दिवाळी फराळ व्यवसाय | महाराष्ट्रीयन व्यक्ती अगदी कुठेही गेले तरी दिवाळी फराळ आवर्जून मागवतात… त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता….बघा संपूर्ण माहिती | Diwali Faral Business –

दिवाळी फराळ व्यवसाय | महाराष्ट्रीयन व्यक्ती अगदी कुठेही गेले तरी दिवाळी फराळ आवर्जून मागवतात… त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता….बघा संपूर्ण माहिती | Diwali Faral Business –

     आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे सण मोठ्या आवडीने आणि आवर्जून साजरे केले जातात. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कित्येक सण मोठ्या उत्साहामध्ये लोक साजरे करतात त्यापैकीच सर्वांच्या आवडीचा असा सण म्हणजे दिवाळी

Advertisement
. दिवाळीच्या वेळी इतर खूप सारी तयारी आपण करत असतो परंतु दिवाळी म्हटलं की दिवाळीचं फराळ हे नक्कीच सर्वांना आठवतं आणि दिवाळीचं फराळ खायला सुद्धा सर्वांनाच आवडतं.दिवाळीचं फराळ आपण घरी खाण्यासाठी तर बनवतोच परंतु आपले जे मित्र मैत्रिणी असतील तसेच इतर जे पाहुणेरावळे असतील त्यांना सुद्धा आवर्जून दिवाळीचं फराळ देत असतो.परंतु आजच्या धावपळीच्या युगामध्ये तसेच नवरा बायको दोघेही जॉब करत असल्याने दिवाळीचं फराळ सर्वांनाच घरी बनवणे शक्य होते असे नाही. त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्रीयन लोक काही इतर देशांमध्ये नोकरीसाठी किंवा इतर काही कारणास्तव स्थायिक झालेले आहेत त्यांना सुद्धा दिवाळीचे फराळ आवर्जून हवे असते. आणि म्हणूनच अशातच जर तुम्ही सुद्धा दिवाळीच्या फराळाचा व्यवसाय केला तर नक्की फायदेशीर ठरू शकतो. याबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत….

स्टेप १ – सर्वप्रथम व्यवसाय योजना तयार करा.

Business Plan –

– कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना सर्वप्रथम व्यवसाय योजना तयार करणे गरजेचे आहे.

– दिवाळीच्या फराळाचा व्यवसाय सुरू करत असताना सुद्धा तुम्ही व्यवसाय योजना तयार करा मग त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो,

तुम्ही हा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात?

या व्यवसायामध्ये कोणकोणते पदार्थ तुम्ही बनवणार आहात ?

या व्यवसायासाठी कोणता कच्चामाल आणि इतर सामग्री लागेल,कुठे खरेदी कराल ?

या व्यवसायाची पॅकेजिंग कशी करणार आहात आणि दर काय ठरवणार आहात ?

या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक परवाने ?

या व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल ?

स्टेप २ – दिवाळीच्या फराळाचा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात, हे ठरवा.

Business location –

– जर तुम्हाला दिवाळीच्या फराळाचा व्यवसाय हा छोट्या स्तरावर सुरू करायचा असेल तर तुम्ही अगदी तुमच्या स्वतःच्या घरामधून सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता आणि कालांतराने व्यवसायामध्ये जशी वाढ होईल किंवा तुम्हाला जसा अनुभव येत जाईल तसा प्रत्येक वर्षी तुम्ही व्यवसाय वाढवू शकता.

– जर तुम्हाला दिवाळीच्या फराळाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी जागा भाड्याने घेऊ शकता.

स्टेप ३ – दिवाळीच्या फराळामध्ये कोणकोणते पदार्थ बनवणार आहात ,हे ठरवा.

Food products list –

– दिवाळीचा फराळ म्हटलं की वेगवेगळ्या भागांनुसार वेगवेगळ्या पदार्थांची एक यादीच तयार होते. तुम्ही कोणते पदार्थ बनवणार आहात हे ठरवा.त्यामध्ये पुढील पदार्थांचा तुम्ही समावेश करू शकता.

चकली, शंकरपाळे,लाडू, करंजी, अनारसे, चिवडा, शेव, मोतीचूर,चिरोटे,बालुशाही….असे खूप सारे प्रकार आहेत त्यामध्ये सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या डाळींच्या चकल्या तसेच वेगवेगळे प्रकारचे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा यांचा सुद्धा समावेश होतो.

– तुम्ही कोणते पदार्थ करण्यामध्ये सुगरण आहात किंवा कोणत्या पदार्थाचा व्यवसाय तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे जमू शकेल यानुसार तुम्ही हे फराळ निवडू शकता किंवा अगदी फराळाची व्हरायटी जर तुम्हाला ठेवायची असेल तर सर्वच फराळ बनवू शकता.

स्टेप ४ – या व्यवसायासाठी कच्चामाल आणि इतर सामग्री लागेल,कुठे खरेदी कराल,हे ठरवा.

Raw material –

– कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल जर होलसेलर कडून स्वस्त दरामध्ये मिळाला तर नक्कीच तो व्यवसाय फायद्यामध्ये असतो. म्हणूनच सर्वप्रथम कच्च्या मालाची खरेदी तुम्ही चांगल्या होलसेलर कडून करावी.

– तुम्हाला जर हा व्यवसाय घरामधूनच सुरू करायचा असेल तर घरामधील भांड्यांचा उपयोग करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता परंतु जर हा व्यवसाय तुम्हाला मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठमोठी भांडी व इतर सामग्री लागू शकते ती तुम्ही खरेदी करा.

– तसेच या व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची सर्वप्रथम यादी तयार करून घ्या म्हणजे आयत्यावेळी गोंधळ व्हायला नको.

स्टेप ५ – फराळाची पॅकेजिंग कशी करणार आहात आणि दर काय ठरवणार आहात.

Packaging and pricing –

– दिवाळीचे फराळ तयार केल्यानंतर त्या फराळाची पॅकिंग व्यवस्थित रित्या करणे सुद्धा गरजेचे आहे, जेणेकरून हे पदार्थ खराब व्हायला नको.

– तसेच जर तुम्ही दिवाळीचे फराळ परदेशामध्ये पाठवणार असाल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही पॅकिंग केली पाहिजे.

– दिवाळीच्या फराळाची पॅकिंग आकर्षकपणे कशी करता येईल हे सुद्धा लक्षात घेऊन तशी पॅकिंग तुम्ही करू शकतात.

– दिवाळीचे फराळ योग्य दरात मिळाले तर ग्राहक सुद्धा खरेदी करतात म्हणून तुम्ही सुद्धा या फराळाचा दर योग्य तो ठेवा आणि फराळाची गुणवत्ता नेहमी चांगले ठेवा जेणेकरून ग्राहक पुन्हा पुन्हा खरेदी करेल.

स्टेप ६ – दिवाळीच्या फराळाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते परवाने लागू शकतात ?

Necessary license –

– तुम्हाला सुद्धा माहीतच असेल की, कुठलाही खाद्यपदार्थ संबंधात व्यवसाय सुरू केल्यानंतर FSSAI ( Food Safety and Standards Authority of India ) licence लागतेच त्यामुळे तुम्ही सुद्धा हे लायसन्स काढून घ्या.

– तसेच तुम्ही जर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केला असेल तर इतर कोणकोणते परवाने लागू शकतात जसे की जीएसटी रजिस्ट्रेशन किंवा इतर तर त्याची माहिती सुद्धा संबंधित अधिकार्‍याकडून किंवा ह्या व्यवसायामध्ये तुमच्या ओळखीचे कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. 

स्टेप ७ – या व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल ?

Marketing –

– कुठल्याही व्यवसायासाठी मार्केटिंग ही खूप महत्त्वाची असते आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकता त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग तुम्हाला नक्की होईल.

१ . तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या घरामधून हा व्यवसाय सुरू केला तर तुमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल सांगू शकता आणि हळूहळू तुमच्या व्यवसायाबद्दल इतर लोकांना माहिती होऊ लागेल म्हणजेच व्यवसायामध्ये mouth publicity सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते.

२ . तसेच तुम्ही तुमच्या फराळाच्या व्यवसायाला आकर्षक असे नाव देऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाचे व्हिजिटिंग कार्ड्स ,पॅम्प्लेट्स,बॅनर्स छापू शकता. व्हिजिटिंग कार्ड्स आणि पॅम्प्लेट्स वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता जसे की शॉप्स,सुपर मार्केट,मॉल्स,किराणा दुकान अशा ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती त्यांना देऊ शकता आणि त्यांच्याकडून सुद्धा मोठमोठ्या ऑर्डर मिळवू शकता.

३ . आजच्या डिजिटल युगामध्ये मार्केटिंगचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे ” सोशल मीडिया.” अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये तुमचा व्यवसाय सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

 अशा रीतीने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही जर कायमस्वरूपी हा व्यवसाय करणार नसाल तरी सुद्धा फक्त दिवाळीच्या कालावधी पुरता सुद्धा हा व्यवसाय नक्की करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment