मित्रांनो तुमचे अभ्यास लक्ष लागत नाही का? तुमच्याकडून जास्त वेळ अभ्यास केला जात नाही का? किंवा तुम्हाला केलेला अभ्यास लक्षात राहत नाही का? अभ्यास करत असतांना विद्यार्थ्यांच्या अश्या अनेक अडचणी असतात. मग तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, १०वी/१२वी बोर्डाचे पेपर असतील किंवा सर्व विद्यार्थी जे कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेत आहेत त्या सर्वांसाठी या ५ टिप्स खूप उपयोगी पडतील.
Advertisement
या ब्लॉग मध्ये सांगितल्या गेलेल्या स्टडी सिक्रेट्स ज्या गोष्टी आहेत त्या IIT, JEE, UPSC सारख्या मोठ मोठ्या परीक्षांमध्ये टॉप केलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून व ते वापरत असणाऱ्या कॉमन टिप्स ज्या तुम्ही सुद्धा वापरात आणणार तर अजून जास्त प्रोडक्टीव्ह तुम्ही तुमच्या कामात होऊ शकतात. आणि तुम्ही पाहिलेल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचू शकतात.
1. अभ्यासाच्या पद्धती शोधा
- सर्वांना सांगितले जाते कि, अभ्यास करायचा असेल तर वाचावे लागेल लिहाव लागेल पण हि एक Standard पद्धत झाली पण प्रत्येकाने स्वतःमध्ये शोधले पाहिजे कि आपल्याला कोणत्या पद्धतीने अभ्यास केला तो समजतो, तो अभ्यास समजण्यासाठी रट्टा मारावा लागत नाही. तर यांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असू शकतात जसे, काही लोक पाहून शिकतात, काही लोक ऐकून शिकतात, काही लोक वाचून शिकतात, काही लोक प्रात्याक्षिक करून शिकतात, काही लोकांना युट्युब वरील व्हिडीओ पाहून समजते, काही लोकांना स्वतः सोबतच बोलून लक्षात राहते, काही लोकांना ऑडीओ ऐकून चांगला अभ्यास करता येतो. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास केल्यावर लक्षात राहत किंवा समजत तर ते तुम्ही शोधा आणि ती पद्धत वापरा.
2. ताण-तणाव(टेन्शन) मॅनेज करा
- जेव्हाही तुम्ही टेन्शन मध्ये असणार त्यावेळेस तुमच्या कडून कोणतेच काम पूर्णत्वाने होत नाही. ते अभ्यास असो वा ईतर काम. कारण तुम्हाला जर टेन्शन असेल तर १००% त्या कामामध्ये देता येत नाही. कोणाला वेळेवर जेवण जात नाही, कोणाला झोप लागत नाही, कोणी पूर्ण वेळ टेन्शन मध्ये असतात. तर यावर एकच उपाय आहे टेन्शन मधून बाहेर पडण्याचा तो म्हणजे चांगले रिलेशन. तुम्ही तुमच्या अडचणी पालकांसोबत, शिक्षकांना, मित्रांना सांगून तुमचा ताण-तणाव कमी करू शकतात. त्याविषयी योग्य व्यक्तीपर्यंत तुमची अडचण सांगितल्यास तुम्ही लवकर ताण-तणावातून बाहेर निघाल आणि अभ्यासात लक्ष देता येईल.
3. झोपण्याआधी रिव्हिजन करा
- झोपण्याआधी आपण जे वाचलेले असते त्याविषयी आपला मेंदू रात्री विचार करतो, व त्या गोष्टी आपल्या सबकंशीयस माइंड मध्ये सेव्ह करून ठेवतो. त्यामुळे केलेला अभ्यास लक्षात राहावा यासाठी दिवसभरातून तुम्ही केलेला अभ्यास आठवण करण्याचा प्रयत्न करा किंवा काही नोट्स काढले असतील तर ते शोर्ट मध्ये रिव्हिजन करा.
4. तुमची अभ्यासाची जागा व्यवस्थित ठेवा
- ज्याठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसतात तेथील जागा व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. कारण तुम्ही अभ्यास करताय आणि आजुबाजू सर्व विखुरलेले आहे. वह्या, पुस्तके, कपडे इकडे-तिकडे पसरलेले असेल तर त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे तुम्हाला नेहमी काहीतरी ओझे आपल्या डोक्यावर आहे असे वाटते म्हणून शक्य होईल तितका तुमचा अभ्यासाचा रूम स्वच्छ आणि प्रत्येक वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
5. डीस्ट्रॅक्शन टाईम सेट करा
- प्रत्येक विद्यार्थी कोणत्यातरी गोष्टी मधून डीस्ट्रॅक्ट होत असतो, खूप प्रयत्न केला तरी यातून तुम्ही बाहेर निघत नसाल तर यावर एक सोपा उपाय म्हणजे एक डीस्ट्रॅक्शन टाईम सेट करा, तो वेळ दिवसातून १५ मिनिटे, अर्धा तास असा काही असू शकतो आणि त्याच वेळेत तुम्हाला टाईमपास करायचा असेल, सोशल मिडिया वापरायचा असेल, मुव्हीज बघयचा असतील तर या सर्व गोष्टी त्या ठरलेल्या वेळेत करा. यामुळे तुम्ही अभ्यास करत असतांना तुमच्या मेंदूला संदेश जातो कि, डीस्ट्रॅक्ट होण्याचा वेळ येईल ते आपण करू म्हणजे तुमचे फोकस फक्त अभ्यासावर असते आणि डीस्ट्रॅक्शनच्या वेळेस तुम्हाला वाटेल ती आवडणारी गोष्ट करू शकतात.
