बिझनेस आयडिया (Business Idea )
Business Idea : करोनाचा भीषण काळ पाहिल्यानंतर आता सगळ्यांनाच नोकरी आणि व्यवसायाची गरज आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी सगळेच कामाच्या शोधात आहेत. अशात आम्हीही तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडीया घेऊन आलो आहोत. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. जर तुम्ही एखादा बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत असाल तर हा बिझनेस तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण, यामध्ये तुम्ही दिवसाला तब्बल ४ ते ५ हजार कमवू शकता.
कॉर्न फ्लेक्स आरोग्यासाठीही चांगले
मक्याची कणसं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. याचा सगळ्यात जास्त उपयोग घर किंवा हॉटेल्समध्ये सकाळच्या नाश्तावेळी होतो.
मक्याची कणसं आरोग्यासाठीही चांगली असतात.
कसा करणार कॉर्न फ्लेक्सचा व्यवसाय?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता आहे. जिथे एक प्लांट लावता येईल. इतकंच नाहीतर तुम्हीला स्टोरेजसाठीही जागेची आवश्यकता आहे. यासाठी तुमच्याकडे एकूण २००० से ३००० स्क्वेअर फूट जागेची गरज आहे. आता उपकरणांविषयी बोलायचं झालं तर या व्यवसायामध्ये वीज, GST नंबर, कच्चा माल आणि जागेची आवश्यकता आहे.
कॉर्न फ्लेक्सच्या मशिनीचा वापर गहू आणि तांदळाच्या फ्लेक्ससाठीही होतो…
या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या मशिनीचा उपयोग फक्त कॉर्न फ्लेक्ससाठी नाही तर गहू आणि तांदळाच्या फ्लेक्ससाठीही होतो. त्यामुळे याचा तुम्हाला जास्त फायदा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मक्याचे जास्त उत्पादन असलेल्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करा. जर तुम्ही दूरच्या ठिकाणाहून मका आणून त्याचे कॉर्न फ्लेक्स बनवले तर ते खूप महाग पडेल, म्हणून अशी जागा शोधली पाहिजे जिथे चांगल्या प्रतीचा मका मिळेल किंवा तो स्वतः पिकवता येईल.
केंद्र सरकारकडून मदत मिळेल
यासाठी मोदी सरकारची मुद्रा कर्ज योजना फायद्याची आहे. ज्यामध्ये सरकार स्टार्ट-अप उद्योगपतींना ९० टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा देते. जर तुम्ही फक्त ५०,००० रुपये गुंतवू शकता तर उर्वरित पैसे तुम्हाला सरकारकडून कर्जाच्या स्वरूपात मिळतील.