दीन दयाळ स्पर्श योजना | Deen Dayal Sparsh Yojana | दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना
आपण आपल्या वेबसाईटवर विविध योजनांबद्दल माहिती बघितली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण दीनदयाळ स्पर्श योजना ( Deen Dayal Sparsh Yojana )या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दीन दयाळ वर्ष योजना नक्की काय आहे , या योजनेसाठी पात्रता काय आहे तसेच इतर सर्व माहिती जाणून घेऊया…
दीन दयाळ स्पर्श योजना | Deen Dayal Sparsh Yojana
Advertisement
I दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना
Table of Contents
– दीनदयाळ स्पर्श योजना ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे.
– या योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांमध्ये सहावी ते नववीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना भारतीय टपाल विभागामार्फत दरमहा पाचशे रुपये स्टायपेंड मिळेल म्हणजेच दरवर्षी सहा हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळेल.
– भारतीय पोस्ट ऑफिस विभागाने देशामध्ये या योजनेमुळे फिलाटली किंवा फिलाटेलिक संकलनाला प्रोत्साहन देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
– चांगले शैक्षणिक रेकॉर्ड्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच फिलाटलीचा छंद असणाऱ्या विद्यार्थ्यांना दीनदयाळ स्पर्श योजना या योजनेअंतर्गत मिळणारी स्कॉलरशिप मिळू शकते.
फिलाटली ( Philately ) म्हणजे नक्की काय ?
– टपाल तिकिटांचा अभ्यास तसेच संकलन म्हणजेच फिलाटली होईल.यामध्ये स्टॅम्प तसेच संबंधित फिलाटेलिक प्रोडक्स वरील जिज्ञासा, संकलन तसेच संशोधन यांसारख्या ऍक्टिव्हिटीचा समावेश होतो.
– स्टॅम्प गोळा करण्याच्या छंदामध्ये थीमॅटिक भागात स्टॅम्प किंवा इतर संबंधित प्रॉडक्ट्स शोधणे, मिळवणे, कॅटलॉग करणे, मॅनेज करणे, संग्रहित करणे, प्रदर्शित करणे तसेच त्यांची व्यवस्थित देखभाल करणे यांचा समावेश आहे.
– स्टॅम्प गोळा करण्याच्या छंदामुळे ज्या त्या काळातील राजकीय ,सामाजिक तसेच आर्थिक गोष्टींबद्दल चे ज्ञान मिळू शकते तसेच या छंदामुळे इतरही ज्ञान मिळू शकते आणि कॅटलॉग मेंटेन करणे यांसारख्या ऍक्टिव्हिटीमुळे स्कूल किंवा कॉलेज प्रोजेक्ट्स यांबद्दल रुची निर्माण होऊ शकते आणि अशा प्रकारचे छंद असणाऱ्या नवनवीन विद्यार्थ्यांशी सुद्धा मैत्री होऊ शकते, परिणामी संवाद होऊ शकतात आणि संवाद कौशल्य वाढवण्यामध्ये सुद्धा मदत होऊ शकते.
दीन दयाळ स्पर्श योजनेचे फायदे | Deen Dayal Sparsh Yojana Benefits –
– दीनदयाळ स्पर्श योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमाह पाचशे रुपये आणि सहा हजार रुपये वार्षिक असा लाभ मिळणार आहे.
– दीनदयाळ स्पर्श योजनेअंतर्गत देशभरा मधील 920 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
– प्रत्येक पोस्टल सर्कल इयत्ता VI, VI, VIII आणि IX च्या प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करेल, जास्तीत जास्त 40.
– दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
– दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येऊ शकतो.
दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता | Eligibility for Deen Dayal Sparsh Yojana –
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी भारतीय असणे आवश्यक आहे.
– देशभरामधील इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
– उच्च शिक्षणाच्या राष्ट्रीय संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी शिकत असले पाहिजे.
– अर्जदार विद्यार्थी संबंधित शाळेमधील फिलाटली क्लबचा सदस्य असेल तरच तो या योजनेमधून नफा मिळवण्यास पात्र असेल, ज्या शाळेमध्ये फीलाटली क्लब नाही अशा शाळेमधील विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यासाठी त्यांचे स्वतःचे फीलाटली डिपॉझिट खाते असणे आवश्यक आहे.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधीच्या वर्गामध्ये 60% मिळवणे अपेक्षित आहे , SC आणि ST विद्यार्थ्यांना 55% गुण आवश्यक आहे.
दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Deen Dayal Sparsh Yojana –
– आधार कार्ड
– बँक खाते
– कायम प्रमाणपत्र
– पासपोर्ट साइज फोटो
– मोबाईल नंबर
– शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
दीन दयाळ स्पर्श योजना अर्ज | Deen Dayal Sparsh Yojana Application | दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना अर्ज :
– दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येऊ शकतो, ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अधिकृत वेबसाईटवरून करता येतो.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |