आपल्या राज्य सरकार तर्फे तसेच केंद्र शासनातर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात त्यापैकी काही योजना ह्या खास महिलांसाठी सुद्धा असतात अशीच एक योजना आहे ,उद्योगिनी योजना. उद्योगिनी योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच आर्थिक हातभार सुद्धा देणे आहे. बऱ्याचशा महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु काही कारणास्तव किंवा आर्थिक अडचणीमुळे त्या करू शकत नाही परंतु उद्योगिनी योजनेमुळे नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो.चला तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल ची माहिती…
उद्योगिनी योजना | Udyogini Scheme –
– उद्योगिनी योजना ही भारत सरकार अंतर्गत महिला विकास महामंडळामार्फत लागू करण्यात आलेली आहे.
– या योजनेचा उद्देश महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे हा आहे.
– या योजनेमुळे कुटुंबाचे उत्पादन वाढवण्यामध्ये तर मदत होईलच त्याचबरोबर देशाच्या प्रगतीमध्ये सुद्धा हातभार लागेल.
– उद्योगिनी योजनेअंतर्गत महिला ८८ प्रकारचे लघुव्यवसाय सुरू करू शकतात.
– ज्या महिला व्यवसाय सुरू करू पाहत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा महिलांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध होते.
– शारीरिकदृष्ट्या विकलांग परिस्थितींखालील महिलांना आणि SC, ST महिलांना या योजनेअंतर्गत व्याजमुक्त कर्ज सुद्धा मिळू शकते.
– या योजनेअंतर्गत कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार ३० टक्के अनुदान दिले जाते.
– उद्योगिनी योजनेमुळे महिला नक्कीच आत्मनिर्भर बनू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.
उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक पात्रता | Eligibility criteria for Udyogini Scheme :-
– उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
– वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाख रुपये इतकी आहे.उत्पादनाची कोणतीही मर्यादा विधवा आणि दिव्यांग महिलांसाठी नाही, तसेच त्यांना बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळू शकते.
– अर्जदार महिलेने यापूर्वी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत जर समजा कर्जाचा लाभ घेतला असेल तर आणि परतफेड व्यवस्थितपणे केलेली नसल्यास या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकत नाही.
– अर्जदार महिलेचा क्रेडिट स्कोर सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतला जातो.