Shabari Gharkul Yojana | शबरी घरकूल योजनेमध्ये मोठा बदल ,आता घरकुलाला 2.5 लाख अनुदान …| शबरी घरकुल योजना

Shabari Gharkul Yojana | शबरी घरकूल योजनेमध्ये मोठा बदल ,आता घरकुलाला 2.5 लाख अनुदान …| शबरी घरकुल योजना

    जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात त्यापैकीच एक योजना म्हणजे शबरी घरकुल योजना. ज्या लोकांना राहण्यासाठी पक्के घर नाही त्या लोकांसाठी ही योजना असून या योजनेअंतर्गत घरकुलासाठी अनुदान देण्यात येते. शबरी घरकुल योजने साठी पात्रता काय,कागदपत्रे काय लागतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

Advertisement
Shabari Gharkul Yojana

– राज्य शासनामार्फत ज्या लोकांना राहण्यासाठी पक्के घर नाही जे लोक झोपडीमध्ये राहतात किंवा इतर ठिकाणी राहतात अशा अनुसूचित जमाती मधील लोकांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होते.

– शबरी घरकुल योजने अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि शासन निर्णयानुसार ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात राबवणे अपेक्षित होते.

– 10 फेब्रुवारी 2016 रोजी शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागामधील गृहनिर्माण कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष इंदिरा आवास योजनेचे रूपांतर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षामध्ये करण्यात आलेले आहे.

– आणि त्यानुसारच राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत आदिवासी विकास विभाग व राज्य शासन विभाग, ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण घरकुल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते.

– शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी ही या कक्षांद्वारे ग्रामीण भागात करण्यात येते आहे परंतु शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी शहरी भागात करण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी ही संबंधित महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत यांच्यामार्फत करण्यासाठी आदिवासी विकास विभागाद्वारे नगर विकास विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

– नगर विकास विभागाने आदिवासी विकास विभागाच्या या प्रस्तावास सहमती दर्शवली असून त्यानुसार मार्गदर्शक सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत.

– आपल्या राज्यांमधील शहरी भागामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या ज्या ज्या लोकांकडे स्वतःची घरे नाहीत त्याचबरोबर जे लोक झोपड्यांमध्ये, मातीच्या घरात किंवा इतर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या निवाऱ्यामध्ये राहतात अशा अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकते.

– अर्जदार महाराष्ट्र राज्याचा पंधरा वर्षापासून रहिवासी असणे गरजेचे आहे.

– अठरा वर्षे वय पूर्ण असावे.

– अर्जदार अनुसूचित जमातीचे असावे.

– अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर असलेले पक्के घर नसावे.

– घर बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.

– अर्जदाराने इतर कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा.

– अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे.

–  लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही ३ लाख रुपयांपर्यंत असावी.

* 28 मार्च 2013 रोजी आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे घरकुल बांधकामाचे चटई क्षेत्र २६९.०० चौरस फूट इतके असणार आहे.

– शबरी घरकुल योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये अनुदान लाभार्थ्यास मिळेल आणि ही रक्कम पुढील प्रमाणे चार टप्प्यांमध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

१ . घरकूल मंजूरी – ४०,०००/- रुपये

२ . प्लिंथ लेवल – ८०,०००/- रुपये

३. लिंटल लेवल – ८०,०००/- रुपये

४ .घरकूल पूर्ण – ५०,०००/- रुपये

एकूण – २,५०,०००/- रुपये

– रहिवासी प्रमाणपत्र

– पासपोर्ट साईज फोटो

– अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र 

– उत्पन्नाचा दाखला

– आधार कार्ड

– रेशन कार्ड

– घरकूल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा

– कॅन्सलड चेक किंवा पासबुकची झेरॉक्स 

लाभार्थी प्राधान्यक्रम

– जातीय दगंलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती

– अॅट्रोसिटी अॅक्टनुसार पिडित व्यक्ती

– विधवा किंवा परित्यक्त्या महिला

– आदिम जमातीची व्यक्ती

बांधकाम यंत्रणा-

– लाभार्थ्यांनी स्वतःच बांधकाम केले तर त्यांना प्राधान्य देण्यात यावे.

– नगरपंचायत/नगरपरिषद / महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी जर स्वतः बांधकाम करु शकत नसतील तर अशावेळी महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यांनी आपल्याकडील बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलांचे बाधकाम करावे.

– महानगरपालिका उक्त योजना राबविण्यास सक्षम असून, त्यांनी आपल्या बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलांचे बाधकाम करावे.

– जमीनींच्या कमतरतेमुळे व अति किंमतीमुळे महानगर क्षेत्रात (Metro cities) जागा घेऊन घर बांधणे शक्य होत नसल्याने शासकीय योजना/खाजगी विकसक यांच्याकडून बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पांमध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेमार्फत असणारे अनुदान देण्यात येईल.

– शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना व्यक्तीश: किंवा टपालाने किंवा ईमेल द्वारे सादर करावे.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा 👇🏻

https://drive.google.com/file/d/1LEpPgArRMA-TfMSPVcpOSWxa9FTaMYrL/view?usp=drivesdk

अधिक माहितीसाठी ,येथे क्लिक करा👇🏻

⭕ होऊ शकते 2 लाखांपर्यंत कर्ज माफ…
⭕ जाणून घ्या नक्की काय आहे योजना..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment