रिलायन्स जिओने सामान्य कारला ‘स्मार्ट कार’ मध्ये बदलण्यासाठी लाँच केले जिओ मोटिव्ह JioMotive | JioMotive

रिलायन्स जिओने सामान्य कारला ‘स्मार्ट कार’ मध्ये बदलण्यासाठी लाँच केले जिओ मोटिव्ह JioMotive | JioMotive –

   बरेच लोक त्यांनी पहिली घेतलेली कार जपून ठेवतात काही लोक तर कितीही स्मार्ट कार आल्या तरी कार बदलतच नाहीत,मग लोकांकडे पैसा असून सुद्धा काही लोकांना त्यांनी खरेदी केलेली पहिली कारच वापरायला आवडते. परंतु आता नवनवीन कार मार्केटमध्ये येत आहेत आणि तेही नवनवीन फिचर्स सह… मग अशावेळी काही लोकांना आपल्याकडे असणारी सामान्य कार बदलावी की काय असे सुद्धा काही क्षणांसाठी वाटते परंतु काही लोक भावनिक दृष्ट्या त्या कारमध्ये गुंतलेले असतात किंवा काही लोक पैसे अभावी त्यांच्याजवळ असणारी कार बदलू इच्छित नाहीत ,तर मग आता अशा लोकांसाठी खुशखबर आहे कारण रिलायन्स जिओनी सामान्य कारला स्मार्ट कार मध्ये बदलण्यासाठी लॉन्च केले आहे जिओ मोटिव्ह…

Advertisement

किती किंमत आहे JioMotive ची ?

तर JioMotive ची किंमत आहे ४,९९९/- रुपये…

JioMotive खरेदी केले की एक वर्षाचे फ्री सबस्क्रिप्शन मिळते आणि एका वर्षानंतर ५९९ रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

JioMotive चे फिचर्स | Features of JioMotive –

१. अँटी-थेफ्ट अलर्ट :

जर समजा कार चोरीला जात असेल तर ह्या डीव्हॉईसमुळे युजरला अलर्ट मिळेल.

२ . अँटी-टॉ अलर्ट: 

जर समजा कार टो केली जात असेल तर त्याचा सुद्धा अलर्ट युजरला मिळेल. 

३ . डिव्‍हाइस टँपर अलर्ट :  

जर समजा कुणीही JioMotive हे डिव्‍हाइस काढून टाकले किंवा तसे करण्याचा प्रयत्‍न जरी केला तरी युजरला स्‍मार्टफोनवर लगेचच अलर्ट मिळू शकतो.

४ . कार वाय फाय : 

JioMotive मुळे कार मध्ये वायफाय सुविधा सुद्धा मिळणार आहे.

५ . रिअल-टाइम व्हेईकल ट्रॅकिंग :

ह्या मुळे आपली कार नेमकी कुठे आहे हे समजेल म्हणजेच कार ट्रॅक करता येईल.

६ . एक्सीडेंट डिटेक्शन :

जर समजा कारचा अपघात झाला तरी सुद्धा युजरला त्या बद्दल अलर्ट मिळतो.

७ . जिओ फेन्सिंग :

या फिचरमुळे वर्चुअल झोन सेट करता येतो ,त्यामुळे काही विशिष्ट एरियामध्ये आपली कार प्रवेश करते आणि बाहेर पडते हे आपल्याला बघता येते म्हणजेच विशिष्ट एरिया मधील कारची ऍक्टिव्हिटी आपल्याला बघता येते.

८ . JioMotive पोर्टेबल ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD) डिव्हाइस आणि प्लग-अँड-प्ले डिव्हाइस असल्याकारणाने वापरण्यास सुद्धा सोपे आहे

JioMotive कसे काम करते ?

 – Google Play Store किंवा Apple App Store वरून JioThings हे ॲप डाउनलोड करून इंस्टॉल करा.

– तुमच्या जवळील Jio नंबरसह JioThings वर लॉग इन किंवा साइन अप करा आणि “+” वर क्लिक करून JioMotive सिलेक्ट करा.

– जिओमोटिव्ह बॉक्स किंवा डिव्हाइसवरून IMEI क्रमांक एंटर करा आणि “proceed” वर क्लिक करा.

– तुमच्या कारचे सर्व डिटेल्स जसे की रजिस्ट्रेशन नंबर, कारचे नाव, वेहिकल मेक, फ्यूयल टाईप, मॉडेल तसेच इयर ऑफ मेक अशी सर्व माहिती एंटर करून save वर क्लिक करा.

– आता , JioMotive हे डीव्हॉईस कारच्या ओबीडी पोर्ट मध्ये प्लग करा. आता याची खात्री करा की जिओ नेटवर्क तुम्हाला व्यवस्थित आहे आणि पुढील स्टेप्स फॉलो करण्या अगोदर कार चालू करा.

– JioEverywhereConnect नंबर शेअरिंग प्लॅनच्या टर्म्स अँड कंडिशन्सला सहमती दर्शवा आणि “enable” वर क्लिक करा.

– “JioJCR1440” वर क्लिक करून पुढील स्क्रीनवर “proceed” वर क्लिक करा.

– तुम्हाला जिओ कडून कन्फर्मेटरी मेसेज स्क्रीनवर एक्टिवेशन रिक्वेस्ट रिसिव्हड साठी असेल.

– डिव्हाइस ॲक्टिवेट होण्यासाठी कार 10 मिनिटे चालू ठेवावी.नंतर तुमचा डेटा 1 तासात JioThings या ॲपमध्ये असेल. 

नक्कीच या डिवाइस मुळे अनेकांचा फायदा होणार आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment