सोलर रूफ टॉप योजना | Solar Roof Top Yojana

सोलर रूफ टॉप योजना | Solar Roof Top Yojana – 

      प्रत्येक घरोघरी तसेच शेतीमध्ये विजेचा वापर केला जातो. काही ठिकाणी वीज पुरवठा करणे जरा कठीण होऊन जाते. जर आपण आपल्या घराच्या छतावर सोलर रुफ टॉप बसवले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल आणि विजेची सुद्धा बचत होईल तसेच विज बिल भरण्यासाठी जे एक्स्ट्रा पैसे आपले जातात ते सुद्धा जाणार नाही. चला तर जाणून घेऊयात सोलर रुफ टॉप योजनेबद्दलची अधिक माहिती…

Advertisement

सोलर रूफ टॉप योजना | Solar Roof Top Yojana – 

– या योजनेअंतर्गत आपल्याला वीज निर्मिती करता यावी यासाठी घरावर सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी सरकारतर्फे सबसिडी दिली जाते .

– घर,कंपनी किंवा शासकीय कार्यालय या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

– या योजने अंतर्गत लाभधारकास 40 टक्के पर्यंतचे अनुदान मिळू शकते.

– जर समजा तीन किलोवॅट या क्षमतेचा सौर पॅनल बसवला तर 40 टक्के पर्यंतचे अनुदान दिले जाते तर तीन ते दहा किलो वॅट क्षमतेचा सौर पॅनल बसवल्यास 20 टक्के पर्यंतचे अनुदान दिले जाते.

सोलर रूफ टॉप योजनेसाठी लागणारे कागदपत्रे | Documents necessary for Solar Roof Top Yojana – 

– पासपोर्ट साईज फोटो

– आधारकार्ड

– बँक पासबुक

– उत्पनाचा दाखला

– मोबाईल नंबर

– वीजबिल

– घराची मालकी हक्काची कागदपत्रं

– घरातील सहहिस्सेदार संमतीपत्र

– १५ वर्ष वास्तव्य असल्याचा रहिवाशी पुरावा

सोलर रूफ टॉप योजनेसाठी अर्ज  | Application –

– अधिकृत वेबसाईट वर जाऊन लॉग इन करा.तसेच संदेश नावाचे ॲप डाउनलोड करा,त्या नंतर पुढील प्रक्रिया करावी.

https://solarrooftop.gov.in/

– विचारलेली सर्व माहिती जसे की वीज विक्रेता,ग्राहक क्रमांक, मोबाइल नंबर आणि इतर माहिती भरून अर्ज प्रक्रिया सुरू करायची आहे.

– त्या नंतर ग्राहक क्रमांक व मोबाइल क्रमांक टाकून लॉग इन करावे व फॉर्म मधील सर्व माहिती भरावी

– त्या नंतर मान्यता प्राप्त झाल्यावर सोलर पॅनल बसवून घेवू शकता.

– सोलर पॅनल बसवल्यानंतर सोलर बद्दल माहिती डीस्काँम कडे नेट मीटर साठी सादर करा.

–  मीटर बसविल्यानंतर डीस्काँम कडून पडताळणी करण्यात येते व त्यांच्यामार्फत  पोर्टलच्या

माध्यमातून कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट करण्यात येईल.

–  तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर बँक अकाउंट नंबर आणि कॅन्सल चेक पोर्टल वर अपलोड करा. 

– त्यानंतर ३० दिवसांमध्ये अनुदान जमा होते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment