Mahajyoti Free Tablet Yojana | विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट I महाज्योती फ्री टॅबलेट योजना –
आजचे युग डिजिटल युग आहे म्हणजेच हल्लीच्या जगामध्ये डिजिटल गोष्टी किंवा काही डिवाइसेस खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. शिक्षण घेत असताना हल्ली इंटरनेटचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मोबाईल ,कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट यांसारखे डिवाइस चा उपयोग करून विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रम अधिक जास्त चांगल्या प्रमाणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु सर्वच विद्यार्थी हे डिवाइस घेऊ शकतात असे नाही. परंतु आता सरकारतर्फे दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजना ( Mahajyoti Free Tablet Yojana ) सुरू करण्यात आली आहे, या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येणार आहे. जाणून घेऊ यात या योजनेबद्दल अधिक माहिती…
Mahajyoti Free Tablet Yojana | महाज्योती फ्री टॅबलेट योजना –
Table of Contents
– विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढील उच्च शिक्षणासाठी विविध परीक्षांसाठी ऑनलाईन क्लासेस करता यावेत यासाठी टॅबलेट खूप उपयुक्त ठरते परंतु सर्वच विद्यार्थ्यांना ती घेता येते असे नाही, परंतु महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येणार आहेत.
– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यामधील 30 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करताना कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा फायदा ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
– या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबलेट तर मिळणार आहेत त्यासोबत प्रति दिवस सहा जीबी डेटा असणारी इंटरनेट सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.
– महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची इच्छा असणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
– तसेच अर्जदार विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण करून इयत्ता अकरावीसाठी सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे.
महाज्योती फ्री टॅबलेट योजने अंतर्गातील काही अटी | Terms –
– महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी इतर कुठल्याही शासकीय योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांनी टॅबलेटचा लाभ मिळवलेला नसावा, तसे असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– या योजनेअंतर्गत टॅबलेट मिळाल्यावर विद्यार्थ्याने शिक्षण मध्येच सोडल्यास टॅबलेट परत करावा लागेल.
– या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या टॅबलेटची वॉरंटी एक वर्षाची असेल परंतु एक वर्षानंतर टॅबलेट मध्ये बिघाड आढळल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांचीच असेल, या योजनेअंतर्गत दुरुस्तीसाठी खर्च दिला जाणार नाही.
– अर्जदार विद्यार्थ्याचे आई किंवा वडील शासकीय नोकरीमध्ये असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.