट किंवा महिला शेतकरी
तृतीय प्राधान्य– अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी किंवा शेतकरी गट
अ .क्र . | घटक | क्षेत्र /संख्या | मापदंड (रु .) | प्रकल्प खर्च | अनुदान रक्कम |
१ | ३.२५ मी. उंचीचे flat type शेडनेट गृह (सांगाडा उभारणी ) | १००० चौ.मी. | ३८० प्रति चौ.मी. | ३,८०,००० | १,९०,००० |
२ | प्लास्टिक टनेल | १००० चौ.मी. | ६० प्रति चौ.मी. | ६०,००० | ३०,००० |
३ | पॉवर नॅपसॅक स्प्रेयर | १ | ७६०० | ७६०० | ३,८०० |
४ | प्लास्टिक क्रेटस | ६२ | २०० | १२,४०० | ६,२०० |
५ | एकूण | ४,६०,००० | २,३०,००० |
Documents required for Ropvatika Yojana | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
– बँक खाते पासबुक
– ७/१२ उतारा , ८-अ
– स्थळ दर्शक नकाशा
– चतु :सीमा
– आधार कार्ड ची छायांकीत प्रत
– संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी)
– हमी पत्र
– कृषी पदवी बाबतची कागद पत्रे
– शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र .
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज कुठे करावा | Application for Ropvatika Yojana –
https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवरून अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालया मधून अर्ज करावा.
रोपवाटिका उभारणी करण्यासाठी कधीपासून सुरुवात करावी ?
– रोपवाटिकेची उभारणी तालुका कृषी अधिकारी यांच्यातर्फे पूर्वसंमती मिळाल्यावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेचा लाभार्थी सुरू करू शकतो.
– तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत कृषी अधिकाऱ्यांकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत काम सुरू करणे आवश्यक आहे तर रोपवाटिका उभारणी तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करणे सुद्धा आवश्यक आहे.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |