बाल आधार कार्ड कसे काढावे ? छोट्या मुला मुलींचे आधार कार्ड कसे काढावे याबद्दल संपूर्ण माहिती…
आपल्या देशामध्ये आधार कार्डला खूप महत्त्व आहे. आधार कार्ड हे आपले महत्त्वाचे ओळखपत्र सुद्धा आहे आणि याच आधार कार्डच्या मदतीने विविध सरकारी प्रक्रिया आपण पूर्ण करू शकतो. मोठ्यांसाठी आधार कार्ड जसे महत्त्वाचे आहे तसेच लहान बालकांसाठी सुद्धा आधार कार्ड महत्त्वाचे आहे.
बालकांच्या आधार कार्डचे महत्त्व –
Importance of Bal Aadhaar Card –
– आधार कार्ड हे छोट्या बालकांसाठी सुद्धा एक ओळखपत्र म्हणून भूमिका बजावते.
– आधार कार्डची मागणी बालवाडी मधून सुद्धा होत असते, त्या ठिकाणी बालकांना आहार दिला जातो तसेच विविध योजनांचा लाभ सुद्धा मिळतो आणि त्यासाठी नक्कीच आधार कार्डची आवश्यकता असते.
– बाल आधार कार्डचा उपयोग शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.
– पाच वर्षाच्या तसेच त्याखालील मुला मुलींना सुद्धा आधार कार्ड काढणे अनिवार्य केलेले आहे.
बाल आधार कार्ड कागदपत्रे/पात्रता –
Documents/Eligibility for Bal Aadhaar Card –
– सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदार भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
– बालकाचे जन्म प्रमाणपत्र
– बालकाचा पासपोर्ट साईज फोटो
– पालकांचे आधार कार्ड
– मोबाईल नंबर
– पत्त्याचा पुरावा
बाल आधार कार्ड बद्दल काही ठळक मध्ये –
Important points regarding Bal Aadhaar Card –
– बाल आधार कार्डलाच “ब्ल्यू आधार कार्ड ” असे सुद्धा म्हणतात.
– अगदी कोणत्याही आधार कार्ड सेंटरवर जाऊन बालकांचे आधार कार्ड काढता येऊ शकते.
– बालकांची बायोमेट्रिक माहिती कॅप्चर केली जात नाही.
– बालकांचे आधार कार्ड ते बालक पाच वर्षाचे झाल्यावर आणि पंधरा वर्षाचे झाल्यानंतर असे दोनदा अपडेट करावे.
बाल आधार कार्ड काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया –
Application for Bal Aadhar Card –
बाल आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.
ऑफलाईन पद्धत :
– ऑफलाइन पद्धतीने बाल आधार कार्ड काढण्यासाठी नजीकच्या आधार कार्ड सेंटर मध्ये जाऊन बाल आधार कार्ड बनवण्यासाठी लागणारा फॉर्म घ्यावा लागेल.
– त्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावी.
– त्यानंतर फॉर्म जमा करावा, नंतर एक पावती दिली जाते.
– अगदी काही दिवसातच फॉर्म व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बाल आधार कार्ड तयार होईल.