ऍप्स, वेबसाईट आणि गेम टेस्ट करून कमवा |मोबाईल वरून काम | top 3 websites to earn with testing apps, games and websites in Marathi

मोबाईलवरून apps, websites टेस्ट करून घरबसल्या कमवा

मित्रांनो अनेक विद्यार्थी, गृहिणी किंवा जॉब करणारे लोक असतात ज्यांना ते करत असलेल्या कामासोबत एक्स्ट्रा इन्कम करायची असते. काही असे काम असतात जे फिल्ड मध्ये जाऊन आपण पार्ट टाईम करून घेतो पण जास्त इन्कम आपली तिथून होत नाही पण असे काही मार्ग आहेत, जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कुठुनही काम करून करू शकतात. त्यासाठी फक्त तुमच्याकडे मोबाईलची आवश्यकता आहे जो आजकाल सर्वांकडे असतो. तर याविषयी या ब्लॉग मध्ये माहिती दिली आहे.

Advertisement

मित्रांनो आजकाल रोज नवीन apps, games आणि वेबसाईट launch होत असतात. पण काही मोठ मोठ्या कंपन्या असतात जे कोणत्याही app किंवा वेबसाईटला डायरेक्ट launch करत नाही ते लोकांकडून टेस्ट करून घेतात ज्यामुळे ते launch होण्याआधी त्याच्यात काही bug असतील काही lagging चा problem येत असेल किंवा game असतील तर कुठे हि गोष्ट चांगली होऊ शकते हे लोकांकडून टेस्ट करून घेतात. पण हे कोणत्याही लोकांना टेस्ट करायला देतात का? तर नाही. काही अश्या वेबसाईट आहेत user testing, play test cloud यांना कंपन्या वेबसाईट,apps टेस्ट करण्यासाठी देतात. तर एक सोपा मार्ग आहे. usert testing, play test cloud अश्या वेबसाईट वर तुम्हाला as a tester म्हणून रजिस्टर करून घ्यायचं आहे. तिथे एक टेस्ट होते तिथे तुम्ही पास झालात तर तुम्हाला टेस्टिंगसाठी apps, website मिळत जातील त्यांना टेस्ट करून तुमचा feedback त्यांना द्यायचा राहतो. आणि ते झाल्यानंतर तुमच्या paypal अकाऊंटला पैसे जमा होतात.

Paypal account काय असत?

जस भारतात कोणाला जर आपल्याला पैसे पाठवायचे असतील तर UPI, Paytm किंवा direct bank account मध्ये आपण पैसे मागवू शकतो. पण international लेव्हलला Paypal अकाऊंट बनवावे लागते. जे अकाऊंट आपल्या ई-मेल आय-डी कनेक्ट असत. तिथे तुम्ही तुमच बँक अकाऊंट कनेक्ट करून पैसे receive करू शकतात. फक्त जेव्हा आपण बँकेत पैसे ट्रान्स्फर करतो तेव्हा Paypal काही चार्जेस कट करून आपल्याला amount देत असतो. Paypal च app सुद्धा येत जर तुम्हाला माहित नसेल Paypal वर अकाऊंट कस बनवायचं तर यावर detailed मध्ये व्हिडिओ आपण बनवलाय त्याची लिंक खाली दिलेली आहे.

Play Test Cloud

Play test cloud या platform वर जास्त करून गेम्स टेस्ट करण्यासाठी येत असतात जे टेस्ट करून तुम्ही इन्कम करू शकतात. यासाठी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त device असतील तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. Play test cloud वर अकाऊंट कस बनवायचं यावर detailed व्हिडीओ icoNik Marathi युट्युब channel वर टाकला आहे. तो पाहून तुम्ही Play test cloud वर अकाऊंट उघडू शकतात.

User Testing

Usertesting हि एक अशी वेबसाईट आहे जिथे तुम्ही as a tester जॉईन करू शकतात, त्यासाठी तुम्हाला ई-मेलने अप्लाय कराव लागेल, त्यानंतर एक टेस्ट द्यावी लागेल. आणि तुम्ही पैसे कमवू शकणार आहात. इथे टेस्ट करण्यासाठी apps, वेबसाईट मिळत असतात. एका app किंवा वेबसाईटला टेस्ट करून तुम्ही ८०० ते १००० रुपये कमवू शकतात.

Advertisement

Leave a Comment