सध्या फूड ट्रक व्यवसाय खूपच ट्रेंडिंगला आहे. या व्यवसायाची खासियत आणि सर्वात मोठा फायदा असा आहे की आपण विविध ठिकाणी हा व्यवसाय करू शकतो म्हणजेच मोबिलिटी, आपण आपल्याला हवं तेव्हा व्यवसायाचे लोकेशन बदलू शकतो आणि त्यामुळेच बरेचसे छोटे रेस्टॉरंट सुरू करू पाहणारे लोक सुद्धा फूड ट्रक सुरू करत आहेत. चला तर जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…
स्टेप १ – फूड ट्रक व्यवसायासाठी व्यवसाय योजना तयार करा.
– कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना तयार करणे खूप महत्त्वाचे आहे असे केल्यामुळे आपल्या व्यवसायाबद्दलची अधिक माहिती मिळते आणि कोणत्या वेळी कोणते काम करणे गरजेचे आहे तसेच कोणकोणती कामे पूर्ण झालेली आहेत तसेच कोणती कामे कधी केली गेली पाहिजे या सर्व गोष्टींचा एक अंदाज आपल्याला मिळतो.
– या व्यवसाय योजनेमध्ये खूप सार्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो जसे की,
तुम्ही हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात आणि कोणत्या ट्रकची /vehicle ची निवड करणार आहात,
या व्यवसायासाठी किती गुंतवणूक करणार आहात,
या व्यवसायासाठी कोणत्या सामग्रीची आवश्यकता आहे,
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या परवान्यांची आवश्यकता लागेल,
व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल यांसारख्या बऱ्याच गोष्टींचा समावेश तुम्ही व्यवसाय योजनेमध्ये करू शकता जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा अडथळे बऱ्यापैकी कमी होतात
स्टेप २ – योग्य फूड ट्रक किंवा व्यावसायिक वाहनाची निवड करा.
– तुम्ही जर कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करणार असाल तर जुना ट्रक सुद्धा चांगल्या पद्धतीने मॉडीफाय तसेच आकर्षक रित्या पेंट करून वापरू शकता परंतु जुना ट्रक खरेदी करताना त्या ट्रकचे सर्व कागदपत्रे तपासून त्याची कंडिशन चेक करून मगच खरेदी करा.
– जर या व्यवसायासाठी योग्य ती गुंतवणूक करण्याची तुमची तयारी असेल तर मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे वेहिकल्स उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता, परंतु ट्रक खरेदी करत असताना किचन त्यामध्ये कसे व्यवस्थित रित्या सेट होईल याचा पूर्णपणे विचार करून मगच खरेदी करावा.
स्टेप ३ – तुमच्या फूड ट्रकसाठी योग्य ठिकाण निवडा.
– असे ठिकाण निवडा जेथे आजूबाजूला तुम्ही ज्या खाद्यपदार्थांची विक्री करणार आहात तसे खाद्यपदार्थ विक्रेते नसतील, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या किंवा गर्दी ज्या रस्त्यावर असते असे ठिकाण निवडणे सुद्धा योग्य राहील.
– ट्रकचे पार्किंग व्यवस्थित रित्या करावे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही परंतु तुमचा फूड ट्रक लोकांना व्यवस्थितरित्या दिसू शकेल.
स्टेप ४ – कच्चा माल आणि स्वयंपाकघरामध्ये लागणारी उपकरणे
– किचनमध्ये ज्या कोणत्या उपकरणांची आवश्यकता असेल जसे की मिक्सर, फ्रीझर, रेफ्रिजरेटर्स, मायक्रोवेव्ह, ज्युसर,जनरेटर किंवा इन्व्हर्टर,गॅस/बर्नर यांसारखी जी कोणती उपकरणे तुम्हाला लागणार आहे त्या उपकरणांची एक यादी तयार करा आणि शक्यतो इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे नवीनच घ्या कारण त्यावर गॅरंटी सुद्धा मिळते.
– तसेच इतर कच्चामाल भाजीपाला किराणा यांची सुद्धा तुम्ही जो काही मेनू ठरवला आहे त्यानुसार यादी तयार करा आणि होलसेल मार्केट मधून या मालाची खरेदी करा.
स्टेप ५ – फूड ट्रक व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवा.
कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने आणि परवानगी मिळवणे खूप आवश्यक आहे.
– शॉप आणि स्थापना परवाना
– अग्निसुरक्षा प्रमाणपत्र
– आरटीओकडून एनओसी
– महापालिकेकडून एनओसी
– FSSAI परवाना
– स्वयंपाकघर विमा
स्टेप ६ – मेनू ठरवा आणि आवश्यक असल्यास मॅनपावर ठेवा.
फूड ट्रक सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या फूड ट्रकवर कोणकोणती खाद्यपदार्थ देणार आहात याची यादी बनवा, तुम्ही स्वतः ते खाद्यपदार्थ बनवण्यात एक्सपर्ट असाल तर अति उत्तम परंतु तसे नसल्यास तुम्ही मॅनपावर सुद्धा ठेवू शकता.
स्टेप ७ – मार्केटिंग
कुठल्याही व्यवसायासाठी महत्त्वाची असते ती मार्केटिंग…
– मार्केटिंग साठी सध्याच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फूड ट्रकची मार्केटिंग करू शकता.
– तसेच तुमच्या खाद्यपदार्थांची क्वालिटी आणि चव जर चांगली असेल तर नक्कीच तुमच्याकडे आलेले ग्राहक इतर ग्राहकांना सुद्धा सांगतील त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना नेहमी चांगलीच देण्याचा प्रयत्न करावा.
– तसेच व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा केल्यावर काही पॅम्प्लेट्स सुद्धा छापू शकता.
– तसेच वेगवेगळे डिस्काउंट किंवा ऑफर्स सुद्धा ग्राहकांना देऊ शकता.