SIP tips | Tips for Investing in Sip | एस आय पी मध्ये गुंतवणूक करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेणे आवश्यक आहे जाणून घेऊयात अशा काही टिप्स…I 6 Best SIP tips

SIP tips | Tips for Investing in Sip | एस आय पी मध्ये गुंतवणूक करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेणे आवश्यक आहे जाणून घेऊयात अशा काही टिप्स…

    बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत असतात असं म्हणता येऊ शकतं की पूर्वीपेक्षा सध्या गुंतवणूक करण्यासाठी जास्त मार्ग उपलब्ध आहेत. प्रत्येक गुंतवणुकीच्या मार्गांची व्यवस्थितरित्या माहिती घेऊन त्यानंतरच कुणीही त्यामध्ये गुंतवणूक करावी. बरेच लोक एसआयपी मध्ये गुंतवणूक करत असतात, यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही टिप्स लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊयात अशाच काही एसआयपी टिप्स ( SIP tips ) बद्दल अधिक माहिती ..

SIP tips | Tips for Investing in Sip | एसआयपी टिप्स – 

SIP tips
SIP tips

* सर्व माहिती एज्युकेशनल पर्पजसाठी देत आहोत यामधून गुंतवणूक करण्याचा कुठलाही सल्ला देत नाही, गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती किंवा कागदपत्रे व्यवस्थित तपासावी किंवा आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

१. एस आय पी लवकर सुरू करा –

– एसआयपी बद्दल जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला माहिती होईल तेवढ्या लवकरात लवकर एस आय पी सुरू करणे फायदेशीर ठरू शकते मग भलेही एसआयपीची रक्कम सुरुवातीला कमी का असेना परंतु आपल्या वयाच्या जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर यासाठी सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. 

– एस आय पी लवकर सुरू केल्यामुळे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो.

उदाहरण,समजा नेहा या मुलीने वयाच्या २५ व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि गुंतवणुकीची रक्कम दरमहा १० हजार रुपये ठेवली. तर दुसरीकडे नीलिमा हिने वयाच्या ३५ व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वर्षाला अंदाजे १५ टक्के परतावा मिळतो असे गृहीत धरू. तर या दोघीही वयाच्या ६० वर्षापर्यंत गुंतवणूक करणार आहेत असे उदाहरण म्हणून घेऊ. आता पुढील टेबल मध्ये इतर माहिती जाणून घेऊ.

मुद्दे नेहा नीलिमा
SIP रक्कम 10,000 दर महिना 10,000 दर महिना
गुंतवणुकीचा कालावधी 35 वर्षे 25 वर्षे
एकूण गुंतवणूक 42,00,000 ( 42 लाख रु.)30,00,000 ( 30 लाख रु. )
सरासरी वाढीचा दर15%15%
15% वाढ दराने पोर्टफोलिओ साईझ Rs 14,86,06,449 (14.86 Crores)Rs 3,28,40,737 (3.28 Crores)
SIP tips : Table 1

२.तुमची गुंतवणूक नियमितपणे वाढवा: 

– परतावा हा थेट गुंतवणुकीशी जोडलेला असला कारणाने जर आपण अधिक गुंतवणूक केली तर परतावा सुद्धा अधिक मिळू शकतो,परंतु गुंतवणूक कमी असेल तर परतावा सुद्धा कमी होईल.

– कंपाऊंडिंग मुळे एसआयपी मध्ये जास्त परतावा मिळतो म्हणून आपण वेळोवेळी गुंतवणुकीची रक्कम वाढवली पाहिजे.

उदाहरण –

समजा नेहा आणि नीलिमा या दोन मुलींनी एकाच वेळी ५ हजार रुपये दरमहा एसआयपी सुरू केली आणि १२ टक्के परतावा मिळतो असे आपण गृहीत धरू. तर नेहाने तिची एसआयपी अमाऊंट दरवर्षी १० % ने वाढवली आता त्यांचा पोर्टफोलिओ २० वर्षानंतर कसा असेल ते पुढील टेबल मार्फत समजून घेऊ.

मुद्दे नेहा नीलिमा
SIP रक्कम पहिल्या वर्षी ५००० रु. दर महा ,नंतर दरवर्षी १०%ने वाढवली ५००० रु.
गुंतवणुकीचा कालावधी 20 वर्ष 20 वर्ष
एकूण गुंतवणूक 34,36,500 ( 34.36 लाख रु.) 12,00,000 ( 12 लाख रु.)
सरासरी वाढीचा दर12%12%
२० वर्षानंतर पोर्टपोलिओ साईझ 93,46,955 ( 93.46 लाख रु)46,14,751 ( 46.14 लाख रु)
SIP tips :Table 2

३. एक्सपेंस रेशो आणि कमिशन: 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्ही दोन महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष दिले पाहिजे: 

– एक्सपेंस रेशो

– कमिशन

 म्युच्युअल फंड योजनेमध्ये एक्सपेंस रेशो बदलू शकते. जास्त एक्सपेंस रेशो म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्याचा एक मोठा भाग फी आणि खर्चामध्ये वापरला जाईल. 

– तसेच ब्रोकर किंवा म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म कमिशन आकारण्याची शक्यता असते, ज्यामुळे एकूण गुंतवणूक कमी होते. 

४. लॉंग टर्म गोल सेट करा: 

– एस आय पी ही लॉंग टर्म गोल्स पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची आहे. 

– गुंतवणूकदाराने लॉन्ग टर्म गुंतवणूक केली पाहिजे कारण लॉन्ग टर्म गुंतवणूक केल्यामुळे कंपाऊंडिंग पावरचा फायदा होऊन चांगला परतावा मिळतो.

५. शक्यतो लवकर विड्रॉल करण्याचे टाळा –

– आयुष्यामध्ये कधीही आर्थिक दृष्ट्या कठीण परिस्थिती उद्भवू शकते आणि अशावेळी जर आपण एसआयपी गुंतवणूक थांबून विड्रॉल करण्याचे ठरवले तर हा चुकीचा निर्णय ठरू शकतो. 

– कारण मार्केट कंडीशन खराब असताना जर आपण यामधून बाहेर पडलो तर आपल्याला नफा कमी प्रमाणामध्ये मिळू शकतो.

६. फंडचे परफॉर्मन्स रिव्ह्यू करा –

– कोणत्याही इन्वेस्टरचे प्राथमिक उद्दिष्ट असे असते की आपल्याला जास्तीत जास्त परतावा मिळावा. 

म्हणूनच मार्केटमध्ये फंड परफॉर्मन्स कसा आहे याचा मागवा घेणे आवश्यक आहे.

– जर निगेटिव परफॉर्मन्स ग्राफ असेल तर आपण रिस्क लक्षात घेऊ शकतो आणि त्यामधून वीड्रॉ करू शकतो परंतु विड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही वर्षांचे रिटर्न्स बघून मगच निर्णय घेणे योग्य ठरेल तसेच गुंतवणूक करताना सुद्धा काही वर्षांचा परतावा बघितला पाहिजे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे.

अशा प्रकारे ह्या काही एस आय पी टिप्स (SIP tips) आहेत.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment