या ६ स्किल्सद्वारे फ्रीलांसिंग करून कमवा लाखो रुपये महिना | Top 6 skills to earn money with freelancing in marathi

मित्रांनो तुम्हाला साईड इन्कम कमवायची असेल किंवा फुल तैम एखाद्या विशेष क्षेत्रात करीयर करायचं असेल तर फ्रीलांसिंग हा एक तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. त्यापैकी काही असे फ्रीलांसिंग स्किल्स ज्यांची मार्केट मध्ये खूप डिमांड आहे आणि त्याद्वारे काही फ्रीलांसर्स महिना लाखोंची इन्कम करत आहेत. तर टॉप ६ फ्रीलांसिंग स्किल्स त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल किंवा ते शिकून तुम्ही त्यामध्ये एक्स्पर्ट होऊनसुद्धा फ्रीलांसिंग करू शकणार आहात.

टॉप ६ फ्रीलांसिंग स्किल्स | Top 6 Freelancing skills in Marathi

Advertisement
  1. Video Editing 
  • Video हे engage करतात त्यामुळे प्रत्येक बिसनेसला त्यांच्या मार्केटिंग साठी video बनवायला video editor लागतो. जास्त करून जेवढेही 1 लाखाचा वर subscriber असणारे युट्युब creator आहेत त्यांना व्हिडीओ editor ची आवश्यकता असते. आता सर्वीकडे short video trending ला आहे आणि युट्युब shorts , इंस्टाग्राम रील्स असे platform monetize होत आहेत त्यामुळे त्या सर्वांना त्यांच्या content वर फोकस कराव लागत म्हणून तिथेही video editor ची आवश्यकता असते.
  1. Copywriting 
  • तुम्ही ऐकलच असेल surf excel, डाग अच्छे हे. पेहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. असे काही शब्द ज्यामुळे brand ओळखला पण जातो आणि मार्केटिंग पण होते तर असे captions त्याचबरोबर brands साठी email writing करण असे काम करण्यासाठी copy writers ची आवश्यकता असते. त्यासह कोणत्याही बिसनेसच्या सेल्स वाढवण्यासाठी मार्केटिंग मध्ये टेक्स्ट स्वरुपात असणाऱ्या टॅगलाईन बनविणे, प्रुफरीडिंग करणे, टेक्स्ट एडीट करणे, टॉपिक रिसर्च करणे असे काम करण्यासाठी कंपनीला कॉपी रायटरची गरज पडत असते.
  1. Graphic Designing
  • तुम्ही युट्युब वर कोणताही व्हिडीओ पाहण्यापूर्वी काय पाहतात? एखाद percent म्हणतील title पण  99% लोक व्हिडीओ थंबनेल पाहून व्हिडीओवर क्लिक करतात आणि व्हिडीओ represent करण्याच काम थंबनेल करतात. creative, catchy thumbnail बनविण्यासाठी युट्युब creators ला यांची गरज असते. जे पण आपल्या एरियात advertising banner बघतो ते पण graphic designer तयार करतात social media वर brands ला मार्केटिंगसाठी design बनविण्यासाठी graphic designers ची गरज असते. 
  1. Content writing
  • तुम्हाला माहितच असेल आपण यावर व्हिडीओ टाकले आहेत. ब्लॉग बनवून google adscence approved झाल्यावर पैसे कमविता येतात. त्यामुळे सर्वच ब्लॉग बनवून पैसे कमवायला लागले आहेत. आणि आता तर वेब स्टोरी मधून पण खूप जास्त revenue generate होतो. तिथे webstory च content लिहायला आणि ब्लॉग च content लिहायला content writers ची खूप गरज bloggers ला असते. त्यामुळे content writers ची खूप मागणी वाढली आहे. आणि मराठी content writers तर खूपच कमी आहे. 
  • यासोबतच व्हिडीओ बनविणाऱ्या Creators ला देखील कंटेंट रायटर्सची आवश्यकता असते. कारण त्यांच्या व्हिडिओ मध्ये वापरात येणारी माहिती रिसर्च करण्यासाठी, स्क्रीप्टिंग करण्यासाठी, व्हिडीओ टॉपिक्स शोधण्यासाठी कंटेंट रायटर्सची गरज पडते.
  1. Audio transcription (85%)
  • Facebook वर 85% video हे without audio पाहिले जातात आणि युट्युब नवीन अपडेट नुसार video without audio automatic home screen वर play होतात त्यामुळे audio ला subtitle देण्यासाठी किंवा काही लोकांना translate करून फक्त caption देण्यासाठी यांची गरज असते. 
  1. Freelance tele caller
  • कंपन्यांना calling किंवा सपोर्ट साठी लोक लागतात पण त्यांना फुल टाईम कामावर ठेऊन जास्त पगार द्या. ऑफिस सेटप करा यात आता कंपन्या जास्त पैसे खर्च करत नाही त्यामुळे कंपन्या freelance tele caller असतात त्यांना त्यांच्या वेळेनुसार करता येणार काम असत आणि पेमेंट पण weekly मिळत घरून काम असत त्यामुळे तुमच्याकडे जास्त स्कील नाहीयेत फक्त बोलण्याची स्कील आहे तरी कंपन्या अश्या लोकांना hire करतात.

सुरुवातीला फ्रीलांसिंग क्लायंट कसे शोधावे | How to find freelancing clients in marathi

  • LinkedIN वर अनेक सारे Cretors, Professionals, Multi National Company मधले लोक येथे Active असतात ते जास्त करू जॉब आणि फ्रीलांसिंगसाठी इथूनच लोकांना hire करत असतात त्यामुळे LinkedIN वर प्रोफेशनल अकाऊंट बनवून तुम्ही क्लायंट पर्यंत पोहचू शकतात. त्यासोबतच युट्युब आणि इन्स्टाग्राम वर असणारे क्रिएटर्स त्यांच्या बायो मध्ये, डिस्क्रीप्शन मध्ये किंवा About सेक्शन मध्ये त्यांच्या बिसनेस मेल देत असतात त्यावर तुम्ही त्यांना मेल करून तुमच्या फ्रीलांसिंग स्किल्स बद्दल सांगून तुमच्या चार्जेसची माहिती देऊन त्यासोबतच तुमच्या कामाचे १-२ samples किंवा तुम्ही कुठे याआधी क्लायंटचे वर्क केले असेल तर ते सुद्धा त्यांना share करा जेणेकरून त्यांना तुमच्याकडे असणारी स्किल लक्ष्यात येते हे सर्व त्यांच्या मेल वर पाठवू शकणार आहात.
  • Fiverr, Upwork सारख्या अनेक फ्रीलांसिंग वेबसाईट वर जाऊन तुम्ही फ्रीलांसिंग क्लायंट मिळवू शकतात. Fiverr, Upwork सारख्या १० फ्रीलांसिंग वेबसाईट वर तुम्ही तुमची प्रोफाईल बनवू शकतात. तिथूनही तुम्हाला क्लायंट मिळतील. यावर सविस्तर ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा.

फ्रीलांसिंग साठी किती चार्जेस घ्यायचे | How many rupees get charged from clinet

  • सुरुवातीला तुमच्याकडे प्रोजेक्ट नसतील त्यामुळे ईतर क्लायंटला तुमच्या पोर्टफोलीओ मध्ये असलेले काम दाखवण्यासाठी नसेल तर तुम्ही काही दिवस फ्री मध्ये किंवा कमी चार्जेस घेऊन तुमच्या पहिल्या प्रोजेक्ट ची सुरुवात करू शकतात. हळूहळू तुमची क्वालिटी वाढल्यास तुम्ही चार्जेस वाढवू शकतात. यात एक स्मार्ट वर्क तुम्ही करू शकतात. जसे, कमी प्रोजेक्ट्स जास्त क्वालिटी आणि जास्त चार्जेस घेऊन तुमच्या कडे जरी प्रोजेक्ट्स कमी असतील तरी तुम्ही चांगली क्वालिटी क्लायंटला देऊन हक्काने जास्त पैसे चार्ज करू शकतात.
  • Fiver.com या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमच्या क्षेत्रातील फ्रीलांसिंग स्किल मध्ये घेतले जाणारे चार्जेस पाहू शकतात. त्यानुसार तुम्ही क्लायंट चार्जेस सांगू शकतात.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version