Gharkul yojana 2025 | घरकुल योजना 2025 | अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती | 20 लाख घरकुल | Best Government schemes 2025

Gharkul yojana 2025 | घरकुल योजना 2025 | अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती | 20 लाख घरकुल | Best Government schemes 2025

   प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले स्वतःचे असे घर असावे आपल्या कुटुंबाला निवारा असावा परंतु सर्व जणांना स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही यामागे विविध कारणे असतात आणि त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक अडचण. महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी नक्की पात्र कोण आहे, अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया ..

Gharkul yojana 2025 | घरकुल योजना 2025 | अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती | 20 लाख घरकुल | Best Government schemes 2025

Gharkul yojana 2025

Gharkul yojana 2025 | घरकुल योजना 2025 –

– महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे हा आहे.

– घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि नव बौद्ध समाजामधील व्यक्तींना घर बांधणी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. 

Gharkul yojana eligibility criteria 2025 | घरकुल योजना पात्रता 2025 –

– महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्राची दीर्घकालीन रहिवासी असणे आवश्यक आहे. 

– तसेच अर्जदार हे अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय आणि नव बौद्ध समाजामधील असणे आवश्यक असेल. 

– अर्जदाराकडे घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असावीत. 

Gharkul yojana required documents | घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे  –

  •  आधार कार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • जात प्रमाणपत्र 
  • ओळखपत्र 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • बँक खाते 
  • इतर आवश्यक कागदपत्रे. 

Gharkul yojana benefits | घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे फायदे :

  • सपाट भागामधील घरांसाठी : १,२०,००० रुपये
  • डोंगराळ आणि कठीण भागातील घरांसाठी : १,३०,००० रुपये 
  • शौचालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १२,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. 
  • तसेच मनरेगा अंतर्गत 90 दिवसांच्या रोजगाराची हमी सुद्धा दिली जाते. 

Gharkul yojana Application | घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा :

  • घरकुल योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. 
  • महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईल, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी तसेच अर्ज सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावेत. 
  • अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करावा आणि अर्ज जमा करावा. 
  • लाभार्थ्यांची निवड ही अर्जाची छाननी करून करण्यात येईल आणि जे व्यक्ती घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी ठरतील त्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावण्यात येते. 

अर्ज करण्यासाठी : अधिकृत वेबसाईट 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजना :

• लाभार्थी निवड प्रक्रिया

सामाजिक, आर्थिक ,जात सर्वेक्षण सन २०११ मधून उपलब्ध झालेल्या Generated Priority List/प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवेअर वर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यामधून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते.

प्राधान्य क्रम यादी ही बेघर, १ खोली लाभार्थी, २ खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. 

ग्रामसभेमार्फत प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची निवड करत असताना पुढील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.

• १६ ते ५९ वयोगटामधील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब

• महिला कुटुंबप्रमुख आणि १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब

• २५ वर्षांवरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती आहेत असे कुटुंब

• अपंग व्यक्ती असलेले कुटुंब , ज्या कुटुंबामध्ये शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीत.

• भूमिहीन कुटुंब ज्या कुटुंबांचा उत्पन्न स्रोत हा मोलमजुरी आहे.

वरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील आणि या प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल.

● अर्ज कुठे करावा :

ग्रामपंचायत आणि पंचायत समिती

● आवश्यक कागदपत्रे

• ७/१२ उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र

• जातीचे प्रमाणपत्र

• आधार कार्ड

• रेशन कार्ड/ निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल

• मनरेगा जॉब कार्ड

• बँक पासबुक छायांकित प्रत

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment