टेलिग्रामवरून कमवा लाखो रुपये महिना, टॉप ३ मार्ग | Top 3 ways to earn money with Telegram app in Marathi

मित्रांनो तुम्ही जर टेलिग्राम हे app वापरत असाल पण तिथून तुम्ही एकही रुपया कमवला नसेल तर हा ब्लॉग पूर्ण वाचा टेलिग्रामवरून लोक लाखो रुपये महिना कमवत आहेत. त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

टेलिग्राम म्हणजे काय?

टेलिग्राम हे एक messaging app आहे. ज्याप्रकारे आपण daily use मध्ये messages करण्यासाठी WhatsApp वापरतो. पण WhatsApp मध्ये खूप लिमिटेशन्स आणि कमी features आहे. त्याऐवजी टेलिग्राम हे असे काही featured देतो जे आजपर्यंत WhatsApp वर नाहीयेत. त्यामुळे अनेक लोक WhatsApp जरी वापरत असतील पण त्यांच्या मोबाईलमध्ये टेलिग्राम app सध्या असतच. आतापर्यंत १ बिलियन म्हणजे १०० कोटी पेक्षा जास्त लोकांनी टेलिग्राम app हे प्ले-स्टोर वरून install केल आहे.

Advertisement

टेलिग्राम मध्ये Monetization प्रोग्राम आहे का?

नाही, टेलिग्राम मध्ये युट्युब किंवा गुगल सारखा कोणताही monetization प्रोग्राम नाही जिथे directly आपण पैसे कमवू शकतोय. पण काही असे मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही टेलिग्राम वरून पैसे कमवू शकताय. त्यात पहिला मार्ग आहे. Affiliate marketing, selling digital products, create & sell bots, sponsored post, sell telegram groups & channels.

टेलिग्राम वरून पैसे कमविण्याबद्दल सविस्तर माहिती

1)Affiliate Marketing –

मित्रांनो Instagram वर तुम्ही कोणत्या-न-कोणत्या creator चा व्हिडीओ पहिलाच असेल. कि त्यांनी ५ हजार ची स्मार्ट watch ५०० रुपयाला घेतली. ५० हजाराची A.C. १५ हजाराला घेतली. आणि शेवटी ते सांगतात कि टेलिग्राम वर असा एक ग्रुप आहे जिथे amazon, flipkart च्या ऑफर आधीच माहिती पडतात तर तुम्हाला पण अश्या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर हा ग्रुप जॉईन करा. आणि जेवढे पण लोक त्या ग्रुप मध्ये जॉईन असतात त्यापैकी ज्यांनी पण त्या लिंक वरून ती वस्तू घेतली तर amazon, flipkart १०% पर्यंत कमिशन ज्याचा टेलिग्राम ग्रुप आहे त्यांना मिळत असत.

यामध्ये तुम्हाला सुरुवातीला टेलिग्रामवर channel किंवा ग्रुप तयार करावा लागेल. जर समजा त्यावर तुम्ही amazon, flipkart ची माहिती देताय. कि, आज या product वर एवढ discount आहे, हि ऑफर आहे. ती ऑफर आहे. आणि तुम्ही जी लिंक लोकांना शेअर करणार टेलिग्राम ग्रुपवर ती affiliate लिंक असली पाहिजे. ज्यामुळे ती track होते कि ती लिंक तुम्ही कोणालातरी दिली होती आणि तिथून एखाद्या व्यक्तीने ती वस्तू घेतली आहे. तेव्हा लगेच तुम्हाला कमिशन मिळत. त्यासाठी तुम्हाला amazon च affiliate अकाऊंट उघडाव लागेल. त्यासाठी simple स्टेप असते. त्यानंतर प्रत्येक प्रोडक्टची लिंक जेव्हा तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर शेअर करणार तेव्हा लोकांना ती वस्तू जेवढ्या किंमतीची आहे तेवढ्याच किंमतीची मिळेल, पण तुम्ही ती लोकांना सजेस्ट केली आहे म्हणून त्याच कमिशन तुम्हाला मिळेल.

