Sprouts Business | मोड आलेल्या कडधान्यांचा व्यवसाय पण नेहमीच्या स्टाईलने नाही तर हेल्थी नाश्ता विकून ….बघा पूर्ण माहिती…

Sprouts Business | मोड आलेल्या कडधान्यांचा व्यवसाय पण नेहमीच्या स्टाईलने नाही तर हेल्थी नाश्ता विकून ….बघा पूर्ण माहिती…

Advertisement

     नमस्कार मंडळी, जर तुम्ही काही व्यवसाय करण्याच्या विचारांमध्ये असाल तर नक्की या व्यवसायाचा विचार एकदा करून बघा. कारण हा जो व्यवसाय आहे याबद्दल कदाचित फार कमी लोकांच्या मनामध्ये विचार आलेला असेल किंवा काहींनी तर ऐकलेलं सुद्धा नसेल. परंतु हा व्यवसाय खूप चालू शकतो चला तर बघुयात डिटेल मध्ये माहिती…

स्टेप १ – सर्वप्रथम या व्यवसायासाठी व्यवसाय योजना तयार करा.

या व्यवसायासाठी व्यवसाय योजना तयार करत असताना त्यामध्ये तुम्ही हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात,

हा व्यवसाय करण्यासाठी किती गुंतवणूक करणार आहात,

यांसारख्या काही गोष्टींचा समावेश होईल ते आपण पुढे बघूच..

परंतु कुठल्याही व्यवसायासाठी व्यवसाय योजना तयार करणे खूप महत्त्वाचे असते कारण व्यवसाय योजना तयार केल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कधी केल्या पाहिजे याचा एक अंदाज येतो आणि बऱ्याचशा भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा कमी होतात.

स्टेप २ – हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात ?

मोड आलेल्या कडधान्यांचा नाष्टा विक्री करण्यासाठी तुम्हाला पुढील ठिकाणी हा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरेल :

– योगा क्लास जवळ

– जिम जवळ

– जॉगिंग ट्रॅक जवळ

– स्पोर्ट अकॅडमी जवळ

–  गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जेथे लोक आरोग्याबद्दल जास्त जागृत असतील.

अशा ठिकाणी व्यवसाय सुरू केल्यामुळे नक्कीच या व्यवसायामध्ये यश मिळू शकते.

स्टेप ३ – या व्यवसायामध्ये गुंतवणूक किती करणार आहात ?

– हा व्यवसाय सुरू करत असताना यामध्ये किती गुंतवणूक करणार आहात हे सुद्धा ठरवा.

– जर हा व्यवसाय सुरुवातीला तुम्ही छोट्या स्तरावर सुरू करणार असाल तर अगदी कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

– जर हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर तुम्हाला जागा भाड्याने घ्यावी लागेल किंवा स्वतःची जागा असल्यास उत्तमच परंतु इतर सामग्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त लागू शकते त्यासाठी गुंतवणूक सुद्धा जास्त लागेल.

स्टेप ४ – हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सामग्री-

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी किंवा उपकरणे आवश्यक आहे याची एक यादी बनवा त्यामध्ये या व्यवसायासाठी लागणारी आवश्यक भांडी, टेबल, खुर्ची , कोण कोणती कडधान्य लागतील तसेच काही भाजीपाला उदाहरणार्थ कांदा, टोमॅटो, काकडी यांसारख्या सर्व गोष्टींची एक यादी बनवा आणि नंतर या गोष्टी होलसेल दरामध्ये कुठे मिळतील याची माहिती घ्या. जर तुम्ही या गोष्टी होलसेल दरामध्ये विकत घेतल्या तर नक्कीच व्यवसाय जास्त नफ्यामध्ये राहील.

स्टेप ५ – रेसिपी आणि दर

– हेल्दी नाश्ता देत असताना त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा नाश्ता तुम्ही देणार आहे याचा सुद्धा एक मेनू तयार करा.

– तसेच मेनू तयार केल्यानंतर त्यानुसार त्या नाश्त्याचे दर सुद्धा ठरवा.

– नाश्त्याची व्हरायटी देता आली तर उत्तमच त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक तुमच्याकडे येऊ शकतात.

स्टेप ६ – मार्केटिंग

कुठलाही व्यवसाय करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग.

हा व्यवसाय करत असताना तुम्ही पुढील प्रमाणे मार्केटिंग करू शकता –

– जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू केला तर नक्कीच बॅनर्स ,पॅम्प्लेट, एफएम रेडिओ ॲड अशा मार्केटींग पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता.

– परंतु हा व्यवसाय छोट्या स्तरावर जर तुम्ही सुरू केला तर सोशल मीडिया जे मार्केटिंगचे प्रभावी माध्यम आहे त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता.

– तसेच तुम्ही ज्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला आहे त्या ठिकाणी ” मोड आलेले कडधान्य खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास काय फायदा होतो ( sprouts benefits)” याबद्दलची माहिती असणारा एक बोर्ड लावू शकता ज्यामुळे ज्या लोकांना याबद्दल माहिती नाही त्यांना माहिती होईल आणि ते सुद्धा तुमच्याकडे असणारा आरोग्यदायी नाष्टा नक्की विकत घेतील.

– कुठल्याही व्यवसायामध्ये माऊथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची असते त्यामुळे जर तुमच्या नाष्ट्याची चव आणि क्वालिटी उत्तम असेल तर नक्कीच तुमच्याकडे येणारे लोक इतर लोकांना सुद्धा तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देतील.

– तसेच हा व्यवसाय सकाळच्या वेळेमध्ये जास्त चालण्याची शक्यता असल्याने सकाळी जेवढा जास्त वेळ तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता.

 अशाप्रकारे हा व्यवसाय सुरू करून तुम्ही लोकांपर्यंत आरोग्यदायी असा नाष्टा पोहोचवू शकता आणि या व्यवसायामध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकतात.

Advertisement

Leave a Comment