Pinterest वरून पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग | Best Ways to Earn Money from Pinterest –
ऑनलाइन पद्धतीने इनकम कमावण्याचे खूप सारे मार्ग उपलब्ध आहे. आज आपण Pinterest वरून पैसे कशा रीतीने कमावले जाऊ शकतात याचे वेगवेगळे मार्ग बघणार आहोत.Pinterest वरून पैसे कमावण्याचे जे मार्ग आहेत त्यावर जर डिटेल व्हिडिओ किंवा डिटेल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा त्यावर डिटेल माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
Pinterest वरून पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग | Best Ways to Earn Money from Pinterest –
१ . इन्फ्लुएन्सर बनून –
इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रमाणेच पिंटरेस्टवर सुद्धा इन्फ्लुएन्सर बनून चांगली कमाई करता येऊ शकते. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडू शकता आणि इन्फ्लुएन्सर बनू शकता.इन्फ्लुएन्सर बनून affiliate मार्केटिंग द्वारे, प्रॉडक्ट तसेच सर्विसेस सेल करून तसेच स्पॉन्सर्ड कंटेंट द्वारे कमाई केली जाऊ शकते.
२ . Affiliate मार्केटिंग –
पिंटरेस्ट affiliate सेल्स करण्यासाठी आणि चांगले कमिशन मिळवण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. पिंटरेस्ट यूजर पिन किंवा बोर्ड तयार करू शकता ,आकर्षक असे प्रॉडक्ट्स आणि त्यांच्या लिंक्स पोस्टद्वारे शेअर करू शकता.
आपण आपल्या आवडीचे प्रॉडक्ट्स निवडू शकतो आणि काही सेकंदामध्येच त्याची affiliate link तयार करू शकतो. अशाप्रकारे अफिलीएट मार्केटिंग द्वारे कमाई केली जाऊ शकते.
३ . Reselling Business –
रिसेलिंगचा व्यवसाय हा affiliate मार्केटिंग पेक्षा थोडासा वेगळा असून या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ॲप्स वरून उदाहरणार्थ ,meesho ,shop101 वरून आपल्या आवडीचे प्रॉडक्ट्स पिंटरेस्टवर शेअर करू शकतो. ज्यावेळी एखाद्या ग्राहकाला ते प्रॉडक्ट खरेदी करायचे असते त्यावेळी ते ग्राहक आपल्याशी संपर्क साधतील आणि त्यानंतर आपण या ॲपवरून ते प्रॉडक्ट ऑर्डर करत असताना आपले मार्जिन त्यामध्ये ऍड करायचे आहे अशाप्रकारे आपण अर्निंग करू शकतो.
हे सुद्धा बघू शकता…मिशो वरून अर्निंग कशी करायची…?
४ . प्रॉडक्ट्स आणि सर्विसेसची विक्री –
आपली स्वतःची काही प्रॉडक्ट्स तसेच सर्विसेस असतील तर त्यांची विक्री सुद्धा पिंटरेस्टच्या माध्यमातून करता येऊ शकते. यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या प्रॉडक्ट बद्दल आणि सर्विसेस बद्दल माहिती पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होईल.
जर आपली स्वतःची इतर कोणती फिजिकल प्रॉडक्ट्स नसतील तर डिजिटल प्रॉडक्ट्स उदाहरणार्थ, ebooks ची विक्री करून सुद्धा चांगली कमाई करता येऊ शकते.
५ . URL shortner –
युआरएल shortner या वेबसाईट द्वारे URL short करून पिंटरेस्ट वर शेअर करू शकता. ज्यावेळी कोणी या लिंक वर क्लिक करेल त्याप्रकारे आपली अर्निंग होऊ शकते. या ठिकाणी क्लिक नुसार आपली कमाई होऊ शकते.
अशाप्रकारे पिंटरेस्ट वरून कमाई करण्याचे काही मार्ग उपलब्ध आहे, ज्यावर डिटेल माहिती हवी असेल नक्की कमेंट करा, त्यावर डिटेल माहिती उपलब्ध केली जाईल.