BMC Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या 226 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: MPR/3130

मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीसी / एफ/9327 दि.19.04.2023 नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध आस्थापनेवरील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) या संवर्गातील खालील तक्त्याप्रमाणे रिक्त असलेली 226

Advertisement
पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. सदर पदासाठी आवश्यक ती अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून दि. 15.08.2023 ते दि.04.09.2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/bmcjsrnay 23 / या लिंकवरुन अर्ज सादर करावेत.

उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र आणि इतर माहिती उमेदवाराच्या ई-मेलवर देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.

Total: 226 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)

शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण  (ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि.   (v) MS-CIT

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Advertisement

Leave a Comment