What is Share Market in Marathi – शेअर मार्केट काय आहे?
What is Share Market in Marathi: Share Market किंवा stock market एक असे मार्केट आहे जिथे Markets आणि Exchanges चे एक कलेक्शन आहे जिथे कायम लोकांकडून शेअर्स ची खरेदी आणि विक्री केली जाते. इथे फक्त त्याच कंपनीच्या shares ची खरेदी विक्री केली जाते ज्या शेअर मार्केट मध्ये लिस्ट असतात. एक प्रकारे तुम्ही या कंपन्यामध्ये गुंतवणूकच करत असतात.
तुम्हाला माहीत आहे का? अशी कोणती जागा आहे जिथे लोक पैसे लावून नफा मिळवत आहेत? ती जागा आहे शेअर मार्केट किंवा शेअर बाजार! Share Bazar विषयी अनेकांनी ऐकले असेल मात्र ते काय आहे याविषयी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आज What is Share Market in Marathi आणि share market information in marathi याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
शेअर मार्केट काय आहे? – What is share market in Marathi?
Share Market आणि stock market एक असे मार्केट आहे जिथे अनेक कंपनी चे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. हे असे मार्केट आहे ज्यामध्ये एकतर काही लोक खूप जास्त पैसे कमवतात किंवा काही लोक त्यांचे सर्व काही गमावून बसतात. एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीमध्ये भागीदारी प्राप्त करणे होय.
तुम्ही जितके पैसे लावतात त्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीत मालकी हक्क मिळवतात. याचाच अर्थ असा की जर त्या कंपनीला भविष्यात नफा झाला तर तुम्ही लावलेल्या पैशाचा दुप्पट तुम्हाला पैसे मिळतील मात्र जर नुकसान झाले कंपनी तोट्यात गेली तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही म्हणजेच तुमचे पूर्ण नुकसान झाले असेल.
ज्या प्रमाणे Share Market in marathi मध्ये पैसे कमविणे सोपे आहे त्याचप्रमाणे इथे पैसे गमविणे देखील सोपे आहे. कारण Stock market मध्ये चढ उतार हे होतच असतात. तर सुरू करूयात शेअर मार्केट विषयी माहिती.
शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी कधी करावेत? । Share market basics in marathi
तुम्हाला थोड्या फार प्रमाणात आयडिया आलीच असेल की शेअर मार्केट नक्की काय आहे. चला तर मग जाणून घेऊयात How to invest in share market in marathi?
Stock market मध्ये share खरेदी करत असताना तुम्हाला यामध्ये अनुभव असायला हवा की share कधी खरेदी करावा. तुम्हाला हा पैसा कधी लावायचा आहे आणि तो कोणत्या कंपनीत लावायचा आहे हे तुम्हाला माहिती असायला हवे. ज्या कंपनीत पैसे लावून तुम्हाला फायदा होऊ शकतो अशा कंपनी तुम्हाला शोधायच्या आहेत.
या सर्व गोष्टींची माहिती घेऊन मगच शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यास उतरावे. Share market मध्ये कोणत्या कंपनीचा शेअर वधारला किंवा पडला आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला economics times सारख्या वृत्तपत्रातून वाचायला मिळेल. NDTV business सारख्या news channel वरून देखील तुम्हाला ही माहिती मिळू शकेल.
शेअर मार्केट हे रिस्क ने भरलेले आहे. त्यामुळे इथे तेव्हाच गुंतवणूक करायला हवी जेव्हा तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. यामुळे तुम्हाला जेव्हा कधी नुकसान होईल तेव्हा त्याने दैनंदिन जीवनावर जास्त काही परिणाम होणार नाही. किंवा तुम्ही असे देखील करू शकतात की शेअर मार्केट मध्ये सुरुवातीला कमी पैसे गुंतवणूक share market ची सुरुवात करु शकतात. जेणेकरून जास्त काही नुकसान तुम्हाला होणार नाही. जस जसे तुमचा या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान वाढेल तसे तुम्ही मग जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकतात.
जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर Angle Broking वर तुमचे खाते सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही सहज आणि लवकर Demat account सुरू करून त्यातून share देखील खरेदी करू शकतात. त्यासाठी खाली लिंक देत आहोत.
Angle Broking चे खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा.
Upstock चे खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा.
बेसिक मराठी शेअर मार्केट कोर्स 👇
https://youtu.be/Zn_eunjkyCY
शेअर मार्केट प्रॅक्टिकल व्हिडिओ मराठी मधे 👇
http://bit.ly/iconikstockmarket
🔴रोजच्या स्टॉक टिप्स रिपोर्ट साठी जॉईन व्हा 👇
https://t.me/iconikMarathimotivation
🔴काही प्रश्न असतिल मेसेज करा 👇
Instagram- https://www.instagram.com/iconik_marathi/
🔴Stock न्यूज आणि अपडेट्स 👇
https://instagram.com/iconik_stock_marathi?utm_medium=copy_link
1)Angle Broking
http://tinyurl.com/y2wdqgcb
2) Upstox-
http://bit.ly/upstockbestdeal
🔴अकाउंट कसं ओपन कारचं ?? बघा👇 👇
Upstox- https://bit.ly/upstoxacopn
Groww- https://bit.ly/growwacopnv
AngleB- https://bit.ly/angleaccountfree
🔴काही अडलं इंस्टाग्राम मेसेज करा 👇👇 👇
https://www.instagram.com/iconik_marathi/
शेअर मार्केट मध्ये पैसे कसे लावतात? | How to Invest money in the stock market?
शेअर मार्केट मध्ये पैसे कमविण्यासाठी तुम्हाला एक Demat Account बनवावे लागते. यामध्ये देखील दोन प्रकार असतात. तुम्ही broker म्हणजेच दलालाच्या माध्यमातून तुमचे demat account सुरू करू शकतात.
Demat खात्यात तुमच्या share चे पैसे ठेवले जातात. जसे तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे ठेवतात त्याच प्रमाणे demat खात्यात share चे पैसे ठेवलेले असतात. तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचं demat खाते असणे गरजेचे असते. कारण कंपनीला जो काही नफा होणार आहे तो तुमच्या बँक खात्यात न जाता तो demat खात्यात जातो. Demat account तुमच्या saving खात्यासोबत जोडलेले असते व तुम्हाला वाटले तर demat account मधून bank account मध्ये पैसे पाठवू शकतात.
Demat account बनविण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेत saving खाते असणे गरजेचे असते. Proof साठी तुम्हाला Pan card आणि आधार कार्ड द्यावे लागणार आहे. यावरून तुमचा ऍड्रेस प्रूफ त्यांना हवा असतो.
दुसरी पद्धत म्हणजे यामध्ये तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन demat account सुरू करू शकतात.
परंतु या पद्धतीपेक्षा तुम्ही जेव्हा एखाद्या ब्रोकर कडून खाते खोलून घेता तेव्हाच तुम्हाला जास्त फायदा होतो. कारण त्यातून तुम्हाला एक चांगला सपोर्ट मिळेल. आणि दुसरे म्हणजे ते तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या आधारावर एक चांगली कम्पनी देखील सुचवतील जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकतात. असे करण्यासाठी तुम्हाला त्यांचा काही चार्ज देखील द्यावा लागणार आहे.
भारतात दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. Bombay Stock Exchange (BSE) आणि National Stock Exchange (NSE). या दोनच ठिकाणी शेअर खरेदी आणि विक्री केले जातात. आपण ज्या ब्रोकर्सच्या माध्यमातून खाते खोलत असतो हे सर्व ब्रोकर्स त्या स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात. आपण त्यांच्या माध्यमातून स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणूक करत असतो. त्यांच्याच माध्यमातून आपण ट्रेडिंग करत असतो. आपण सरळ स्टॉक मार्केट मध्ये जाऊन एखादा शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही.
शेअर मार्केट डाऊन का होते?
सध्या शेअर मार्केट डाऊन होण्याचे अनेक कारण आहेत. चला त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
1) जसे तुम्हाला माहिती असेल की एखाद्या मोठ्या संकटाने देखील शेअर मार्केट खाली जाऊ शकते. सध्या कोरोना व्हायरस या समस्येमुळे ग्राहकांच्या वागणुकीत म्हणजेच consumer behavior मध्ये काही बदल आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळेच कंपनीच्या business ला नुकसान होत आहे. त्यामुळे ते short term earnings साठी स्वतःचे स्टॉक विकतात. त्यामुळे आपल्याला शेअर मार्केट मध्ये चढ उतार बघायला मिळतात.
2) या कोरोना व्हायरस Crisis चे कोणतेही योग्य उत्तर अजून सापडलेले नाहीये. ज्यामुळे investor sentiments ला एक भीती अजून देखील आहे.त्यामुळे शेअर मार्केट मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात डाऊन बघायला मिळतो आहे.
3) एखाद्या ग्लोबल रिस्क अव्हर्जन मध्ये foreign institutional investors म्हणजे मुख्यतः ETFs द्वारे selling केली जाते. यामुळे शेअर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात डाऊन आपल्याला बघायला मिळतो. जवळपास या काळात त्यांनी 25000 करोड रुपये किंमतीचे स्टॉक मार्च मध्ये विकले.
शेअर मार्केट चे गणित | Share market basics in Marathi
जर तुम्ही खूप वेळेपासून stock market मध्ये म्हणजेच Equity आणि F&O मध्ये ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला देखील शेअर मार्केट च्या काही सिक्रेटस विषयी माहिती असेल. जर नसेल माहीत तर मग आम्ही तुम्हाला शेअर मार्केट च्या अशाच काही सिक्रेट विषयी सांगणार आहोत. तुम्हाला हे नक्कीच आवडतील आणि यातून तुम्हाला अधिक माहिती देखील मिळेल.
चला तर मग त्या सिक्रेट विषयी जाणून घेऊयात जे आम्ही मागील काही काळात शिकलो आहोत.
1. Stock market वरून जितके सोपे दिसते तितके ते नाहीये. यात insider ट्रेडिंग असते. Market ला कायम तुमच्या पेक्षा जास्त माहिती असते. त्यामुळे प्रत्येक खरेदी करणाऱ्या व्यक्तीसाठी एक विक्रेता हा नक्कीच असतो. परंतु याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही यात पैसे कमवू शकत नाहीत, फक्त थोडंस पैसे कमविणे कठीण आहे.
2. अशी कोणतीच ultimate strategy / indicator सध्या उपलब्ध नाहीये. तुम्हाला value strategy (buying cheap quality stocks) किंवा momentum strategy (buying growth stocks) अनुसार investment करावी लागते. याशिवाय इतर देखील काही प्लॅन्स आहेत त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करू शकतात.
3. तुम्ही एक टेक्निकल ट्रेडर असाल किंवा फंडामेंटल इन्व्हेस्टर असाल तरी देखील तुमची एक फंडामेंटल स्ट्रॅटेजी असायला हवी. जीचा वापर करून तुम्ही एक चांगली कमाई करू शकतात.
4. योग्य प्रकारे trade किंवा invest करणे म्हणतात तितके सोपे नसते. जर तुम्हाला ट्रेडिंग करण्यात मजा येत असेल तर मग समजून जा की तुम्ही काहीतरी चुकीचे नक्की करताय.
5. तुम्हाला कायम शिकत राहिले पाहिजे आणि इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करता यायला हवे.
6. जवळपास 90% ट्रेडर्सला खर तर ट्रेडिंग येतच नसते. ते फक्त दुसऱ्यांना फॉलो करून पैसे कमवू इच्छित असतात.
7. Trading आणि investing ही खूप एकटेपणा मध्ये जाणारा मार्ग आहे. तुम्ही सुरुवातीला भलेही लोकांना कॉपी करून पैसे कमवत जाल मात्र पुढे जाऊन तुम्हाला तुमची एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. अन्यथा तुम्हाला यात पुढे जाऊन नुकसान सहन करावे लागेल.
शेअर मार्केट कसे शिकणार? | Learn Share Market in Marathi
सर्वांना पटकन श्रीमंत व्हायची खूप इच्छा असते. त्यामुळे ते कदाचित असेच quick आणि easy मार्ग अवलंबतात ज्यातून त्यांना फास्ट फास्ट पैसे मिळू शकतात. जेणेकरून त्यांचे आयुष्य हे काही कालावधीत खूप जास्त आनंदी होऊ शकेल.
अशात अनेकांना शेअर मार्केट देखील एक जलद पैसे कमवायचा मार्ग वाटतो जिथे कमीत कमी काळात ते करोडो रुपये कमवू शकतील. त्यामुळे ते सतत Share market tips in marathi शोधत असतात जेणेकरून ते सहज श्रीमंत बनू शकतात. चला तर मग share market tips विषयी जाणून घेऊयात ज्या सर्व
सुरुवातीला गुंतवणूक करणारे इन्व्हेस्टर नक्कीच जाणून घेण्यास इच्छुक असतात.
1. सर्वात आधी शिका आणि मगच पुढे जा.
कोणतीही गोष्ट असेल तरी त्यात हात घालण्याच्या आधी त्याला सर्वात आधी योग्य प्रकारे जाणून घ्या. त्यासाठी तुम्हाला त्याविषयी माहिती जाणून घ्यावी लागेल.
Share market ला देखील तुम्हाला आधी शिकून घ्यावे लागणार आहे. तेव्हाच तुम्ही यात पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. Share market विषयी कुठल्याही प्रकारे ज्ञान न मिळवता जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुम्हाला असे न करण्याचा आम्ही सल्ला देऊ.
2. स्वतःसाठी रिसर्च स्वतः करा
Research हे नाव ऐकताच अनेक लोक यापासून दूर दूर पळायला लागतात. परंतु शेअर मार्केट मध्ये यायचे असेल तर तुम्हाला रिसर्च करावाच लागणार आहे. रिसर्च हीच गोष्ट आहे जी तुम्हाला शेअर मार्केट मध्य यशस्वी बनवू शकते. तुम्हाला टीव्ही मध्ये अनेक चॅनल वर मार्केट एक्सपर्ट मिळतील जे तुम्हाला शेअर्स विषयी knowledge देतात. असे असू शकते की त्यांच्या काही गोष्टी खऱ्या असतील मात्र तुम्हाला एक लक्षात घ्यायला हवे की ते जर इतक्या सहज शेअर ची प्राईज predict करत असतील तर मग त्यांनी स्वतःच घरी बसून पैसे नसते का कमविले?
3. लॉंग टर्म गोल्स सेट करा
तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायला हवि की investment कोणतीही असली तरी देखील ती लॉंग टर्म मध्ये एक चांगला नफा देऊन जाते. अशात तुम्हाला शेअर मार्केट मध्ये investment करायची असेल तर long term साठीच करत जा. तुम्हाला यामध्ये profit जास्त होऊ शकतो.
4. आपली रिस्क टॉलेरन्स समजून घ्या
इथे risk tolerance म्हणायचा अर्थ असा आहे की सर्वांची एक रिस्क घेण्याची सीमा ठरलेली असते. त्या सीमेपर्यंत त्यांना काही फरक पडत नाही. मग यात प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तरी त्यांना काही दुःख नसते.
Share मार्केट खूप जास्त risky आहे त्यामुळे यात तुम्हाला जितका लॉस सहन होऊ शकतो तितकीच गुंतवणूक तुम्ही करायला हवी. कारण तुम्ही जर जास्त गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला लॉस झाला तर तुम्हाला कंगाल होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे तुमच्या risk tolerance ला समजून घेऊन मगच आपला पोर्टफोलिओ बनवा.
5. Research आणि planning करा
तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून का असो तुम्हाला रिसर्च आणि प्लॅनिंग ला जास्तीत जास्त महत्व द्यायला हवे. कारण long term तुम्हाला यश मिळवायचे असेल तर research आणि planning हे सर्वात जास्त कामी येते. याशिवाय शेअर्स निवडत असताना चांगल्या प्रकारे रिसर्च करा. जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन पच्चाताप होणार नाही.
6. तुमच्या भावनांवर कंट्रोल ठेवा
Share Market अनेक वेळा असे होते की आपण आपले emotion वरील नियंत्रण गमावतो आणि त्यामुळे तुम्हाला खूप नुकसान देखील होते. या सर्व गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या emotions वर नियंत्रण ठेवता यायला हवे. तेव्हाच पुढे जाऊन तुम्ही एक चांगले गुंतवणूकदार बनू शकतात. भावनांवर नियंत्रण नसेल तर नुकसान खूप जास्त होऊ शकते.
7. Basics ला सर्वात आधी क्लीअर करा
सर्व विषयांप्रमाणे share market चे देखील काही बेसिक्स असतात. हे बेसिक सर्व investors ने समजून घ्यायला हवेत. त्यामुळे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी याच्या सर्व बेसिक सोबत जुळवून घेता यायला हवे. असे केल्यानंतरच तुम्ही तुमच्या investments मध्ये यशस्वी होऊ शकतात.
8. आपल्या गुंतवणूक Diversify करा
तुम्हाला देखील इतर यशस्वी गुंतवणूक करणाऱ्या लोकांप्रमाणे investment diversify करता यायला हवी. ते म्हणतात ना सर्व अंडे कधीच एका भांड्यात ठेवू नयेत! कारण जर एखादा अपघात झाला तर सर्व अंडे एकाच झटक्यात फुटून जातील आणि नुकसान मोठे होईल.
त्याच प्रमाणे गुंतवणुकीत देखील हाच रूल लागू होतो. तुम्हाला सर्व पैसा हा एकच शेअर मध्ये गुंतवायला नको. याशिवाय तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेअर्स कॅटेगरी मध्ये गुंतवणूक असावी. त्यामुळे तुमच्या investment चा risk diversify होतो. त्याने तुमच्या रिस्क मध्ये देखील थोडी कमी होते.
9. चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करा.
कोणाच्याच बातांमध्ये येऊ नका. तुम्हाला कायम त्याच कंपनीत गुंतवणूक करायला हवी ज्याविषयी तुम्हाला माहिती आहे. किंवा ज्यांचे प्रोडक्ट आपण वापरतो किंवा प्रसिद्ध आहेत अशाच कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी.
या होत्या Share market tips in marathi – शेअर मार्केट टिप्स (Share Bazar Marathi Tips) ज्या तुम्हाला शेअर मार्केट मधील वाटचालीसाठी खूप जास्त मदत करतील.
शेअर मार्केट कधी वाढतो आणि कधी घसरतो?
शेअर मार्केट वधारणे आणि घसरणे यासाठी सर्वात मुख्य कारण हे demand आणि supply हे असतात.
Demand आणि supply आपल्याला मार्केट मध्ये दोन प्रकारचे लोक बघायला मिळतात. दोघांचीही मते हे विभिन्न असतात. काही लोक विचार करतात की मार्केट वाढेल तर काही लोकांचे मत असते की मार्केट खाली पडेल. याला समजून घेण्यासाठी खालील दोन मुद्दे समजून घेणे गरजेचे असते.
1. जर demand वाढत असेल आणि ती supply ला exceed करत असेल तर त्या शेअर च्या किंमतीत वाढ होते.
2. याउलट जर supply हा demand पेक्ष्या जास्त वाढला तर मग शेअर चे मूल्य कमी होते.
FAQ On Share Market In Marathi
1. शेअर मार्केट मध्ये कमीत कमी किती पैसे गुंतवणूक करून सुरुवात करता येईल?
शेअर मार्केट मध्ये तशी काही कमीत कमी लिमिट नसते. तुम्ही कोणत्याही छोट्या कंपनीचे शेअर खरेदी करून सुरुवात करू शकतात.
2. शेअर मार्केट हा एक सट्टा (जुगार) आहे का?
कधीही नाही. शेअर मार्केट हा काय सट्टा नाहीये. ही एक अभ्यासपूर्वक मार्केट आहे त्याचा कारभार एका गणितावर सुरू असतो. हो परंतु जर तुम्हाला शेअर मार्केट विषयी काही माहीत नसेल तर तुमच्यासाठी हा सर्वात मोठा सट्टा (जुगार) आहे.
आज आपण काय शिकलो?
मला आशा आहे की आमचा लेख शेअर मार्केट काय आहे (What is share market in marathi) नक्कीच आवडला असेल. आमचा कायम हाच प्रयत्न असतो की आमचा लेख हा वाचकांना आम्ही घेतलेल्या विषयाविषयी संपूर्ण माहिती मिळावी जेणेकरून त्यांना दुसऱ्या वेबसाईटला जाऊन याच विषयावर माहिती घ्यावी लागणार नाही.
Share market information in marathi या लेखामध्ये तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून नक्की सांगा, आम्ही तुमच्या शंकांचं निवारण करण्याचा प्रयन्त करू.
इंग्लिश speaking कोर्स-
https://youtu.be/zeMhXXVzv84
ग्राफिक n vdo डिझाईन कोर्स-
https://youtu.be/pLGzpYZgiXo
ग्राफिक n vdo एडिटींग-
https://youtu.be/C64ZDh6u8E0
टॉप गूगल कोर्सस फ्री 🎯
https://youtu.be/ejmqMH-43DE
बाकी फ्री कोर्सस 🎓 👇
http://bit.ly/topfreecourses