ई श्रम कार्ड योजना |E- Shram card information in Marathi –
आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी डेटा बेस तयार केला जात आहे आणि त्यासाठीच ई श्रम कार्ड काढले जात आहे, या कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती….
ई श्रम कार्ड म्हणजे काय ? What is e-shram card ?
– असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ई श्रम कार्ड देण्यात येणार आहे.
– या कार्डमुळे सरकारकडे या कामगारांचा एक डेटाबेस सुद्धा तयार होईल आणि कामगारांना योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा उपयोग सुद्धा होईल.
– कामगारांच्या सर्व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या पडताळणी केल्यानंतरच कामगारांना ई श्रम कार्ड मिळणार आहे.
– जर ई-श्रम कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला ते रद्द करावेसे वाटले तर तसा पर्याय दिलेला नाही,त्यामुळे ह्या कार्ड साठी आपण पात्र असू तरच अर्ज करावा.
– जर विद्यार्थी असताना तुम्ही ई श्रम कार्ड बनवले असेल आणि भविष्यामध्ये संघटित क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार असाल तर या कार्डचा काहीही उपयोग होणार नाही.
– एखाद्या व्यक्तीचे पीएफ खाते असेल आणि त्या व्यक्तीने ई श्रम कार्ड बनवलेले असेल तर ईतर ठिकाणी अर्ज करण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते.
– आता रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबरची आवश्यकता असेल.नंतर दिलेला कॅप्चा भरावा लागेल व OTP सुद्धा एंटर करावा लागेल.
– वरील माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.
– त्यानंतर पुढे सुद्धा आधार क्रमांक आणि तुमची इतर वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी. तुमचा आधार कार्ड वर जो फोटो आहे तोच फोटो या ई श्रम कार्ड वर सुद्धा असेल.
– ई श्रम कार्ड तयार झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून लॅमिनेट करून स्वतः जवळ ठेवू शकता.