Wood press oil business | How to start wood press oil business | कच्ची घाणी तेल व्यवसाय कसा सुरू करावा | Best Business opportunities 2024

Wood press oil business | How to start wood press oil business | कच्ची घाणी तेल व्यवसाय कसा सुरू करावा | Best Business opportunities 2024 –

         कच्ची घाणी तेल व्यवसाय ( Wood press oil business ) या व्यवसायाबद्दल या ब्लॉग मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.प्रत्येक घरोघरी स्वयंपाकासाठी तेल नक्की वापरले जाते तसेच तेलाचे इतरही खूप फायदे आहे. तेल हे विविध बियाणांपासून बनवले जाते जसे की शेंगदाणे, सोयाबीन तसेच नारळ यापासून सुद्धा तेल बनवले जाते. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि त्या तेलाचा आरोग्यासाठी होणारा फायदा काय आहे ,यानुसार तेलाची निवड करत असतात. कच्ची घाणी तेल हे अतिशय शुद्ध तेल असून आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असल्याकारणाने हल्ली बरेच लोक या तेलाचा वापर करताना दिसत आहे. म्हणूनच कच्ची घाणी तेल व्यवसाय ( Wood press oil business ) करणे फायदेशीर ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती….

Advertisement

Table of Contents

कच्ची घाणी तेल व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कच्चामाल | Raw material required for Wood press oil business –

कच्ची घाणी तेल व्यवसायासाठी ज्यापासून आपल्याला तेल बनवायचे आहे त्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. 

– शेंगदाणे 

– तीळ 

– नारळ 

– सूर्यफूल 

– आणि इतर. 

कच्ची घाणी तेल व्यवसाय करण्यासाठी लागणारी जागा |  Area required for Wood press oil business –

कच्ची घाणी तेल व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्चामाल ठेवण्यासाठी तसेच मशीन ठेवण्यासाठी पुरेशी जागा आवश्यक आहे, अंदाजे 1000 स्क्वेअर फिट जागा या व्यवसायासाठी लागू शकते.

कच्ची घाणी तेल व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मशीन | Machines required for Wood press oil business –

– घाणी मशीन 

– फिल्टर मशीन 

– बॉटल फिलिंग आणि कॅपिंग मशीन

जर कच्ची घाणी तेल व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर सुरू करणार असाल तर तेलाची क्वालिटी चेक करण्यासाठी टेस्टिंग लॅबची सुद्धा आवश्यकता असेल.

कच्ची घाणी तेल व्यवसायासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी | Electric load for wood press oil business –

कच्ची घाणी तेल व्यवसाय 2 ते 3 किलो वॅट इलेक्ट्रिक लोडवर सुरू करू शकतो. मशीनच्या कॅपॅसिटीनुसार हा लोड वाढू शकतो.

तेल काढण्याची प्रक्रिया | Oil extracting process –

– सर्वप्रथम शेतकऱ्यांकडून किंवा होलसेलर्स कडून घेतलेले बी व्यवस्थित रित्या स्वच्छ केले जातात, यामध्ये माती किंवा छोटे छोटे खडे असतील तर ते दूर केले जातात.

– यानंतर ब्लोईंग एअर च्या सहाय्याने बी मध्ये किंवा ज्या मटेरियल पासून तेल काढणार आहोत त्यामध्ये असणारा भुसा दूर केला जातो. 

– यानंतर बियाण्यांची कंडिशनिंग केली जाते. 

– कंडिशनिंग केल्यानंतर बिया उच्च तापमानावर हिट केल्या जातात जेणेकरून त्यामध्ये असणारे बॅक्टेरिया नष्ट होतील.

– यानंतर कच्चा माल घाणी मशीन मध्ये टाकला जातो आणि याद्वारे तेल काढले जाते. 

– हे तेल स्टेनलेस स्टील स्टोरेज टॅंक मध्ये साठवले जाते.

– आता फिल्टरिंग मशीनच्या सहाय्याने फिल्टरिंग प्रोसेस केली जाते म्हणजेच तेल व्यवस्थित रित्या फिल्टर केले जाते.

– आता हे तेल आपण आपल्या आवश्यकतेनुसार बॉटल्स, डबे किंवा पाऊचेस मध्ये पॅकेजिंग करून मार्केटमध्ये विक्री करू शकतो.

*कच्चामालामध्ये मोईश्चर असल्यास तेलाचे प्रमाण कमी निघते.

कच्ची घाणी तेल व्यवसायासाठी आवश्यक मॅन पावर | manpower required for Wood press oil business –

– कच्ची घाणी तेल व्यवसायासाठी दोन ते तीन व्यक्ती लागू शकतात त्यापैकी काही व्यक्ती कुशल असणे म्हणजेच या व्यवसायाबद्दल माहिती असणे असे व्यक्ती असावेत.

 – जे व्यक्ती स्किल्ड असतील ते मशीन ऑपरेटर म्हणून काम करतील.

कच्ची घाणी तेल व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक | investment required for wood press oil business –

– कच्ची घाणी मशीन अंदाजे चार लाखाच्या आसपास मिळू शकेल या सोबतच इतर खर्च गृहीत धरून 7 ते 8 लाख रुपये या व्यवसायासाठी लागू शकतात.

– आपण जितक्या मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करू म्हणजेच मशीनची संख्या जेवढी वाढेल तितकी गुंतवणूक सुद्धा वाढेल.

कच्ची घाणी तेल व्यवसायामध्ये मिळणारा नफा | profit margin –

– 1 Kg शेंगदाणे ,तीळ यांसारख्या कच्च्या मालापासून अंदाजे 40 ते 45 टक्के ऑइल निघते.

– एक लिटर तेलाच्या मागे 15 ते 20 टक्के प्रॉफिट मार्जिन मिळू शकते.

– तसेच तेलाव्यतिरिक्त निघालेले बाय प्रॉडक्ट सुद्धा मार्केटमध्ये विक्री केले जाऊ शकतात त्यामधून सुद्धा नफा मिळवला जाऊ शकतो.

– प्रोडक्शन कॅपॅसिटी नुसार प्रॉफिट वाढवू शकतो.

कच्ची घाणी तेल व्यवसायाची मार्केटिंग | Marketing –

– तेलाची मार्केटिंग करण्यासाठी होलसेलर्स तसेच रिटेलर्स यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तेलाचे सॅम्पल्स त्यांना देऊ शकतो. 

– तसेच सोशल मीडिया मार्केटिंग व इतर मार्केटिंग पद्धती सुद्धा अवलंबवू होऊ शकतो.

कच्ची घाणी तेल व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने | licences –

– जीएसटी रजिस्ट्रेशन 

– FSSAI 

– उद्योग आधार 

   अशा रीतीने कच्ची घाणी तेल व्यवसाय ( wood press oil business ) सुरू केला जाऊ शकतो.

SUMMERY :

कच्चामालशेंगदाने ,तीळ,सूर्यफूल,नारळ आणि इतर.
आवश्यक जागा १००० Sq .ft .
गुंतवणूक ७ ते ८ लाख
इलेक्ट्रिसिटी लोड २ ते ३ Kw ( मशीन नुसार वाढेल )
मॅनपॉवर २-३
प्रॉफिट मार्जिन १५ ते २० %
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version