Krushi Sevak Bharti 2023 | महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती

जाहिरात क्रमांक: ४ – कृषि सेवक / सरळसेवा/३२०८/सन- २०२३, दिनांक: १२ ऑगस्ट २०२३

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र.मकसी- १००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची स्वतंत्रपणे माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

Advertisement

Total: 2109 जागा

पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi Sevak)

अ. क्र.विभाग जागा 
1अमरावती227
2छ. संभाजीनगर196
3कोल्हापूर250
4लातूर170
5नागपूर448
6नाशिक336
7पुणे188
8ठाणे294
Total 2109

शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट: पाहा

अभ्यासक्रम: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: Available Soon]

Advertisement

Leave a Comment