सर्वात आधी तुम्हाला amazon affiliate अकाऊंट उघडून घ्यायचं आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. flipkart ने आता new affiliate मार्केटरसाठी रजिस्ट्रेशन बंद केल आहे. पण, cash karo, earn karo यांसारखे apps आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही flipkart च्या प्रोडक्टची पण affiliate मार्केटिंग करू शकतात.

icoNik Marathi युट्युब channel वर affiliate मार्केटिंगवर पूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे. स्टेप by स्टेप सर्व प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे. जर ते व्हिडीओ पहायचे असतील तर येथे क्लिक करा.

2)Sponsored Post –

तुमच्या टेलिग्राम ग्रुप किंवा channel वर जेवढेही मेंबर्स असतील त्यानुसार तुम्हाला ब्रांड sponsored पोस्ट किंवा त्यांची लिंक काही माहिती तुमच्या ग्रुप मध्ये टाकण्यासाठी सांगेल आणि त्याबदल्यात तुम्हाला पैसे देईल. जेवढे जास्त ग्रुप मध्ये मेंबर्स असतील तेवढी जास्त इन्कम तुमची होईल. तुमच्याकडे १ लाख ग्रुप्स मेंबर्स असतील तर तुम्ही १० ते १५ हजार पर्यंत चार्ज घेऊ शकतात.

3)Create & Sell Telegram groups or channels –

खूप काही असे बिसनेसेस असतात ज्यांना लवकर ग्रो करायचं असतात आणि त्यांचे बिसनेस हे ऑनलाईन असतात त्यामुळे त्यांना audience लागत असेल तर असे बिसनेसेस आधीपासून ज्यांच्याकडे audience असते असे ग्रुप्स, channels विकत घेत असतात किंवा काही creator पण असतात जे विकत घेत सुद्धा असतात. तर हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही ग्रुप्स बनवा, तिथे लोकांना जोडा आणि जेव्हा जास्त लोक तिथे add झाले तर तो ग्रुप विकून द्या. लोक १० हजार लोकांचा ग्रुप जरी असेल तर तो ३ ते ५ हजार रुपयांना विकतात पण जास्त audience असेल लाखोंमध्ये तर जास्त price त्यासाठी मिळत असते.

सुरुवातीला ग्रुप मध्ये audience कशी आणायची?

सुरुवातीला जर तुम्ही ग्रुप बनवला असेल तर तिथे लोक लवकर आपला ग्रुप जॉईन करणार नाही कारण आधीच खूप लोकांनी बनविलेले असतात. त्यामुळे काहीतरी अशी फ्री वस्तू तुम्ही प्रोव्हाईड करा जी paid आहे पण तुम्ही फ्री देताय तर लोक तुमचा ग्रुप जॉईन करून ती वस्तू तिथून फ्री मध्ये घेतील. जस एखादी paid ई-बुक, कोर्स सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही फ्री देऊ शकतात.

टेलिग्राम ग्रुपची मार्केटिंग कशी करायची?

तुम्ही यासाठी instagram वर रील किंवा youtube वर shorts बनवू शकणार आहात. ज्यामध्ये तुम्ही एखादी category सिलेक्ट करा त्या related ग्रुप बनवा आणि त्याच category रिलेटेड youtube, instagram वर shorts व्हिडीओ बनवा. त्यानंतर समजा तुम्ही students related ग्रुप्स आणि रील्स बनवताय तर एखादा फ्री कोर्स देऊन तो पाहिजे असेल तर त्यासाठी तुमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगा. किंवा तुम्ही एखादी जॉब अपडेट देताय तर त्या जॉबची ऑफिशियल pdf तुमच्या ग्रुप वर टाकून लोकांना ग्रुप जॉईन करायला सांगू शकतात. आणि तुमचे ग्रुप्स public राहू द्या ज्यामुळे कोणीही सर्च करून तुमचा ग्रुप किंवा channel जॉईन करू शकतो.

Advertisement

Leave a Comment