Women And Child Development Internship 2024 | Government internships 2024 | WCD INTERNSHIP I महिला आणि बाल विकास इंटर्नशिप I Best Government Internships 2024

Women And Child Development Internship

Women And Child Development Internship 2024 | Government internships 2024 | WCD INTERNSHIP I महिला आणि बाल विकास इंटर्नशिप I Best Government Internships 2024

       आजच्या ब्लॉगमध्ये आपण महिला आणि बाल विकास इंटर्नशिप ( Women And Child Development Internship ) बद्दल जाणून घेणार आहोत.पंतप्रधान यांच्या आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी “सबका साथ ,सबका विकास, सबका विश्वास ,सबका प्रयत्न” ही कल्पना ट्रान्सलेट करणे असा या इंटर्नशिपचा उद्देश आहे.

Women And Child Development Internship 2024 | Government internships 2024 | WCD INTERNSHIP I महिला आणि बाल विकास इंटर्नशिप I Best Government Internships 2024
Advertisement

Eligibility for Women And Child Development Internship | इंटर्नशिपसाठी पात्रता –

 – महिला विद्यार्थी, स्कॉलर्स, सामाजिक कार्यकर्ते तसेच टीअर-I नसलेले शहरे आणि भारतामधील ग्रामीण भागातील शिक्षक या इंटर्नशिपसाठी पात्र असतील. 

– महिला विद्यार्थी, स्कॉलर्स, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक  यांना कोणत्याही विद्यापीठ/शैक्षणिक/नॉन अकॅडमीक संस्थमध्ये नोंदणी किंवा असोसिएटेड असणे आवश्यक आहे.

महिला आणि बालविकास इंटर्नशिप साठी वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे 

Selection of Interns | इंटर्नची निवड –

– या इंटर्नशिप साठी रीतसर स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत इंटर्नची निवड केली जाईल.

– जर आवश्यक असेल तर मिनिस्ट्री निवड प्रक्रियेसाठी

विद्यापीठे/नामांकित संशोधन संस्थांमधून काही प्राध्यापक सदस्य/विषय तज्ञांना सुद्धा आमंत्रित करू शकतात.

इंटर्नशिप कालावधी | Internship period –

– महिला आणि बाल विकास इंटर्नशिप ही वर्षभरामध्ये 2 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

– इंटर अर्ज सबमिट करत असताना दोन महिन्यांच्या बॅच पैकी कोणत्याही बॅचची निवड करू शकतात.

इंटर्नची संख्या | No.of interns –

– मिनिस्ट्री प्रति बॅच 20 इंटर्न घेईल.

Furnishing of undertaking/declaration | हमीपत्र/घोषणा सादर करणे –

– ही इंटर्नशिप नोकरीची कुठलीही ऑफर देत नाही तसेच भविष्यामध्ये कोणतीही नोकरी देण्याची वचनबद्धता देत नाही अशा प्रकारे निवडलेली इंटर्न डिक्लेअर करेल.

– निवड झालेल्या इंटर्नने इंटर्नशिपसाठी रिपोर्टिंग करण्यापूर्वी डिक्लेरेशन ऑफ सिक्रसी ( declaration of secrecy ) सादर करणे आवश्यक असेल.

Incentives for Internship | इंटर्नशिपसाठी स्टायपेंड :

– इंटर्नला 20,000/- रु. दर महिना स्टायपेंड दिला जाईल.

– प्रवास खर्चाची परतफेड (डीलक्स/एसी बस/3 टायर एसी ट्रेनद्वारे) मिनिस्ट्री मधील प्रोग्रॅम मध्ये सामील होण्यासाठी आणि प्रोग्रॅमच्या शेवटी घरी परतण्यासाठी दिली जाईल.

 – इंटर्नशिपचा भाग म्हणून दौऱ्यावर जाणाऱ्या इंटर्न्सना प्रवास खर्च (डीलक्स/एसी बस/3 टायर एसी ट्रेनद्वारे) आणि सध्याच्या GOI दरांनुसार DA परत केला जाईल.

– इंटर्नला इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्टिफिकेट सुद्धा दिले जाईल जसे की सबमिशन / प्रेझेंटेशन ऑफ पेपर्स / रिपोर्टस ऑफ द वर्क डन.

– इंटर्न्सना त्यांच्या दिल्लीतील प्रोग्रॅम कालावधीसाठी शेअरिंग बेसिसवर होस्टेलची सुविधा सुद्धा करून जाईल. 

– होस्टेलच्या सुविधेमध्ये प्रत्येक खोलीत अटॅचड बाथरूम, बेड (मॅट्रेसचा समावेश नाही), टेबल, खुर्ची आणि कपाट यासारख्या यासारख्या बेसिक सुविधांचा समावेश असेल. 

– निवासाचा भाग म्हणून मेस चार्जेसचा समावेश केला जात नाही आणि होस्टेलच्या सुविधेचा लाभ घेणाऱ्या इंटर्नने ते भरावे.

– होस्टेलची सुविधा इंटर्नशिप सुरू होण्याच्या 2 दिवस आधीपासून ते इंटर्नशिप संपल्यानंतर 2 दिवसांपर्यंत उपलब्ध असेल.

– इंटर्नला मिनिस्ट्री मधील सीटिंग अरेंजमेंट, इंटरनेट फॅसिलिटी आणि स्टेशनरी वस्तू यासारखे आवश्यक लॉजिस्टिक सपोर्ट उपलब्ध करून दिले जातील.

– इंटर्न्सना एक इंटर्नशिप कोऑर्डिनेटर दिला जाईल जो इतर स्टेकहोल्डर्ससह नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन सह संपूर्ण इंटर्नशिप एक्सरसाइज कोऑर्डीनेट करण्यासाठी जबाबदार असेल.

Termination of Internship and resolution of disputes | इंटर्नशिपची समाप्ती आणि विवादांचे निराकरण –

– मिनिस्ट्रीला इंटर्नच्या कामगिरीचे मूल्यांकन/पुनरावलोकन करण्याचा आणि विविध असाइनमेंट वेळेवर पूर्ण करून घेण्याचा अधिकार असणार आहे.

– इंटर्नने त्यांची प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटी वेळेमध्ये आणि समाधानकारकपणे पूर्ण करणे गरजेचे आहे.

– नॉन कंपलाईन्स तसेच नॉन परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये, मिनिस्ट्रीला या प्रभावासाठी संबंधित इंटर्नला नोटीस जारी करून इंटर्नशिप प्रोग्राम समाप्त करण्याचा अधिकार असेल.

अर्ज कसा करावा

‘महिला आणि बालविकास इंटर्नशिप प्रोग्राम ( Women And Child Development Internship )’साठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version