6. ऑनलाईन साधनांचा वापर करा
- अनेक असे विद्यार्थी असतात जे कोणत्यातरी अडचणी मुळे कोचिंग जॉईन करू शकत नाही. पण प्रत्येक क्षेत्रात असेही काही विद्यार्थी असतात जे कोणतीही कोचिंग जॉईन न करता सेल्फ स्टडी करून टॉप करत असतात. कारण ते ऑनलाईन उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करत असतात, जसे फ्री कोर्सेस, युट्युब व्हिडीओ, गुगलवरील माहिती येथून सर्व अभ्यास करून सेल्फ स्टडीचा जोरावर ते टॉप करत असतात.
7. प्रोडक्टीव्ह वेळ ओळखा व त्या वेळेत कठीण काम करा.
- प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या दररोजच्या रुटीन मध्ये प्रोडक्टीव्ह वेळ असतो, तो वेळ तुम्ही ओळखा कारण तो प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो, कोणासाठी तो सकाळी तर कोणासाठी दुपारी, रात्री किंवा मध्यंतरीला कुठला वेळ हा वेळ कोणीही ठरवत नाही. पण हा असा वेळ असतो ज्यावेळेत तुमची कार्य करण्याची क्षमता जास्त असते, तुम्ही जास्त वेळेत करणारे काम या प्रोडक्टीव्ह वेळेत लवकर पूर्ण करतात आणि काम करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती जास्त असते त्यामुळे हा वेळ तुम्ही ओळखून त्या वेळेत कठीण वाटणारी कामे तुम्ही करू शकतात. ज्यामुळे जिथे कठीण कामे करण्यासाठी जास्त वेळ तुमचा जात असेल तिथेच ते काम प्रोडक्टीव्ह वेळेत केल्यामुळे ते लवकर होते आणि तुमचा अजून जास्त वेळ वाचतो त्यात राहिलेला अभ्यास किंवा कामे करू शकतात.
8. सोशल मिडियामधील सर्व नकारात्मकतेला दूर ठेवा
- मोबाईल मधून विद्यार्थी डीस्ट्रॅक्टच होतात असे पण नाहीये. कारण आजच्या स्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे खूप मोठे साधन म्हणून देखील पाहिले जाते, जे मुल कोचिंगची फीस भरू शकत नाही किंवा ज्यांच्या कडे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी अभ्यासात मदत करायला मोबाईल वरदानापेक्षा कमी नाही. पण मोबाईल मध्ये सोशल मिडिया वापरत असतांना नकारात्मक गोष्टींना फॉलो करू नका, अश्या लोकांच्या कम्युनिटी जॉईन करू नका जे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपातील गोष्टींमध्ये आनंद देतील पण त्यामुळे तुमच्या अभ्यासावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून अश्या नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.
9. टॉपर्स कडून शिका
- तुम्ही कुठेतरी ऐकल असेल कि, अनुभवातून माणूस लवकर शिकत असतो मग ते अनुभव स्वतःचे असो किंवा दुसऱ्याचे त्यामुळे ज्याचा अभ्यास आपण करतोय त्या क्षेत्रात आधीपासून ज्यांना टॉप केलेला असेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. त्यासोबतच युट्युबवर अश्या विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट, इंटरव्ह्यू असतात ते पहा त्यातून शिका त्यामध्ये त्यांनी कोणत्या चुका केल्या आणि कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या या दोघी गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही शिकू शकतात.
10. दररोज व्यायाम करा
- काही वेळेस तुम्हाला खूप कंटाळा येतो, आळसपणा वाटतो काहीच करू नये असे वाटत नाही. त्यावर एक सरळ उपाय आहे. दररोज व्यायाम करा, यात असे नाही कि जिम जावूनच व्यायाम केला पाहिजे. बेसिक व्यायाम करा. सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ वाॅल्किंग करा ज्यात सूर्यप्रकाश तुमच्या शरीरावर आल्यामुळे एनर्जेटिक फील तुम्हाला होते. पूर्ण वेळ एकाच रूममध्ये अभ्यासासाठी बसून राहिल्यावर सारखा कंटाळा आला असे तुम्हाला वाटेल तेव्हा बाल्कनीत, टेरेसमध्ये बाहेर निघून सूर्यप्रकाश घ्या. कारण काहीवेळेस “Vitamin D” च्या कमीमुळे आळसपणा जाणवत असतो. त्यासोबतच सायकलिंग, स्विमिंग, वाॅल्किंग सारख्या गोष्टी करू शकतात. फक्त दिवसातून काही वेळ काढून या गोष्टी जरी केल्या तरी एनर्जेटिक तुम्ही राहू शकतात.
Advertisement