Sheli Palan Yojana

शेळी पालन योजना –
     राज्य सरकार तर्फे तसेच केंद्र सरकारतर्फे जनतेच्या हितासाठी विविध उद्देशाने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. राज्य सरकारने नागरिकांना काहीतरी व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने त्याचबरोबर पशुपालनास प्रोत्साहन मिळावे यासाठी एक योजना सुरू केली आहे ती म्हणजे शेळी पालन योजना (Sheli Palan Yojana).
Advertisement
शेळी पालन योजनेअंतर्गत ज्यांना शेळीपालन हा व्यवसाय करायचा आहे त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

शेळी पालन योजना | Sheli Palan Yojana –

– शेळी पालन योजनेची पशुसंवर्धन विभागाद्वारे  सुरुवात करण्यात आलेली आहे.
 – शेळीपालन योजने अंतर्गत शेळीपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते, यामुळे व्यवसायासाठी इतर कोणाकडे आर्थिक मदत मागण्याची गरज पडत नाही.
– बरेच लोक शेती हा व्यवसाय करत असल्यामुळे शेतीसोबत शेळी पालन किंवा मेंढी पालन व्यवसाय करणे सुद्धा शक्य असल्याने हा व्यवसाय करण्यास बरेच लोक इच्छुक असतात परंतु पैशाच्या कमतरतेमुळे त्यांना हा व्यवसाय करणे शक्य होत नाही परंतु आता या योजनेमुळे हे शक्य होणार आहे.
– शेळीपालन योजनेअंतर्गत शेळी व मेंढी पालन करण्यासाठी दहा लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देतात.
– काही ठिकाणी शेळीपालन व मेंढी पालन हा व्यवसाय कमी प्रमाणात दिसून येत आहे या योजनेमुळे हे व्यवसाय करण्याला सुद्धा चालना मिळू शकते.
– त्याचबरोबर या योजनेमुळे जनतेचा आर्थिक विकास होण्यामध्ये सुद्धा मदत होईल.
– डीबीटी च्या सहाय्याने बँक खात्यामध्ये लाभाची रक्कम लाभार्थ्यास मिळेल.

शेळी पालन योजना फायदे  | Benefits Sheli Palan Yojana –

– शेळीपालन व मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होईल.
– राज्यामधील दूध उत्पादन सुद्धा वाढेल.
– शेळीपालन योजना मुळे रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा उपलब्ध होतील.
– शेळीपालन योजनेमुळे सामाजिक व आर्थिक विकास होण्यामध्ये मदत होईल.
– शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यामध्ये सुद्धा मदत होईल.

शेळी मेंढी पालन योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान | Sheli Mendhi Palan Yojana Subsidy –

– अनुसूचित जाती व जमाती प्रवार्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान
–  खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येते.
100 मादी व 5 नर यासाठी अनुदान – 10 लाख रुपये
200 मादी व 10 नर यासाठी अनुदान – 20 लाख रुपये
500 मादी व 25 नर यासाठी अनुदान – 50 लाख रुपये

मेंढी पालन व्यवसाय योजनेसाठी आवश्यक पात्रता | Sheli Palan Scheme Eligibility –

– अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
– महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी, पशुपालक व इतर सामान्य नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
– अर्जदाराचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे

शेळी मेंढी पालन योजना अटी | Sheli Mendhi Palana / Vatap Yojana Terms & Conditions- 

– ज्या व्यक्तींना शेळी पालन किंवा मेंढी पालन हा व्यवसाय करायचा आहे त्यांच्याकडे 9000 वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे जेणेकरून 100 शेळ्या व 5 मेंढ्या त्या ठिकाणी राहू शकतील.
– अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यांना खाऊ घालण्यासाठी चारा निर्माण करण्यासाठी जमीन असणे गरजेचे आहे.
– अर्जदाराने चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे आणि शेळ्या मेंढ्यांची देखभाल व्यवस्थित रित्या करणे सुद्धा गरजेचे आहे.
– शेळी मेंढी पालनाचा अनुभव अर्जदाराला असणे गरजेचे आहे.
– या योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला 2 रुपये भरणे आवश्यक आहे.
– जर समजा अर्जदार अनुसूचित जाती / जमातीचा असेल तर अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
– अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
– तसेच अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
– अर्जासोबत अर्जदाराला त्याच्या रेशन कार्ड वर जे सदस्य आहे त्या सर्व सदस्यांची नावे व त्यांचा आधार नंबर ही माहिती सादर करणे आवश्यक असेल.
– या योजनेसाठी एका कुटुंबांमधील फक्त एकाच सदस्याला अर्ज करता येईल.

शेळीपालन अनुदान योजना कागदपत्रे | Sheli Palan Yojana Necessary Documents

– पासपोर्ट साईज फोटो
– आधार कार्ड
– रेशन कार्ड
– रहिवासी दाखला
– जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
– जमिनीचा 7/12 व 8अ
– पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
– बँक खात्याची माहिती
– उत्पन्नाचा दाखला
– अर्जदार दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र
– हमीपत्र / बंधपत्र
– मोबाईल नंबर
– ई-मेल आयडी
 

शेळीपालन अनुदान योजनेसाठी अर्ज  | sheli mendhi palan yojana online application –

– नजीकच्या सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्र मध्ये जाऊन तेथे हा फॉर्म भरायचा आहे.
– फॉर्म भरताना सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे व त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.

Advertisement

Leave a Comment